नवी दिल्लीत आयोजित भारत टेक्स 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 26th, 11:10 am

मंत्रिमंडळातील माझे सहकारी, पियूष गोयल जी, दर्शना जरदोश जी, विविध देशांचे राजदूत, वरिष्ठ राजनैतिक अधिकारी, केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी, फॅशन आणि वस्त्रोद्योग जगताशी संबंधित सर्व मित्र, तरुण उद्योजक, विद्यार्थी, आपले विणकर आणि आपल्या कारागीर मित्रांनो महोदया आणि महोदय! भारत मंडपम येथे आयोजित भारत टेक्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत ! आजचा हा कार्यक्रम खूप विशेष आहे. विशेष यासाठी आहे : कारण भारतातील दोन सर्वात मोठ्या प्रदर्शन केंद्रांमध्ये म्हणजेच भारत मंडपम आणि यशोभूमीमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी होत आहे. आज 3 हजाराहून अधिक प्रदर्शक... 100 देशांतील सुमारे 3 हजार खरेदीदार... 40 हजारांहून अधिक व्यापारी अभ्यागत... एकाचवेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. हा कार्यक्रम वस्त्रोद्योग कार्यक्षेत्रामधील सर्व भागधारकांना आणि संपूर्ण मूल्य साखळीतील लोकांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत टेक्स 2024 चे उद्घाटन

February 26th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे देशातील सर्वात मोठ्या जागतिक वस्त्रोद्योग कार्यक्रमांपैकी एक अशा भारत टेक्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान आयोजित केलेल्या प्रदर्शनाची देखील पंतप्रधानांनी पाहणी केली.

हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 12th, 03:00 pm

भारतमातेचा जयघोष , भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांच्या पराक्रमाचा हा जयघोष , ही ऐतिहासिक भूमी आणि दीपावलीचा हा पवित्र सण. हा अद्भुत संयोग आहे. हा अद्भुत मिलाफ आहे. समाधान आणि आनंदाने भारावून टाकणारा हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठीही आणि देशवासियांसाठीही दिवाळी प्रकाशमय करेल असा मला विश्वास आहे. मी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना सीमेवरून, शेवटच्या गावातून, ज्याला मी आता पहिले गाव म्हणतो, तिथे तैनात आपल्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करत आहे, त्यामुळे सर्व देशवासियांना दिवाळीच्या या शुभेच्छा देखील खूपच खास आहेत. देशवासियांचे हार्दिक अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा.

हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे पंतप्रधानांनी शूर जवानांसोबत केली दिवाळी साजरी

November 12th, 02:31 pm

जवानांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, दिवाळीचा सण आणि जवानांच्या शौर्याचे गुणगान यांचा संयोग हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अध्यात्मिक अनुभूतीचा क्षण आहे. भारताच्या सीमावर्ती भागातील जवानांसह त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गांव आता देशातील पहिले गाव ठरले आहे.

नवी दिल्लीत आयोजित नवव्या जी-20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेच्या उद्घाटन वेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

October 13th, 11:22 am

भारतात सध्याचा हा काळ उत्सवांचा हंगाम असतो. या दिवसांमध्ये संपूर्ण भारतात खूप मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे केले जातात. मात्र जी-20 ने यावेळेस हे उत्सवी वातावरण आणि त्याचा उत्साह संपूर्ण वर्षभर निर्माण केला. आम्ही पूर्ण वर्षभर जी-20 च्या प्रतिनिधींचे भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आतिथ्य केले आहे. यामुळे या शहरांमध्ये कायम उत्सवी वातावरण टिकून राहिले. त्यानंतर भारताने चंद्रावर स्वारी केली. यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणखी उधाण आले. त्यानंतर, आम्ही इथे दिल्लीतच जी-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केले. आणि आता ही पी-20 शिखर परिषद इथे होत आहे. कोणत्याही देशाची सर्वात मोठी ताकद ही तेथील नागरिक, या नागरिकांची इच्छाशक्ती असते. आज ही परिषद, लोकांसाठी, ही ताकद देखील साजरी करण्याचे एक माध्यम बनले आहे.

