रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी गेल्या काही वर्षात अभूतपूर्व काम झाले : पंतप्रधान

January 17th, 02:36 pm

अलीकडे रेल्वेच्या मुलभूत सुविधांच्या विकासात उपयुक्त ठरलेला बदलता दृष्टीकोन पंतप्रधानांनी आज अधोरेखित केला. हा बदल भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या विकासाच्या दृष्टीने अभूतपूर्व होता. गुजरातमधील केवडिया हे देशातील विविध भागांशी जोडणाऱ्या आठ रेल्वे गाड्यांना रवाना करण्यासाठी हिरवा कंदील दाखवून राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्धाटन करताना ते बोलत होते.

स्टॅच्यू ऑफ युनिटी रेल्वेने जोडले गेल्याने पर्यटकांना फायदा होण्यासोबतच रोजगार संधीचे निर्माण होतील : पंतप्रधान

January 17th, 02:36 pm

केवडिया या स्थानाला सर्व दिशांनी रेल्वे कनेक्टिविटी देणारा हा क्षण सर्वांसाठीच अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातमधील केवडियाला देशातील विविध भागांशी जोडणाऱ्याआठ रेल्वे गाड्यांना रवाना करण्यासाठी हिरवा कंदील दाखवून राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्धाटन करताना ते बोलत होते.

रेल्वेद्वारे आम्ही मागास भागांना जोडून घेत आहोत: पंतप्रधान

January 17th, 02:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेदेशातील जे भाग जोडलेले नव्हते आणि जे मागे पडले होते त्यांना आम्ही रेल्वेने जोडून घेत आहोत. देशातील विविध प्रातांना गुजरातमधील केवाडीयाशी जोडणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांना हिरवा कंदील दाखविताना आणि राज्यातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन दूरदृष्य प्रणालीद्वारे करतांना श्री. मोदी बोलत होते.

आज केवडिया हे एक प्रमुख जागतिक पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येत आहेः पंतप्रधान मोदी

January 17th, 02:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गुजरातमधील केवडिया हा आता काही दुर्गम भागातील छोटासा तालुका राहिला नाही तर तो जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनले आहे. देशातील विविध प्रांतांना गुजरातमधील केवडियाशी जोडणार्‍या आठ गाड्यांना रवाना केल्यानंतर आणि राज्यातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केल्यानंतर मोदी बोलत होते.

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट जाणाऱ्या आठ रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 17th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाला जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना हिरवा कंदील दाखवला. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देतील. दाभोई - चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड - केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरणं केलेला प्रतापनगर - केवडिया मार्ग आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्री उपस्थित होते.

स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला

January 17th, 11:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाच्या विविध भागांमधून गुजरातच्या केवडियाला जाणाऱ्या आठ रेल्वेगाडयांना हिरवा कंदील दाखवला. या गाड्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत थेट प्रवासाची सेवा उपलब्ध करून देतील. दाभोई - चांदोड गेज रूपांतरित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, चांदोड - केवडिया नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नव्याने विद्युतीकरणं केलेला प्रतापनगर - केवडिया मार्ग आणि दाभोई, चांदोड व केवडिया या नवीन स्थानक इमारतींचेही पंतप्रधानांनी उद्घाटन केले. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्री उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल प्राणीसंग्रहालयाचे उद्‌घाटन

October 30th, 06:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवडिया येथे सरदार पटेल प्राणीसंग्रहालयाचे आणि जिओडेसिक आयव्हरी पद्धतीच्या घुमटाचे उद्‌घाटन केले. त्यांनी केवडिया एकात्मिक विकास अंतर्गत, 17 प्रकल्प देशाला समर्पित केले आणि 4 नवीन प्रकल्पांसाठी पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये जलपर्यटन मार्ग, न्यू गोरा ब्रिज, गरुडेश्वर बंधारा, सरकारी निवासस्थाने, बस बे टर्मिनस, एकता नर्सरी, खलवानी इको टूरिझम (पर्यावरणीय पर्यटन), आदिवासी होम स्टे यांचा समावेश आहे. त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला एकता सागरी पर्यटन जहाज सेवेचा झेंडा दाखविला.