पंतप्रधानांची फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांसोबत भेट
July 14th, 09:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रेंच नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्ष येल ब्राऊन पिवेट आणि असेंब्लीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. 14 जुलै 2023 रोजी पॅरिसमधील हॉटेल डी लासे येथे असेंब्लीच्या अध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानी दुपारच्या भोजनाच्या वेळी ही भेट झाली.