पंतप्रधान 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी गुजरात आणि उत्तर प्रदेश दौऱ्यावर

February 21st, 11:41 am

पंतप्रधान, 22 फेब्रुवारी रोजी, सकाळी 10:45 वाजता, अहमदाबाद येथे, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघाच्या (जीसीएमएमएफ) सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. ते दुपारी 12:45 वाजता महेसाणा येथे पोहोचतील आणि वलीनाथ महादेव मंदिरात पूजा करतील तसेच दर्शन घेतील. त्यानंतर, दुपारी 1 वाजता, महेसाणातील तारभ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील. ते येथे 8,350 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील. पंतप्रधान, दुपारी 4:15 च्या सुमारास नवसारी येथे पोहोचतील. तिथे ते सुमारे 24,700कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, पायाभरणी आणि कामांचा प्रारंभ करतील. संध्याकाळी सुमारे 6:15 वाजता, काक्रापार अणुऊर्जा केंद्राला ते भेट देतील.

स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टरचे १० संच तयार करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

May 17th, 06:28 pm

भारताच्या स्थानिक अणुऊर्जा कार्यक्रमाला गती देण्यासाठी आणि देशाच्या परमाणू उद्योगाला चालना देण्यासाठी, केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वदेशी बनावटीच्या प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिऍक्टरचे १० संच तयार करायला मंजुरी दिली. या क्षेत्रात 'मेक इन इंडिया' उपक्रमांमधील हा महत्वपूर्ण उपक्रम असेल. या मंजुरीमुळे, आमच्या देशासाठी तंत्रवैज्ञानिक क्षमता उभारण्यासंबंधी आमच्या वैज्ञानिकांच्या पात्रतेवर असणारा विश्वास प्रकट होतो.