पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 लसनिर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा घेतला आढावा

November 28th, 07:20 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या तीन शहरातल्या लसनिर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. मोदी यांनी आज अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक पार्क, हैद्राबादेतल्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या तीन संस्थांना भेट दिली.

पंतप्रधानांची अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट

November 28th, 12:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. येथील झायडस केडिला मध्ये डीएनए वर आधारित स्वदेशी लस विकसित होत आहे त्याबद्द्ल जास्त माहिती घेणे हा या भेटीमागील उद्देश होता.

पंतप्रधान उद्या तीन शहरातील लस सुविधा केंद्रांना भेट देणार

November 27th, 04:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी तीन शहरांचा दौरा करणार आहेत. ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत.