पश्चिम बंगाल, कोलकाता येथे G20 भ्रष्टाचार विरोधी मंत्री स्तरीय बैठकीसाठी पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
August 12th, 10:21 am
पहिल्यावहिल्या G20 भ्रष्टाचार विरोधी मंत्रीस्तरीय बैठकीत आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. तुम्ही जमला आहात ते कोलकाता येथे , नोबेल पारितोषिक प्राप्त गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्या शहरात. त्यांच्या लेखनात त्यांनी आपल्याला सत्य आकलन न होऊ देणाऱ्या लोभ या स्वभावविशेषाच्या बाबतीत सावध केले होते. पुरातन भारतीय उपनिषदांमध्ये ‘मा ग्रिध’ म्हणजे लोभाचे नामोनिशाण उरू नये अशी प्रार्थना केली आहे.जी20 भ्रष्टाचार विरोधी मंत्रीस्तरीय बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित
August 12th, 09:00 am
भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका गरीब आणि उपेक्षितांना बसत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. याचा संसाधनांच्या वापरावर परिणाम होतो, बाजार मनमानी होतो, सेवा वितरणावर परिणाम होतो आणि शेवटी लोकांच्या जीवनाची गुणवत्ता कमी होते असे ते म्हणाले. अर्थशास्त्रातील कौटिल्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, राज्यातील लोकांचे कल्याण करण्यासाठी राज्याच्या संसाधनांमध्ये वाढ करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भ्रष्टाचाराचा सामना करण्याची गरज व्यक्त करत, हे सरकारचे लोकांप्रतीचे पवित्र कर्तव्य आहे असे त्यांनी सांगितले.