आयसीए जागतिक सहकारी परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
November 25th, 03:30 pm
भूतानचे पंतप्रधान आणि माझे धाकटे बंधू, फिजीचे उपपंतप्रधान, भारताचे सहकार मंत्री अमित शाह, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्राचे सर्व प्रतिनिधी, जगभरातून आलेले सहकार विश्वाशी संबंधित सर्व मित्र, भगिनी आणि सद्गृहस्थ हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आयसीए जागतिक सहकार परिषदेचे उद्घाटन
November 25th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ICA ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स 2024 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमात संबोधित करताना मोदी यांनी भूतानचे पंतप्रधान महामहिम दाशो शेरिंग तोबगे, फिजीचे उपपंतप्रधान महामहिम मानोआ कामिकामिका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भारतातील संयुक्त राष्ट्रांचे निवासी समन्वयक शोम्बी शार्प, आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष अलायन्स मिस्टर एरियल ग्वार्को, परदेशातील विविध मान्यवर आणि आयसीए जागतिक सहकार परिषदेतील महिला आणि पुरुषांचे स्वागत केले. मोदी म्हणाले की, हे स्वागत केवळ त्यांच्या एकट्याकडून नव्हे तर हजारो शेतकरी, पशुपालक, मच्छीमार, 8 लाखांहून अधिक सहकारी संस्था, बचत गटांशी संबंधित 10 कोटी महिला आणि सहकारात तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात गुंतलेल्या युवा वर्गाकडून केले जात आहे.The bond between India & Guyana is of soil, of sweat, of hard work: PM Modi
November 21st, 08:00 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed the National Assembly of the Parliament of Guyana today. He is the first Indian Prime Minister to do so. A special session of the Parliament was convened by Hon’ble Speaker Mr. Manzoor Nadir for the address.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाच्या संसदेला केले संबोधित
November 21st, 07:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित केले. गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. गयाना संसदेचे अध्यक्ष मन्झूर नादिर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते."सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा" या विषयावरील जी 20 सत्रात पंतप्रधानांचे भाषण
November 18th, 08:00 pm
सुरुवातीलाच, जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल तसेच यशस्वी जी 20 अध्यक्षतेसाठी अध्यक्ष लुला यांचे अभिनंदन करू इच्छितो.सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
November 18th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा’ या विषयावरील जी 20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला आज संबोधित केले. शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि प्रेमळ आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे अध्यक्ष महामहिम लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांचे आभार मानले. शाश्वत विकास उद्दिष्टांवर केंद्रित ब्राझीलच्या जी 20 कार्यक्रम पत्रिकेचे त्यांनी कौतुक केले. हा दृष्टिकोन ग्लोबल साऊथच्या समस्या अधोरेखित करतो तसेच नवी दिल्ली जी 20 शिखर परिषदेचे लोककेंद्रित निर्णय पुढे नेतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य साठी भारतीय जी 20 अध्यक्षतेने दिलेला नारा रिओ चर्चेत देखील गुंजत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.PM Modi delivers impactful addresses in Chhatrapati Sambhajinagar, Panvel & Mumbai, Maharashtra
November 14th, 02:30 pm
In powerful speeches at public meetings in Chhatrapati Sambhajinagar, Panvel & Mumbai, Prime Minister Narendra Modi highlighted the crucial choice facing Maharashtra in the upcoming elections - between patriotism and pisive forces. PM Modi assured the people of Maharashtra that the BJP-Mahayuti government is dedicated to uplifting farmers, empowering youth, supporting women, and advancing marginalized communities.पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राला भेट देणार
September 18th, 09:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास ते पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.नवी दिल्लीत दुसऱ्या आशिया प्रशांत नागरी विमान वाहतूक मंत्र्यांच्या परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 12th, 04:00 pm
सर्व देशांच्या मान्यवरांचे मी मनापासून स्वागत करतो आणि या दोन दिवसीय शिखर परिषदेत तुम्ही या क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे. मला विश्वास आहे की, नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ञ मंडळी इथे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जे आपल्या सर्वांच्या वचनबद्धतेचे आणि आशिया-प्रशांत क्षेत्राच्या क्षमतेचे प्रतिबिंब आहे. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि 80 हजार झाडे लावण्याचा आणि ती ही आईच्या नावाने लावण्याचा एक मोठा उपक्रम आपले मंत्री नायडू जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली हाती घेण्यात आला. मात्र मी आणखी एका विषयाकडे तुमचे लक्ष आकर्षित करू इच्छितो, आपल्या देशात जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते, तेव्हा तो आनंद एका वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो; आणि आपल्याकडे आपल्या पूर्वजांनी जे काही गणित मांडले आहे, ते म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती 80 वर्षांची होते तेव्हा त्या व्यक्तीने सहस्त्रचंद्रदर्शन म्हणजेच एक हजार वेळा पूर्ण चंद्र पाहिलेला असतो. याचा अर्थ या क्षेत्रातील आपल्या संघटनेने देखील एक हजार पौर्णिमा पाहिल्या आहेत आणि उड्डाण करून एक प्रकारे त्याला जवळून पाहण्याचा अनुभव देखील घेतला आहे. तर या पृथ्वीच्या लाटेतही 80 वर्षांचा हा अविस्मरणीय प्रवास, यशस्वी प्रवास अभिनंदनास पात्र आहे.