एक उत्कट लेखक, कवी आणि संस्कृतीप्रेमी... नरेंद्र मोदी यांचे वर्णन करण्यासाठी ही संबोधने सुद्धा वापरता येतील. त्यांच्या व्यस्त, अनेकदा त्रासदायक वाटेल अशा वेळापत्रकात सुद्धा नरेंद्र मोदी आपला काही काळ योगा, लेखन, सोशल मीडियावरून लोकांशी संवाद साधणे अशा आपल्या आवडत्या गोष्टींसाठी आवर्जून देतात. त्यांच्या सभांच्या दरम्यान सुद्धा त्या ठिकाणच्या आपल्या अनुभवांबाबत ते ट्वीट करताना दिसतात. अगदी लहान असल्यापासून ते लिहित आले आहेत. 24 तास ठळक बातम्यांच्या आजच्या या काळात विस्मरणात जाऊ शकणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्याशी संबंधित काही बाबींचा परिचय या विभागातून होऊ शकेल.

“योग ही मानवजातीसाठी भारताने प्रदान केलेली भेट आहे, जी आपण संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू शकतो. योगामुळे केवळ रोग मुक्तीच नव्हे तर भोग मुक्ती सुद्धा शक्य आहे.”
नरेंद्र मोदींच्या जिव्हाळ्याच्या विषयावरील त्यांच्या उत्कृष्ट भाषणापैकी एका भाषणाचा विषय आहे, योग.
 
त्यांची पुस्तके ही त्यांच्या भाषणांइतकीच प्रभावी, अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण आहेत. नरेंद्र मोदी यांचे प्रत्येक पुस्तक हे माहिती आणि अभिनव कल्पनांचा खजीना असून त्यात त्यांच्या जीवनाताल प्रसंगांचाही समावेश आहे.
आणीबाणीच्या अंधारलेल्या काळात गुजरातमधील परिस्थितीची एक झलक पाहा, सामाजिक समतेबाबत नरेंद्र मोदींची मते वाचा आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी हरीत ग्रह राखण्याला महत्व द्यावे, असे त्यांना का वाटते, ते जाणून घ्या …
 
“मी 36 वर्षांचा होतो तेव्हा जगत जननी मातेसोबतच्या माझ्या संवादाचे संकलन म्हणजे साक्षीभाव... हे संकलन मला वाचकाशी जोडते आणि केवळ वर्तमानपत्रातून नाही तर माझ्या शब्दांतून वाचक मला जाणून घेऊ शकतात.”
युवा असताना नरेंद्र मोदी डायरी लिहू लागले, पण प्रत्येक 6-8 महिन्यांनंतर त्या डायरीची पाने ते जाळून टाकत असत, हे तुम्हाला माहीती आहे का? एके दिवशी एका प्रचारकाने त्यांना असे करताना पाहिले आणि त्यांनी असे करू नये अशी विनंती केली. तेच कागद साक्षीभावमध्ये संकलित झाले, 36 वर्षीय नरेंद्र मोदी यांचा विचार संग्रह ठरले.
 
“जे गद्यात सांगता येत नाही ते अनेकदा कवितेतून व्यक्त करता येते …”
येथे नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा एक सुसंगत संग्रह आहे. गुजराती भाषेत लिहिलेल्या या रचना निसर्गमाता आणि राष्ट्रभक्ती या संकल्पनांवर आधारित आहेत.
 
“कला, संगीत आणि साहित्य राज्यावर अवलंबून असू नये. त्याला कोणत्याही मर्यादा असू नये. सरकारने फक्त अशी प्रतिभा ओळखावी आणि तीला प्रोत्साहन द्यावे. ”
लोकप्रिय संस्कृतीप्रती नरेंद्र मोदी यांना वाटणारा विश्वास यातून व्यक्त होतो. आणीबाणी विरोधी संघर्षात सक्रियपणे सहभागी होत असताना, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य ही त्यांच्यासाठी विश्वासाची बाब होती आणि नंतरच्या काळातही ती भावना कायम राहिली. ख्यातनाम कलाकारांसोबतच्या त्यांच्या संवादांचा आपणही आस्वाद घ्याल.
शरद ऋतूच्या अंत:करणातून वसंत ऋतुचे गाणे!

पार्थिव गोहिल या कलाकाराने गायलेली नरेंद्र मोदी लिखित एक सुंदर कविता
 
एका सुंदर कवितेसह नवरात्रीचे रंग आणि उल्हास साजरा
नवरात्रीनिमित्त श्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली एक कविता
Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India's data centre capacity to more than double by fiscal 2027: Crisil report

Media Coverage

India's data centre capacity to more than double by fiscal 2027: Crisil report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींचे हृद्य पत्र
December 03, 2024

दिव्यांग कलाकार दिया गोसाईसाठी, सर्जनशीलतेचा क्षण आयुष्य बदलणारा अनुभव ठरला. 29 ऑक्टोबर रोजी बडोद्यात पंतप्रधान मोदींचा रोड शो सुरू असताना, तिने रेखाटलेली त्यांची आणि स्पेन सरकारचे अध्यक्ष महामहीम. श्री. पेड्रो सांचेझ यांची रेखाचित्रे त्यांना भेट दिली. तिने अत्यंत मनापासून दिलेली ही भेट स्वीकारण्यासाठी दोन्ही नेते वाहनातून उतरून जातीने तिच्याजवळ त्यामुळे तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

काही आठवड्यांनंतर, 6 नोव्हेंबर रोजी, दियाला तिच्या कलाकृतीची प्रशंसा करणारे पंतप्रधानांचे पत्र आले, त्यामध्ये त्यांनी महामहीम. श्री. सांचेझ यांनीही त्याचे कौतुक केल्याचे देखील कळवले होते. पीएम मोदींनी तिला ललित कलांवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याचे शिक्षण घेण्याच्या आवाहनाबरोबरच "विकसित भारत" घडवण्यातील तरुणांच्या भूमिकेवर विश्वासही व्यक्त केला होता. त्या पत्राला त्यांनी खास आपल्या पद्धतीची जोड देत तिच्या कुटुंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या होत्या.

या पत्रामुळे आनंदाने भारावून, दियाने तिच्या पालकांना पत्र वाचून दाखवले असता तिने आपल्या कुटुंबाला इतका मोठा बहुमान मिळवून दिल्याचा त्यांनाही आनंद झाला. " आपल्या देशाचा एक छोटासा भाग असल्याचा मला अभिमान आहे. मोदीजी, तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला दिल्याबद्दल धन्यवाद," असे म्हणत दियाने पंतप्रधानांच्या पत्रामुळे आपल्याला जीवनात धाडसी पावले उचलण्याची आणि इतरांनाही अशा प्रकारे सक्षम बनविण्याची प्रेरणा मिळाली, असेही नमूद केले.

पंतप्रधान मोदींच्या या कृतीतून दिव्यांगांना सक्षम बनविण्याची आणि त्यांच्या योगदानाची यथोचित दखल घेण्याची त्यांची बांधिलकी दिसून येते. सुगम्य भारत अभियानासारख्या अनेक उपक्रमांपासून ते दिया सारखीशी वैयक्तिक नाते प्रस्थापित करण्यापर्यंत, ते सातत्याने प्रेरणा देण्याचा आणि त्यांना वर आणण्याचे काम करून, प्रत्येक प्रयत्न चांगल्या भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सिद्ध करत आहेत .