पंतप्रधानांनी केले 9व्या जी20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेचे (पी20) उद्घाटन

October 13th, 11:06 am

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जी20 संसदीय अध्यक्षांच्या शिखर परिषदेतील मान्यवरांचे 140 कोटी जनतेच्या वतीने स्वागत केले. “ही शिखर परिषद जगभरातील सर्व संसदीय पद्धतींचा महाकुंभ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. विविध देशातील संसदीय चौकटींचा अनुभव असलेले सर्व प्रतिनिधी येथे उपस्थित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आजच्या कार्यक्रमाबद्दल मोदी यांनी अतिशय समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांच्या हस्ते 13 ऑक्टोबर रोजी 9व्या जी -20 संसदीय अध्यक्ष शिखर परिषदेचे (पी 20) उदघाटन

October 12th, 11:23 am

भारताच्या जी -20 अध्यक्षतेच्या संकल्पनेच्या अनुषंगाने, 9व्या पी- 20 शिखर परिषदेची संकल्पना एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यासाठी संसद ही आहे.या कार्यक्रमाला जी- 20 सदस्य आणि आमंत्रित देशांच्या संसदेचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. 9-10 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्लीत जी 20 प्रमुख नेत्यांच्या शिखर परिषदेमध्ये आफ्रिकन युनियन जी- 20 चा सदस्य झाल्यानंतर संपूर्ण -आफ्रिकन संसद प्रथमच पी -20 शिखर परिषदेत सह्भाग घेणार आहे.

जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनालेमध्ये पंतप्रधानांनी केले भाषण

September 26th, 04:12 pm

दोन आठवड्यांपूर्वी याच भारत मंडपमध्ये जोरदार घडामोडी घडत होत्या. हे भारत मंडपम एकदम ‘हॅपनिंग’ ठिकाण होते आणि मला आनंद आहे की आज माझा भावी भारत त्याच भारत मंडपमध्ये उपस्थित आहे. जी-20 च्या आयोजनाला भारताने ज्या उंचीवर नेले आहे ते पाहून जग आश्चर्यचकित झाले आहे.पण तुम्हाला माहीत आहे की , मी अजिबात थक्क नाही ,मला अजिबात आश्चर्य वाटले नाही.कदाचित तुमच्या मनात असेल की इतके मोठे आयोजन झाले तुम्ही खुश नाही , काय कारण आहे ? माहीत आहे का ? कारण कार्यक्रम यशस्वी करण्याची जबाबदारी तुमच्यासारखे तरुण विद्यार्थी घेतात , तरुणाईचा यात सहभाग असेल तर तो यशस्वी होणार हे निश्चित असते. .

जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट फिनालेला पंतप्रधानांनी केले संबोधित

September 26th, 04:11 pm

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी 20 विद्यापीठ कनेक्ट फिनाले कार्यक्रमाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट हा उपक्रम देशातल्या तरुणांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदाबाबत माहिती देण्यासाठी आणि जी 20 च्या विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आला. पंतप्रधानांनी या प्रसंगी 4 प्रकाशनांचे : The Grand Success of G20 Bharat Presidency: Visionary Leadership, Inclusive Approach (भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे भव्य यश: दूरदर्शी नेतृत्व, सर्वसमावेशक दृष्टिकोन;), India's G20 Presidency: Vasudhaiva Kutumbakam (भारताचे जी 20 अध्यक्षपद: वसुधैव कुटुंबकम; ) , Compendium of G20 University Connect Programme (जी 20 युनिव्हर्सिटी कनेक्ट कार्यक्रमाचे संकलन); आणि Showcasing Indian Culture at G20 (जी 20 मध्ये भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन) यांचे अनावरण केले.

पंतप्रधानांचे संसदेच्या विशेष अधिवेशनात केलेले भाषण

September 18th, 11:52 am

देशाच्या संसदेचा 75 वर्षांचा प्रवास, त्याचे पुन्हा एकदा स्मरण करण्यासाठी आणि नव्या सदनात जाण्यापूर्वी इतिहासातील त्या प्रेरणादायी क्षणांचे स्मरण करत अग्रेसर होण्याची ही वेळ आहे. आपण सर्वजण या ऐतिहासिक भवनातून निरोप घेत आहोत. स्वातंत्र्यापूर्वी हे सदन इंपिरियल लेजिस्लेटीव्ह कौन्सिलचे ठिकाण होते. स्वातंत्र्यानंतर या वास्तूला संसद भवन म्हणून नवीन ओळख मिळाली. हे खरे आहे की, या इमारतीच्या निर्मितीचा निर्णय विदेशी संसदेने घेतला होता, मात्र या भवनाच्या निर्मितीत माझ्याच देशवासियांनी घाम गाळला होता, परिश्रम केले होते आणि धन देखील माझ्याच देशाचे होते.

