राजस्थानमध्ये जयपूर इथे ‘एक वर्ष –परिणाम उत्कर्ष’ कार्यक्रम आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
December 17th, 12:05 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी सी. आर. पाटील, भगीरथ चौधरी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, प्रेम चंद भेरवा आणि अन्य मंत्री, खासदार, राजस्थानचे आमदार, मान्यवर व्यक्ती तसंच राजस्थानमधल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे 'एक वर्ष-परिणाम उत्कर्ष' या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी
December 17th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ' एक वर्ष-परिणाम उत्कर्ष':राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या चमूने केलेल्या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक केले . पहिल्या वर्षाने पुढील अनेक वर्षांच्या विकासासाठी एक भक्कम पाया म्हणून काम केले आहे , असे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचेच दर्शन घडत नाही तर राजस्थानच्या तेजस्वी प्रकाशाचे आणि विकासाच्या उत्सवाचे ते प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अलीकडेच रायझिंग राजस्थान शिखर परिषद 2024 च्या वेळी दिलेल्या भेटीचे स्मरण करत यावेळी जगभरातील अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते आणि आज 45,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या प्रकल्पांमुळे राजस्थानमधील पाण्याशी संबंधित समस्यांवर योग्य तोडगा निघेल आणि राजस्थान भारतातील परस्परांशी जोडलेल्या सर्वात चांगल्या राज्यांपैकी एक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विकासकामांमुळे अधिकाधिक गुंतवणूकदार आकर्षित होतील, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल तसेच राजस्थानमधील शेतकरी, महिला आणि तरुणांना फायदा होईल, असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.पंतप्रधान 9 डिसेंबरला राजस्थान आणि हरियाणाच्या दौऱ्यावर
December 08th, 09:46 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर रोजी राजस्थान आणि हरियाणाला भेट देणार आहेत. ते प्रथम जयपूरला जाणार असून सकाळी 10:30 वाजता त्यांच्या हस्ते जयपूर एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (JECC) येथे रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूकदार परिषद 2024 चे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर पंतप्रधान पानिपतला जाणार असून दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते एलआयसीच्या विमा सखी योजनेचा प्रारंभ तसेच महाराणा प्रताप उद्यानविद्या विद्यापीठाच्या मुख्य परिसराची पायाभरणी करणार आहेत.Mahayuti government stands firmly on the side of national unity and development: PM in Mumbai
November 14th, 02:51 pm
PM Modi addressed the public meeting in Mumbai, emphasizing the choice Maharashtra faces in the upcoming elections: a government committed to progress or one mired in pisive politics. He recalled the legacy of Maharashtra’s great leaders like Balasaheb Thackeray, who first raised the demand to rename Aurangabad to Chhatrapati Sambhajinagar. Despite opposition from Congress, the Mahayuti government fulfilled this promise, highlighting the contrast between the BJP’s respect for Maharashtra's pride and Congress’s attempts to obstruct progress.The Mahayuti government delivered on its promise to rename Aurangabad as Chhatrapati Sambhajinagar: PM Modi
November 14th, 02:40 pm
In a powerful address at a public meeting in Chhatrapati Sambhajinagar, Prime Minister Narendra Modi highlighted the crucial choice facing Maharashtra in the upcoming elections - between patriotism and pisive forces. PM Modi assured the people of Maharashtra that the BJP-Mahayuti government is dedicated to uplifting farmers, empowering youth, supporting women, and advancing marginalized communities.PM Modi delivers impactful addresses in Chhatrapati Sambhajinagar, Panvel & Mumbai, Maharashtra
November 14th, 02:30 pm
In powerful speeches at public meetings in Chhatrapati Sambhajinagar, Panvel & Mumbai, Prime Minister Narendra Modi highlighted the crucial choice facing Maharashtra in the upcoming elections - between patriotism and pisive forces. PM Modi assured the people of Maharashtra that the BJP-Mahayuti government is dedicated to uplifting farmers, empowering youth, supporting women, and advancing marginalized communities.Mahayuti in Maharashtra, BJP-NDA in the Centre, this means double-engine government in Maharashtra: PM Modi in Chimur
