हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 16th, 10:15 am
100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका आणखी दिवसाचे वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2024 ला केले संबोधित
November 16th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे हिंदुस्थान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद 2024 ला (Hindustan Times Leadership Summit 2024) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या हस्ते हिंदुस्थान टाईम्सच्या प्रवासाची सुरूवात झाली असल्याची घटना आपल्या संबोधनात नमूद केली आणि हिंदुस्थान टाईम्सच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आणि प्रारंभापासून या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचे अभिनंदनही केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी आयोजनस्थळी उभारलेल्या हिंदुस्थान टाईम्सच्या प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनाला भेट देणे हा समृद्ध करणारा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत, सर्व प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटना लागू झाली तेव्हाची जुनी वर्तमानपत्रं आपण पाहिली असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मार्टिन ल्युथर किंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. एम. एस. स्वामीनाथन अशा अनेक दिग्गजांनी हिंदुस्थान टाईम्ससाठी लेख लिहिले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हिंदुस्थान टाईम्सचा प्रवास प्रचंड प्रदीर्घ आहे, हा प्रवास स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे, आणि त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळात आशेच्या दिशेने वाटचाल करणारा हा प्रदीर्घ प्रवास अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1947 सालच्या ऑक्टोबर महिन्यात आपणही इतर नागरिकांप्रमाणेच काश्मीर भारतात विलीन झाल्याची बातमी वाचली होती, आणि ही बातमी वाचून आपला इतरांप्रमाणे प्रचंड उत्साह वाटला होता हा अनुभवही पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मात्र अनिर्णयकी वृत्तीमुळे काश्मीर सात दशके हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असल्याची जाणिवही आपल्याला त्या क्षणाने करून दिली होती असेही त्यांनी सांगितले. पण आजच्या स्थितीत जम्मू - काश्मीरमधील निवडणुकीत विक्रमी प्रमाणात मतदान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत, आणि ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. एकदा एका वर्तमानपत्रात एका बाजूला आसामला अशांत क्षेत्र घोषित केल्याची बातमी छापलेली होती, तर दुसऱ्या बाजुला अटलजींनी भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केल्याची बातमी छापलेली बातमी आपण पाहिल्याचा अनुभवही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसोबत सामायिक केला. याच अनुभवाचा संदर्भ देत आज भाजपा आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे आणि हा मनाला शांती देणारा योगायोग आहे असे ते म्हणाले.Mission of cleanliness is not a one day ritual but a lifelong ritual: PM Modi
October 02nd, 10:15 am
PM Modi commemorated the 10th anniversary of the Swachh Bharat Mission at Vigyan Bhawan, New Delhi. He launched sanitation projects worth over Rs 9,600 crore and emphasized the movement's significance as a public initiative involving millions of citizens. Highlighting collective efforts and community contributions, PM Modi celebrated the mission as a historic achievement that showcases India's commitment to cleanliness and environmental sustainability. The theme for this year’s campaign is “Swabhav Swachhata, Sanskaar Swachhata.”पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिन 2024 मध्ये झाले सहभागी
October 02nd, 10:10 am
स्वच्छ भारत या एका महत्वाच्या लोकचळवळीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 155 व्या गांधी जयंती निमित्त नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात आयोजित स्वच्छ भारत दिवस 2024 च्या कार्यक्रमात सहभागी झाले. मोदी यांनी रु 9600 कोटी हुन जास्त खर्चाच्या अनेक स्वच्छता प्रकल्पांचा शुभारंभ केला आणि कोनशिला बसवली. यात अमृत आणि अमृत 2.0, स्वच्छ गंगा राष्ट्रीय प्रकल्प तसेच गोबरधन योजनेचा समावेश आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ हे स्वच्छता ही सेवा 2024 चे बोधवाक्य आहे.Fact Sheet: Quad Countries Launch Cancer Moonshot Initiative to Reduce the Burden of Cancer in the Indo-Pacific
September 22nd, 12:03 pm
