पंतप्रधान 16 फेब्रुवारीला टेरीच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत उद्घाटनपर भाषण करणार
February 15th, 11:32 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी द एनर्जी अँड रिसोर्सेस (टेरी) या संस्थेच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेमध्ये 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उद्घाटनपर भाषण करणार आहेत.पंतप्रधान 10 फेब्रुवारी रोजी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2021 चे उद्घाटन करणार
February 08th, 05:51 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2021 चे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. ‘आपल्या सामायिक भविष्याची पुनर्व्याख्या : सर्वांसाठी सुरक्षित आणि संरक्षित वातावरण’ ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे. गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे, मालदीवच्या पीपल्स मजलिसचे सभापती मोहम्मद नशीद, संयुक्त राष्ट्रसंघाच्या उपमहासचिव अमीना जे मोहम्मद आणि केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत.जागतिक शाश्वत विकास परिषद(डब्ल्यूएसडीएस 2018) च्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 16th, 11:30 am
जागतिक निरंतर विकास परिषदेचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. परदेशात आम्हाला सामील होणाऱ्यांचे भारतामध्ये स्वागत आहे. दिल्लीमध्ये स्वागत आहे.जागतिक शाश्वत विकास परिषद 2018 चे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
February 15th, 03:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवार 16 फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे जागतिक शाश्वत विकास परिषद 2018 चे उद्घाटन करणार आहेत. ऊर्जा आणि संसाधने संस्थेचे (टेरी) जागतिक शाश्वत विकास परिषद हे महत्त्वाकांक्षी व्यासपीठ आहे. शाश्वत विकास, ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील जागतिक नेते आणि विचारवंत यानिमित्त व्यासपीठावर येणार आहेत.