November 12th, 01:01 pm
Campaigning in Maharashtra has gained momentum, with PM Modi addressing a public meeting in Chimur. Congratulating Maharashtra BJP on releasing an excellent Sankalp Patra, PM Modi said, “This manifesto includes a series of commitments for the welfare of our sisters, for farmers, for the youth, and for the development of Maharashtra. This Sankalp Patra will serve as a guarantee for Maharashtra's development over the next 5 years.PM Modi addresses public meetings in Chimur, Solapur & Pune in Maharashtra
November 12th, 01:00 pm
Campaigning in Maharashtra has gained momentum, with PM Modi addressing multiple public meetings in Chimur, Solapur & Pune. Congratulating Maharashtra BJP on releasing an excellent Sankalp Patra, PM Modi said, “This manifesto includes a series of commitments for the welfare of our sisters, for farmers, for the youth, and for the development of Maharashtra. This Sankalp Patra will serve as a guarantee for Maharashtra's development over the next 5 years.While the BJP is committed to the empowerment of women, Congress has repeatedly been involved in scandals: PM in Nanded
November 09th, 12:41 pm
In his rally in Nanded, Maharashtra, PM Modi highlighted the BJP's initiatives for women, including housing, sanitation, and economic empowerment through schemes like 'Drone Didis' to make women 'Lakhpati Didis.' He criticized Congress for disrespecting Baba Saheb Ambedkar’s Constitution and attempting to pide communities for political gain. PM Modi emphasized that a developed, united, and secure Maharashtra is key to a Viksit Bharat and urged voters to support the vision for the state's progress.PM Modi addresses massive gatherings in Akola & Nanded, Maharashtra
November 09th, 12:00 pm
PM Modi addressed large public gatherings in Akola & Nanded, Maharashtra, expressing deep gratitude for the people’s steadfast support over the past decade. He opened by highlighting the ambitious infrastructure initiatives launched by his government, including the Vadhavan Port, a nearly 80,000-crore project initiated within the first five months of his government’s third term at Centre and stated that respect, safety, and women’s empowerment have always been priorities for the BJP government.Mission of cleanliness is not a one day ritual but a lifelong ritual: PM Modi
October 02nd, 10:15 am
PM Modi commemorated the 10th anniversary of the Swachh Bharat Mission at Vigyan Bhawan, New Delhi. He launched sanitation projects worth over Rs 9,600 crore and emphasized the movement's significance as a public initiative involving millions of citizens. Highlighting collective efforts and community contributions, PM Modi celebrated the mission as a historic achievement that showcases India's commitment to cleanliness and environmental sustainability. The theme for this year’s campaign is “Swabhav Swachhata, Sanskaar Swachhata.”पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिन 2024 मध्ये झाले सहभागी
October 02nd, 10:10 am
स्वच्छ भारत या एका महत्वाच्या लोकचळवळीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 155 व्या गांधी जयंती निमित्त नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात आयोजित स्वच्छ भारत दिवस 2024 च्या कार्यक्रमात सहभागी झाले. मोदी यांनी रु 9600 कोटी हुन जास्त खर्चाच्या अनेक स्वच्छता प्रकल्पांचा शुभारंभ केला आणि कोनशिला बसवली. यात अमृत आणि अमृत 2.0, स्वच्छ गंगा राष्ट्रीय प्रकल्प तसेच गोबरधन योजनेचा समावेश आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ हे स्वच्छता ही सेवा 2024 चे बोधवाक्य आहे.'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी
