जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा, यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
May 24th, 01:30 pm
जपानचे माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आज दिनांक 24 मे 2022 रोजी टोकियो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.महत्त्वाची माहिती: क्वाड नेत्यांची शिखर परिषद
September 25th, 11:53 am
24 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या पहिल्या प्रत्यक्ष वैयक्तिक उपस्थितीच्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या नेत्यांनी या शिखर परिषदेत संघटनेच्या सदस्य देशांमधील संबध अधिक बळकट करण्याच्या आणि 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक व्यावहारिक सहकार्यासाठी पुढाकार घेण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवर भर दिला. कोविड-19 महामारीला संपुष्टात आणणे, लसींचे उत्पादन वाढवणे आणि सुरक्षित आणि प्रभावी लसी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे,उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे, हवामान संकटाचा सामना करणे, विकसित तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, अंतराळ आणि सायबर सुरक्षा आणि सदस्य देशांमधील उच्च प्रतिभासंपन्न नव्या पिढीची जोपासना करणे यांचा यामध्ये समावेश होता.क्वाड नेत्यांकडून जारी झालेले संयुक्त निवेदन
September 25th, 11:41 am
आम्ही, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका या राष्ट्रांचे नेते आज पहिल्यांदाच ‘क्वाड’ साठी प्रत्यक्ष भेटलो आहोत. या ऐतिहासिक प्रसंगी, आम्ही आमच्या भागीदारीमधली कटिबद्धता आणि प्रदेशाविषयी,- जो आमच्यातील सामाईक सुरक्षा आणि समृद्धीचा आधार आहे- एक मुक्त आणि खुल्या हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र, जे अत्यंत सर्वसमावेशक आणि लवचिक आहे.सहा महिन्यांपूर्वी आमची अखेरची भेट झाली होती. मार्चपासून, कोविड-19 महामारीमुळे संपूर्ण जगच अनेक संकटांचा सामना करत आहे; हवामान बदलविषयक संकट अधिक गहिरे झाले आहे; प्रादेशिक सुरक्षेचा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चालला आहे, आणि आपल्या सर्वच देशांना वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोन्ही दृष्टीने त्याचा काही ना काही तरी फटका बसतो आहे. मात्र, या सगळ्या परिस्थितीत आपल्यातील सहकार्य, पूर्णपणे अबाधित आहे.भारत आणि अमेरिका व्दिपक्षीय बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 24th, 11:48 pm
श्रीयुत राष्ट्राध्यक्ष, आपण माझे आणि माझ्या प्रतिनिधीमंडळाचे ज्या उत्साहाने आणि मैत्रीपूर्ण भावनेने स्वागत केले, त्याबद्दल सर्वात प्रथम मी आपले अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो.पंतप्रधान मोदींची जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्याशी फलदायी चर्चा
September 24th, 03:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यात वॉशिंग्टन डीसी येथे फलदायी बैठक पार पडली. व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना आणखी गती देण्याच्या विविध मार्गांसह इतर अनेक मुद्द्यांवर उभय नेत्यांनी चर्चा केली.अमेरिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
September 22nd, 10:37 am
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणानुसार मी 22 ते 25 सप्टेंबर, 2021 दरम्यान अमेरिका दौऱ्यावर जाणार आहे.पंतप्रधानांनी टोकियो ऑलिंपिकसाठी दिल्या जपानच्या पंतप्रधानांना शुभेच्छा
July 23rd, 01:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिंपिक2020 साठी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांना शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी अहमदाबाद येथील एएमए संस्थेच्या परिसरातील झेन उद्यान आणि कायझेन अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी केलेल भाषण
June 27th, 12:21 pm
झेन उद्यान आणि कायझेन अकादमीच्या लोकार्पणाचा हा प्रसंग भारत आणि जपान या देशांच्या परस्पर संबंधातील सरलता आणि आधुनिकता यांचे प्रतिक आहे. जपानी झेन उद्यान आणि कायझेन अकादमीची स्थापना भारत आणि जपान या देशांदरम्यान असलेले संबंध अधिक दृढ करतील आणि या दोन्ही देशांतील नागरिकांना एकमेकांच्या अधिक जवळ आणतील असा मला विश्वास आहे. ह्योगो प्रांताचे नेते आणि माझे परममित्र गव्हर्नर ईदो तोशिजो यांचे मी या प्रसंगी विशेष आभार मानत आहे. गव्हर्नर ईदो 2017 मध्ये स्वतः अहमदाबादला आले होते. अहमदाबादमध्ये झेन उद्यान आणि कायझेन अकादमीच्या स्थापनेत त्यांनी आणि ह्योगो आंतरराष्ट्रीय संघटनेने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. याप्रसंगी मी गुजरातच्या भारत-जपान मैत्री संघटनेतील सहकाऱ्यांचे देखील अभिनंदन करतो. भारत आणि जपान या देशांतील परस्पर संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठी त्यांनी अथकपणे उल्लेखनीय काम केले आहे. जपान माहिती आणि अभ्यास केंद्र देखील या कार्याचेच एक उदाहरण आहे.अहमदाबादच्या अहमदाबाद व्यवस्थापन संस्थेत पंतप्रधानांनी केले झेन गार्डन आणि कैझन अकादमीचे उद्घाटन
June 27th, 12:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अहमदाबाद येथील अहमदाबाद व्यवस्थापन संस्थेत झेन गार्डन आणि कैझन अकादमीचे उद्घाटन केले.क्वाड सदस्य देशांच्या नेत्यांची पहिली आभासी परिषद
March 11th, 11:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन, जपानचे पंतप्रधान योशिहीदे सुगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांच्यासह, उद्या 12 मार्च 2021 ला होणाऱ्या क्वाड सदस्य देशांच्या आभासी परिषदेत सहभागी होणार आहेतपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान सुगा योशिहिडे यांच्यादरम्यान दूरध्वनीवरून संवाद
March 09th, 08:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान महामहिम सुगा योशिहिडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्यातील दूरध्वनी संभाषण
September 25th, 02:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानचे पंतप्रधान माननीय सुगा योशिहिदे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.जपानच्या पंतप्रधानपदी योशीहिडे सुगा यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
September 16th, 11:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महामहीम योशीहिडे सुगा यांची जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.