पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे कर्नाटकच्या विकासाच्या वाटेला हातभार लावेल.
पंतप्रधान मोदी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, श्री नितीन गडकरी यांच्या ट्विटच्या मालिकेला प्रतिसाद देत होते; ज्यात गडकरी यांनी नमूद केल होत की बेंगळुरू-म्हैसूर एक्सप्रेसवे प्रकल्पाच्या बांधकामाचा उद्देश श्रीरंगपटना, कूर्ग, उटी आणि केरळ या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारणे हा आहे,यामुळे त्या ठिकानांची पर्यटन क्षमता ही वाढेल. केंद्रीय मंत्र्यांनी असेही सांगितले की या प्रकल्पात राष्ट्रीय महामार्ग 275 चा एक भाग समाविष्ट असून त्याअंतर्गत 4 रेल्वे ओव्हरब्रिज, 9 महत्वाचे पूल, 40 छोटे पूल आणि 89 अंडरपास आणि ओव्हरपास यांचे बांधकाम केले जाणार आहे . यासंदर्भात पंतप्रधानांनी ट्विट केले की ; "एक महत्त्वाचा रस्ते जोडणी प्रकल्प जो कर्नाटकच्या विकासाच्या वाटेवर नेण्यात हातभार लावेल."
An important connectivity project which will contribute to Karnataka’s growth trajectory. https://t.co/9sci1sVSCB
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2023