पंतप्रधान 16 डिसेंबरला कृषी आणि अन्नप्रक्रिया या विषयावरील राष्ट्रीय शिखर परिषदेमध्ये उपस्थितांना संबोधित करणार

December 14th, 04:48 pm

गुजरातमध्ये आणंद येथे होत असलेल्या कृषी आणि अन्नप्रक्रिया या विषयावरील राष्ट्रीय शिखर परिषदेच्या समारोप सत्रातील उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. या शिखर परिषदेत नैसर्गिक शेती पद्धतीवर भर देण्यात आला आहे. यावेळी शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने शेती करण्यातील फायद्यांची तपशीलवार माहिती देण्यात येईल.

गुजरातमधल्या माँ उमिया धाम विकास प्रकल्पाच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

December 13th, 06:49 pm

वास्तविक मला प्रत्यक्ष या कार्यक्रमाला यायचं होतं. जर मी प्रत्यक्षात येऊ शकलो असतो तर, तुम्हा सर्वांची भेट घेता आली असती. तथापि, वेळेअभावी येणे शक्य झाले नाही. आणि दुसरे म्हणजे आजच्या युगातल्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने तरी मला या पवित्र कार्यामध्ये सहभागी होण्याचे भाग्य मिळत आहे. सर्वांच्या प्रयत्नांमधून जो बृहद सेवा मंदिर प्रकल्प साकार होत आहे, या कार्याचे माझ्या दृष्टीने बहुआयामी महत्व आहे.