विश्व भारतीय खाद्य महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
September 19th, 12:30 pm
विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 च्या आयोजनाबद्दल जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. जगातील विविध भागातून आलेल्या सर्व सहभागींचे स्वागत आणि खूप शुभेच्छा.भारत मंडपम येथे विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 03rd, 11:00 am
या कार्यक्रमात उपस्थित असलेले केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी पीयूष गोयलजी, गिरीराज सिंहजी,पशुपती पारसजी, पुरुषोत्तम रुपालाजी, प्रल्हाद सिंह पटेलजी, जगभरातील विविध देशांमधून आलेले सर्व पाहुणे, राज्य सरकारांतील मंत्री, उद्योगविश्व आणि स्टार्ट अप जगतातील सर्व सहकारी, देशभरातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेले शेतकरी बंधू-भगिनी, स्त्री-पुरुषहो, तुम्हा सर्वांचे विश्व भारतीय खाद्य महोत्सवात स्वागत आहे, तुम्हा सर्वांचे अभिनंदन.पंतप्रधानांच्या हस्ते विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 चे उद्घाटन
November 03rd, 10:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी, ‘विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023’ या खाद्यान्नविषयक महा प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांना बळकट करण्याच्या उद्देशाने यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते बचत गटाच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना बीज भांडवल सहाय्य वितरीत करण्यात आले. या प्रसंगी मांडण्यात आलेल्या प्रदर्शनातून पंतप्रधानांनी फेरफटका मारला. भारताला ‘जगाचे फूड बास्केट’ या स्वरुपात सादर करणे तसेच 2023 हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’म्हणून साजरे करणे हा या महोत्सवाच्या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.पंतप्रधानांच्या हस्ते उद्या,3 नोव्हेंबर रोजी जागतिक भारतीय अन्न प्रदर्शन 2023 चे उद्घाटन
November 02nd, 06:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जागतिक भारतीय अन्न 2023’ या खाद्यान्नविषयक महा प्रदर्शनाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन करणार आहेत. हा कार्यक्रम उद्या, 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे होणार आहे.