The Quad countries—US, Australia, India, and Japan—launched the Quad Cancer Moonshot to combat cervical cancer in the Indo-Pacific. This initiative aims to strengthen cancer care by enhancing health infrastructure, promoting HPV vaccination, increasing screenings, and expanding treatment. During the Quad Leaders' Cancer Moonshot event, India commited to providing HPV sampling kits, detection tools and cervical cancer vaccines worth $7.5 million to the Indo-Pacific region.The Wilmington Declaration Joint Statement from the Leaders of Australia, India, Japan, and the United States
September 22nd, 11:51 am
PM Modi joined leaders from the U.S., Australia, and Japan for the fourth Quad Leaders Summit in Wilmington, Delaware. The Quad reaffirmed its commitment to a free, open, and inclusive Indo-Pacific, opposing destabilizing actions and supporting regional peace, security, and sustainable development. The leaders emphasized respect for international law, democratic values, and regional institutions like ASEAN and the Pacific Islands Forum.क्वाड नेत्यांच्या कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
September 22nd, 06:25 am
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बायडन यांचे हार्दिक अभिनंदन करतो. परवडण्याजोग्या, सहज उपलब्ध होण्याजोग्या आणि गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवे बाबतच्या आमच्या ठाम दृढ निश्चयाची यातून प्रचिती मिळत आहे. कोविड साथीदरम्यान आम्ही इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी ‘क्वाड लसीकरण उपक्रम’ राबवला होता आणि मला हे सांगताना आनंद होतो आहे की क्वाड च्या माध्यमातून आम्ही सर्व्हायकल कॅन्सर सारख्या समस्यांचा एकत्र येऊन सामना करायचा निर्णय घेतला आहे.क्वाड कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान राहिले उपस्थित
September 22nd, 06:10 am
डेलावेर मध्ये विल्मिंग्टन येथे क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर बायडेन ज्युनियर यांनी आयोजित केलेल्या क्वाड कर्करोग मूनशॉट कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.विश्व भारतीय खाद्य महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
September 19th, 12:30 pm
विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 च्या आयोजनाबद्दल जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. जगातील विविध भागातून आलेल्या सर्व सहभागींचे स्वागत आणि खूप शुभेच्छा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जल संचय जन भागीदारी' उपक्रमाचा केला शुभारंभ
September 06th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे ‘जल संचय जन भागिदारी’ उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जल संचय जन भागीदारी' उपक्रमाचा केला शुभारंभ
September 06th, 12:30 pm
या कार्यक्रमांतर्गत, पावसाच्या पाण्याचा संचय वाढविण्यासाठी आणि दीर्घकाळ पाण्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात अंदाजे 24,800 रेनवॉटर हार्वेस्टिंग, अर्थात पावसाचे पाणी साठवणाऱ्या संरचना बांधल्या जातील.जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर एमपॉक्स परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने देखरेख
August 18th, 07:42 pm
पंतप्रधानांनी सूचना केल्यानुसार पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांनी देशात एमपॉक्स या आजारासंदर्भात सज्जतेच्या स्थितीचा आणि संबंधित सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांचा आढावा घेणाऱ्या एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.गुजरातमधील राजकोट येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 25th, 07:52 pm
आजच्या या कार्यक्रमात देशातील अनेक राज्यांमधून इतर लोकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, हे सर्वजण दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्या सर्वांचेही मी मनापासून अभिनंदन करतो.गुजरातमध्ये राजकोट इथे 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण आणि पायाभरणी
February 25th, 04:48 pm
