भारत आणि स्वीडन यांनी कॉप -28 मध्ये उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे भूषवले सह-यजमानपद
December 01st, 08:29 pm
दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे 2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत यांना एकमेकांशी जोडेल.जागतिक हवामान बदल कृती परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दुबई ला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
November 30th, 05:44 pm
माझे बंधू दुबईचे राष्ट्राध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक महामहिम शेख मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्या निमंत्रणावरून मी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या कॉप २८ जागतिक हवामान बदल कृती परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दुबईला जात आहे. हवामान बदल क्षेत्रात भारताचा निकटचा भागीदार असलेल्या दुबईच्या अध्यक्षतेखाली ही अतिशय महत्वाची परिषद होत असल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.