नेदरलँडच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान पंतप्रधानांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन (24 मे 2018 )
May 24th, 03:39 pm
पंतप्रधान मार्क, आणि त्यांच्या समवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतात हार्दिक स्वागत. पंतप्रधान मार्क यांच्या समवेत मंत्रीमंडळातले त्यांचे 4 सहकारी, हेगचे मेयर आणि 200 हून अधिक व्यापारी प्रतिनिधी भारतात आले आहेत याचा मला विशेष आनंद आहे. नेदरलँड मधून भारतात आलेले हे सर्वात मोठे व्यापारी प्रतिनिधी मंडळ आहे. दोनही देशादरम्यान व्यापार आणि गुंतवणूक संबंध किती गतिशील आहेत याचेच हे द्योतक आहे. 2015 मधे पंतप्रधान रूट पहिल्यांदा भारतात आले. 2017 मधे मी नेदरलँड दौरा केला आणि आमची तिसरी भेट आज होत आहे. असे खूप कमी देश आहेत ज्यांच्या समवेत आपल्या असलेल्या संबंधात इतक्या वेगाने उच्चस्तरीय भेटी होतात. ही गती आणि भारताबरोबरच्या संबंधाना प्राधान्य दिल्याबद्दल मी माझे मित्र मार्क यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद २०१७, मध्ये पंतप्रधानांचे भाषण
November 28th, 03:46 pm
अमेरिकेच्या सहकार्याने, भारतात जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद, २०१७ आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पहिल्यांदाच ही परिषद दक्षिण आशियात होत आहे.जागतिक उद्यमशीलता व्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने, ही शिखर परिषद एक उत्तम व्यासपीठ आहे.पंतप्रधानांनी अन्न प्रक्रिया क्षेत्रातील जागतिक स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला
November 03rd, 07:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील अन्नप्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रातील अव्वल कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी आज संवादन साधला. भारतात सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमाचा हा एक भाग होता.Social Media Corner for 3rd November 2017
November 03rd, 06:59 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!जागतिक अन्नपरिषद २०१७ मध्ये पंतप्रधानांचे भाषण
November 03rd, 10:05 am
अन्नप्रक्रिया क्षेत्रातले जागतिक नेते आणि दिग्गज मंडळीच्या या संमेलनात सहभागी होण्यात मला विशेष आनंद होतो आहे. जागतिक अन्न परिषद, २०१७ मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो.