दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषद 2024 दरम्यान पंतप्रधानांनी घेतली मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांची भेट

February 14th, 02:55 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुबई येथे जागतिक सरकारांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष एंड्री राजोएलिना यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती.

जागतिक सरकार शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 14th, 02:30 pm

जागतिक सरकार शिखर परिषदेत मुख्य भाषण देणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.आणि हे भाग्य मला दुसऱ्यांदा मिळत आहे. या निमंत्रणासाठी आणि शानदार स्वागतासाठी मी महामहिम शेख मोहम्मद बिन रशीद जी यांचा खूप खूप आभारी आहे.मी माझे बंधू महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद यांचेही आभार मानतो. अलीकडच्या काळात त्यांना अनेकदा भेटण्याची संधी मला मिळाली. ते केवळ दूरदृष्टी असलेले नेतेच नाहीत तर संकल्प आणि वचनबद्धता दर्शवणारे देखील नेते आहेत.

जागतिक सरकार शिखर परिषद 2024 मध्ये पंतप्रधान सहभागी

February 14th, 02:09 pm

संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि दुबईचे शासक महामहीम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे जागतिक सरकार शिखर परिषदेत सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले. भविष्यातील सरकारांना आकार देणे या परिषदेच्या संकल्पनेवर पंतप्रधानांनी विशेष मुख्य भाषण केले . 2018 मधील जागतिक सरकार शिखर परिषदेला देखील पंतप्रधान सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी या शिखर परिषदेत 10 राष्ट्राध्यक्ष आणि 10 पंतप्रधानांसह 20 जागतिक नेते सहभागी झाले. या जागतिक परिषदेला120 हून अधिक देशांची सरकारे आणि प्रतिनिधी उपस्थित होते.