पंतप्रधानांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाला लोकसभेत केले संबोधित

September 18th, 11:10 am

सभागृहाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, नव्याने उदघाटन झालेल्या इमारतीत कामकाज हलवण्यापूर्वी भारताच्या 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचे पुनःस्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. जुन्या संसद भवनाबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी नमूद केले की भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ही इमारत इम्पीरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल म्हणून काम करत होती आणि स्वातंत्र्यानंतर भारताची संसद म्हणून ओळखली गेली. ही इमारत बांधण्याचा निर्णय जरी परकीय राज्यकर्त्यांनी घेतला असला, तरी भारतीयांची मेहनत, समर्पण आणि पैसा यामुळेच या वास्तूचा विकास झाला याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

September 18th, 10:15 am

चांद्र मोहिमेचे यश, चंद्रयान-3 आपला तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट नवे प्रेरणा केंद्र बनले आहे, तिरंगा पॉईंट आपला अभिमान वाढवत आहे. जगभरात जेव्हा अशी कामगिरी केली जाते तेव्हा त्याला आधुनिकता, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडून त्याकडे पाहिले जाते. आणि जेव्हा हे सामर्थ्य जगासमोर येते, तेव्हा भारतासाठी अनेक शक्यता, अनेक संधी आपल्या दारात येऊन उभ्या राहतात. जी -20 चे अभूतपूर्व यश, जगभरातील नेत्यांचे 60 हून अधिक ठिकाणी स्वागत, विचारमंथन आणि संघराज्य रचनेचा खऱ्या अर्थाने जिवंत अनुभव भारताची विविधता, भारताची वैशिष्ट्ये, जी -20 आपल्या विविधतेचा उत्सव बनला. आणि आपण जी -20 मध्ये ग्लोबल साउथचा आवाज बनल्याचा भारताला नेहमीच अभिमान असेल. आफ्रिकन संघाला मिळालेले स्थायी सदस्यत्व आणि जी -20 मध्ये एकमताने जारी झालेले घोषणापत्र या सर्व गोष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत देत आहेत.

यशोभुमी राष्ट्राला समर्पित करताना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मराठीत अनुवादीत मजकूर

September 17th, 06:08 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी, देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे या भव्य वास्तुत आलेले माझे प्रिय बंधू-भगिनी, देशातील 70 होऊन जास्त शहरांतील माझे सर्व सहकारी, अन्य मान्यवर आणि माझ्या कुटुंबियांनो.

द्वारका सेक्टर 21 ते ‘यशोभूमी द्वारका सेक्टर 25 ’ या विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाइन स्टेशनच्या विस्तारित मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

September 17th, 05:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस मार्गाचा द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 येथील नवीन मेट्रो स्थानक ‘यशोभूमी द्वारका सेक्टर 25’ पर्यंतच्या विस्तार मार्गाचे उद्घाटन केले. नवीन मेट्रो स्थानकात तीन भुयारी मार्ग असतील - स्थानकाला प्रदर्शन हॉल, परिषद केंद्र आणि सेंट्रल एरिना यांना जोडणारा 735 मीटर लांबीचा एक भुयारी मार्ग; द्वारका एक्सप्रेसवे वरील प्रवेश/निर्गमन यांना जोडणारा दुसरा मार्ग ; तर मेट्रो स्थानकाला ‘यशोभूमी’च्या भावी प्रदर्शन हॉलशी जोडणारा तिसरा मार्ग आहे.

पंतप्रधानांनी इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे नवी दिल्लीमध्ये केले लोकार्पण

September 17th, 12:15 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये द्वारका येथे इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर-‘यशोभूमी’च्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले. यशोभूमीमध्ये एक अतिशय भव्य परिषद केंद्र, विविध प्रदर्शन दालने आणि इतर सुविधांचा अंतर्भाव आहे. पंतप्रधानांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने आज पीएम विश्वकर्मा योजनेचा देखील शुभारंभ केला. पीएम विश्वकर्मा बोधचिन्ह, ‘सम्मान, सामर्थ्य, समृद्धी’ या घोषवाक्याचे आणि पोर्टलचे देखील पंतप्रधानांनी उद्घाटन केले. कस्टमाईज्ड स्टँप शीट आणि टूलकिट बुकलेटचे देखील पंतप्रधानांनी यावेळी प्रकाशन केले. पंतप्रधानांनी 18 लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रमाणपत्रांचे वितरण केले. कार्यक्रमस्थळी उपस्थित झाल्यावर पंतप्रधानांनी गुरु शिष्य परंपरा आणि नवे तंत्रज्ञान या प्रदर्शनाची फेरफटका मारून पाहणी केली. त्यांनी यशोभूमीच्या त्रिमितीय प्रतिकृतीची देखील पाहणी केली. त्यापूर्वी पंतप्रधानांनी दिल्ली विमानतळ मेट्रो एक्स्प्रेस लाईनच्या द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 या नव्या मेट्रो स्थानकापर्यंतच्या विस्तारित मार्गाचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये द्वारका इथल्या ‘यशोभूमी’, या भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करणार

September 15th, 04:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता द्वारका, नवी दिल्ली येथे 'यशोभूमी' इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर (आयआयसीसी), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करतील. पंतप्रधान यावेळी द्वारका सेक्टर 21 आणि यशोभूमी द्वारका सेक्टर 25 येथील नवीन मेट्रो स्थानक यांना जोडणाऱ्या दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस मार्गाच्या विस्तारित मार्गीकेचे उद्घाटनही करतील.