या संपूर्ण कार्यक्रमाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणाली द्वारे, उपस्थित राज्यांचे माननीय राज्यपाल आणि मुख्यमंत्री, संसद सदस्य आणि विधानसभांचे सदस्य तसेच केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. एकेकाळी सर्व प्रमुख विकास कार्यक्रम एकट्या नवी दिल्लीत पार पडत असत त्या काळाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, सध्याच्या सरकारने हा रिवाज बदलून भारत सरकारला देशाच्या कानाकोपऱ्यात नेले, या बाबीवर प्रकाश टाकला. “राजकोटमधील आजचा हा कार्यक्रम, या विश्वासाचा पुरावा आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, नवीन परंपरा पुढे नेत, प्रकल्पांचे राष्ट्रांर्पण आणि पायाभरणी समारंभ आता देशातील अनेक ठिकाणी होत आहेत. जम्मूमधील एका कार्यक्रमातून झालेल्या IIT भिलाई, IIT तिरुपती, IIIT कुर्नूल, IIM बोधगया, IIM जम्मू, IIM विशाखापट्टणम आणि IIS कानपूर या शैक्षणिक संस्थांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाची आठवण करून देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज एम्स राजकोट, एम्स रायबरेली, एम्स मंगलागिरी, एम्स भटिंडा आणि एम्स कल्याणी यांचे उद्घाटन असेच होत आहे. विशेषत: जेव्हा आपण या 5 एम्स कडे पाहतो तेव्हा विकसनशील भारतामध्ये वेगाने कामे पूर्ण केली जात आहेत हे लक्षात येते, असे मोदी पुढे म्हणाले.राम प्रत्येकाच्या हृदयात आहे: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
January 28th, 11:30 am
यावेळी देशातील अनेकांनी राम भजने गाउन श्री रामाच्या चरणी समर्पित केली. 22 जानेवारीच्या संध्याकाळी संपूर्ण देशाने रामज्योती लावून दिवाळी साजरी केली. या काळात, देशाने सामूहिकतेमधील शक्ती पाहिली. ही सामूहिकतेची शक्ती आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पांचादेखील एक प्रमुख आधार आहे. मी देशवासियांना, मकर संक्रांती ते 22 जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्याची विनंती केली होती. हे ऐकून मला आनंद झाला की लाखो लोक ह्या अभियानात भक्तीभावाने सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातील धार्मिक स्थळांची स्वच्छता केली. अनेक लोकांनी मला यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाठवले आहेत. ही भावना, ही इच्छा कधीच संपू नये, ही मोहीम थांबू नये. सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल.पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संग्रहित कार्याच्या विमोचनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
December 25th, 04:31 pm
मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अनुराग ठाकूर जी, अर्जुन राम मेघवाल जी, महामना संपूर्ण वाङ्ग्मयाचे मुख्य संपादक माझे खूप जुने मित्र रामबहादुर राय जी, महामना मालवीय मिशनचे अध्यक्ष प्रभुनारायण श्रीवास्तव जी, मंचावर विराजमान सर्व ज्येष्ठ सहयोगी, बंधू आणि भगिनींनो,पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य' चे प्रकाशन
December 25th, 04:30 pm
महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथं झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संग्रहित वाङ्मय साहित्य ' च्या 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचं प्रकाशन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना पुष्पांजली वाहिली. पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींमत्वांमध्ये त्यांनी आघाडीचं स्थान प्राप्त केलं आहे. एक सर्वोत्कृष्ट विद्वान आणि स्वातंत्र्यसैनिक असलेले मदन मोहन मालवीय यांचं जनतेत राष्ट्रीयत्वाची भावना जागृत करणारे व्यक्तिमत्व म्हणून स्मरण केलं जाते.The East Asia Summit plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia: PM Modi
September 07th, 01:28 pm
PM Modi addressed the East Asia Summit in Jakarta, Indonesia. He said the East Asia Summit is a very important platform. It is the only leaders-led mechanism for dialogue and cooperation on strategic matters in the Indo-Pacific region. He added that additionally, it plays a pivotal role as the primary confidence-building mechanism in Asia and the key to its success is ASEAN centrality.20 वी आसियान-भारत शिखर परिषद आणि 18 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
September 07th, 11:47 am
आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्यावर आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी आसियान भागीदारांशी, आसियान-भारत शिखर परिषदेत, पंतप्रधानांनी विस्तृत चर्चा केली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील आसियानच्या केंद्रस्थानाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. भारताच्या हिंद-प्रशांत महासागर पुढाकार (IPOI) आणि हिंद-प्रशांत (AOIP) वरील आसियानचा दृष्टीकोन यांच्यातील समन्वयावरही त्यांनी प्रकाश टाकला. आसियान-भारत एफटीएचा (AITIGA) आढावा कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.विसाव्या आसियान -भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 07th, 10:39 am
अशा प्रसंगी भारत– आसियान शिखर संमेलनात सहअध्यक्षपद भूषविणे,ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची पर्वणी आहे