पंतप्रधानांनी अहमदाबाद येथील एएमए संस्थेच्या परिसरातील झेन उद्यान आणि कायझेन अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी केलेल भाषण
June 27th, 12:21 pm
झेन उद्यान आणि कायझेन अकादमीच्या लोकार्पणाचा हा प्रसंग भारत आणि जपान या देशांच्या परस्पर संबंधातील सरलता आणि आधुनिकता यांचे प्रतिक आहे. जपानी झेन उद्यान आणि कायझेन अकादमीची स्थापना भारत आणि जपान या देशांदरम्यान असलेले संबंध अधिक दृढ करतील आणि या दोन्ही देशांतील नागरिकांना एकमेकांच्या अधिक जवळ आणतील असा मला विश्वास आहे. ह्योगो प्रांताचे नेते आणि माझे परममित्र गव्हर्नर ईदो तोशिजो यांचे मी या प्रसंगी विशेष आभार मानत आहे. गव्हर्नर ईदो 2017 मध्ये स्वतः अहमदाबादला आले होते. अहमदाबादमध्ये झेन उद्यान आणि कायझेन अकादमीच्या स्थापनेत त्यांनी आणि ह्योगो आंतरराष्ट्रीय संघटनेने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. याप्रसंगी मी गुजरातच्या भारत-जपान मैत्री संघटनेतील सहकाऱ्यांचे देखील अभिनंदन करतो. भारत आणि जपान या देशांतील परस्पर संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठी त्यांनी अथकपणे उल्लेखनीय काम केले आहे. जपान माहिती आणि अभ्यास केंद्र देखील या कार्याचेच एक उदाहरण आहे.अहमदाबादच्या अहमदाबाद व्यवस्थापन संस्थेत पंतप्रधानांनी केले झेन गार्डन आणि कैझन अकादमीचे उद्घाटन
June 27th, 12:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अहमदाबाद येथील अहमदाबाद व्यवस्थापन संस्थेत झेन गार्डन आणि कैझन अकादमीचे उद्घाटन केले.PM Modi to inaugurate Zen Garden, Kaizen Academy at AMA, Ahmedabad on 27th June
June 26th, 10:46 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi will inaugurate a Zen Garden and Kaizen Academy at AMA, Ahmedabad tomorrow, 27th June, 2021 at 11.30 AM.