गुजरातमधील गांधीनगर येथील सेमीकॉन इंडिया परिषद 2023 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर.
July 28th, 10:31 am
या परिषदेत मला अनेक दीर्घ परिचित चेहरे दिसत आहेत. काही लोक असेही आहेत ज्यांना मी आज प्रथमच भेटत आहे. ज्याप्रमाणे वेळोवळी सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक असते, तसाच हा कार्यक्रम आहे. सेमीकॉन इंडिया च्या माध्यमातून उद्योगांबरोबरच तज्ञ आणि धोरणकर्त्यांबरोबरचे माझे संबंध नेहमी अपडेट होत राहतात. आणि मला वाटते की आपल्या संबंधांचे तादात्मीकरण करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सेमीकॉन इंडिया मध्ये देश विदेशातल्या अनेक कंपन्या आल्या आहेत, आपले स्टार्टप्स देखील आले आहेत. मी आपणा सर्वांचे सेमीकॉन इंडिया मध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. मी आत्ताच हे प्रदर्शन पाहिले. या क्षेत्रात किती प्रगती झाली आहे, कशाप्रकारे नव्या ऊर्जेसह नवे लोक, नव्या कंपन्या, नवी उत्पादने. मला खूपच थोडा वेळ मिळाला, पण माझा अनुभव खूपच भारावून टाकणार होता. मी सगळ्यांना आग्रह करू इच्छितो, गुजरातच्या युवा पिढीला विशेष आवाहन करतो की, हे प्रदर्शन आणखीन काही दिवस चालणार आहे, तेव्हा अवश्य या, जगामध्ये या नव्या तंत्रज्ञानाने काय ताकद निर्माण केली आहे ते चांगल्या प्रकारे समजून उमजून घ्या.पंतप्रधानांनी गुजरातमधील गांधीनगर येथे सेमीकॉनइंडिया 2023 चे केले उद्घाटन
July 28th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे सेमीकॉनइंडिया 2023 परिषदेचे उद्घाटन केले. ‘भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना देणे ' ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. ही संकल्पना, सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासात भारताला जागतिक केंद्र बनवण्याच्या उद्देशाने देशाची सेमीकंडक्टर रणनीती आणि धोरण यांची दर्शक आहे.23व्या एस सी ओ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद
July 04th, 12:30 pm
आज या तेविसाव्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. संपूर्ण आशिया खंडात गेल्या दोन दशकांमध्ये शांतता, समृद्धी आणि विकासासाठी एस सी ओ एक महत्वपूर्ण व्यासपीठ म्हणून उदयाला आले आहे. भारत आणि या प्रदेशातील हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक बंध आणि लोकांचे लोकांशी असलेले संबंध हे आपल्या एकत्रित वारशाचे जिवंत उदाहरण आहे. आम्ही हे क्षेत्र एक विस्तारित शेजार म्हणून नव्हे तर एक विस्तारित कुटुंब म्हणून पाहतो.12 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी कल्पना आणि सूचना शेअर करा
January 09th, 12:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2022 रोजी, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार असून ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत. पंतप्रधानांच्या या भाषणासाठी तरुणांना त्यांच्या सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पंतप्रधान त्यांच्या भाषणात यापैकी काही सूचनांचा समावेश करतील.कर्नाटकच्या टुमकुरु येथील युवा संमेलनात पंतप्रधान नरेंद मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून युवकांशी साधलेला संवाद, 4 मार्च 2018
March 04th, 04:24 pm
परम श्रद्धेय स्वामी गौतमानंदजी महाराज, स्वामी जीतकामानंदजी महाराज, स्वामी निर्भयानंद सरस्वतीजी, स्वामी विरेशानंदजी सरस्वतीमहाराज, स्वामी परमानंदजी महाराज, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे आलेले ऋषीमुनी आणि संतगण आणि मोठ्या संख्येने उपस्थित माझ्या युवा मित्रांनो,ರಾಮಕೃಷ್ಣ-ವಿವೇಕಾನಂದ ಆಶ್ರಮ, ರಾಮಕೃಷ್ಣ ನಗರ, ತುಮಕೂರು ಇಲ್ಲಿನ ಯುವ ಸಮ್ಮೇಳನ ಹಾಗೂ ಸಾಧು-ಭಕ್ತ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಇವರ ಭಾಷಣ
March 04th, 03:23 pm
ರಾಮಕೃಷ್ಣ-ವಿವೇಕಾನಂದ ಆಶ್ರಮ, ರಾಮಕೃಷ್ಣ ನಗರ, ತುಮಕೂರು ಇಲ್ಲಿನ ಯುವ ಸಮ್ಮೇಳನ ಹಾಗೂ ಸಾಧು-ಭಕ್ತ ಸಮ್ಮೆಳನದಲ್ಲಿ ಗೌರವಾನ್ವಿತ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಇವರ ಭಾಷಣपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विडिओ कॉन्फरन्स द्वारे कर्नाटकातील टूमकुरू येथे युवा परिषदेला केलेले संबोधन
March 04th, 12:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्य पातळीवरील युवा परिषदेला कर्नाटकाच्या टुमकुरू येथे व्हिडीओ कॉन्फरेन्स द्वारे संबोधित केले .