पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युनायटेड किंगडमचे नवनियुक्त पंतप्रधान केयर स्ट्रॅमर यांनी दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक आणि दृढ करायला प्राधान्य दिल्या बद्दल त्यांची प्रशंसा केली.
पंतप्रधान मोदी यांनी युनायटेड किंगडमचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
"UK FS @DavidLammy यांना भेटून आनंद झाला. PM @Keir_Starmer यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी व्यापक आणि दृढ करायला प्राधान्य दिल्या बद्दल प्रशंसा करत आहे. हे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. द्विपक्षीय तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रम आणि परस्पर फायद्याचा एफटीए पूर्ण करण्याच्या इच्छेचे स्वागत आहे."
A pleasure to meet UK FS @DavidLammy. Appreciate the priority accorded by PM @Keir_Starmer to broaden and deepen the Comprehensive Strategic Partnership. Remain committed to elevating the ties. Welcome the bilateral Technology Security Initiative and the desire to conclude a… pic.twitter.com/7bGWZuJlOk
— Narendra Modi (@narendramodi) July 24, 2024