September 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.गुजरात मध्ये गांधीनगर इथे रि-इन्व्हेस्ट 2024 या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
September 16th, 11:30 am
गुजरातचे राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी, गुजरातचे मुख्यमंत्री श्री भूपेंद्रभाई पटेल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री चंद्राबाबू नायडूजी, राजस्थानचे मुख्यमंत्री श्री भजन लाल शर्माजी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री श्री मोहन यादवजी…. छत्तीसगडचे मुख्यमंत्रीजी सुद्धा इथे दिसत आहेत, गोव्याचे मुख्यमंत्रीही आहेत आणि अनेक राज्यांचे ऊर्जामंत्रीही मला दिसत आहेत.त्याचप्रमाणे, परदेशी पाहुणे, जर्मनीच्या आर्थिक सहकार्य मंत्री, डेन्मार्कचे उद्योग व्यवसाय मंत्री, माझे मंत्रिमंडळातील सहकारी प्रल्हाद जोशी, श्रीपाद नाईकजी आणि जगातील अनेक देशांमधून आलेले सर्व प्रतिनिधी, स्त्री-पुरुष सज्जनहो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे केले चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्घाटन
September 16th, 11:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार परिषद आणि एक्स्पो(RE-INVEST)चे उद्घाटन केले. ही तीन-दिवसीय शिखर परिषद भारताच्या 200 GW पेक्षा जास्त स्थापित बिगर-जीवाश्म इंधन क्षमता साध्यतेच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा सन्मान करत आहे. मोदी यांनी यावेळी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक नवोन्मेषाचे दर्शन घडवणाऱ्या प्रदर्शनास्थळी पायी चालत आढावाही घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जल संचय जन भागीदारी' उपक्रमाचा केला शुभारंभ
September 06th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील सुरत येथे ‘जल संचय जन भागिदारी’ उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'जल संचय जन भागीदारी' उपक्रमाचा केला शुभारंभ
September 06th, 12:30 pm
या कार्यक्रमांतर्गत, पावसाच्या पाण्याचा संचय वाढविण्यासाठी आणि दीर्घकाळ पाण्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी राज्यभरात अंदाजे 24,800 रेनवॉटर हार्वेस्टिंग, अर्थात पावसाचे पाणी साठवणाऱ्या संरचना बांधल्या जातील.पंतप्रधान 6 सप्टेंबर रोजी ‘जल संचय जन भागीदारी उपक्रमाच्या ’ शुभारंभ कार्यक्रमाला करणार संबोधित
September 05th, 02:17 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता गुजरातमधील सूरत येथे आयोजित ‘जलसंचय जन भागीदारी उपक्रमाच्या ’ शुभारंभ कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेची बैठक संपन्न
July 27th, 07:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाच्या 9व्या नियामक परिषदेची बैठक झाली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र येथे ही बैठक झाली. या बैठकीला 20 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीत्व करणारे मुख्यमंत्री/नायब राज्यपाल उपस्थित होते.गुजरातमधील कोचरब आश्रमाचे उद्घाटन आणि साबरमती आश्रम प्रकल्पाच्या बृहद आराखड्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा मजकूर
March 12th, 10:45 am
पूज्य बापू यांचे हे साबरमती आश्रम नेहमीच एक विलक्षण उर्जेचे चैतन्यशील केंद्र राहिले आहे. आणि माझ्याप्रमाणे जसे प्रत्येकाला जेव्हा जेव्हा इथे येण्याची संधी मिळत असते तेव्हा बापू यांची प्रेरणा आपण आपल्या अंतकरणात स्पष्ट रूपाने अनुभव करू शकतो. सत्य आणि अहिंसेचे आदर्श असतील, राष्ट्रपूजेचा संकल्प असेल, गोरगरीब, वंचितांच्या सेवेत नारायणाची सेवा पाहण्याची भावना असावी, साबरमती आश्रमाने बापूंचे हे संस्कार आजही जिवंत ठेवले आहेत. माझे सौभाग्य आहे की आज मी इथे साबरमती आश्रमाच्या पुनर्विकास आणि विस्तार कार्याची पायाभरणी केली आहे. बापूंचा आधी जो पहिला आश्रम होता जेव्हा ते सुरुवातीला इथे आले होते त्या कोचरब आश्रमाचा सुद्धा विकास केला गेला आहे आणि मला आनंद आहे की आज त्याचे सुद्धा लोकार्पण होत आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतल्यानंतर गांधीजींनी आपला पहिला आश्रम कोचरब आश्रमातच बनवलेला होता. गांधीजी येथे चरखा चालवत असायचे, कारपेंटरी म्हणजे सुतारकाम शिकत होते. दोन वर्ष कोचरब आश्रमात राहिल्यानंतर गांधीजी साबरमती आश्रमामध्ये आश्रयाला गेले होते. या आश्रमाच्या पुनर्विकासानंतर आता गांधीजी यांच्या त्या दिवसांच्या आठवणी कोचरब आश्रमात आणखीन चांगल्या पद्धतीने संरक्षित राहतील. मी पूज्य बापू यांच्या चरणी नमन करतो आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आहे. मी सर्व देशवासीयांना सुद्धा या महत्त्वपूर्ण प्रेरणादायी ठिकाणांच्या विकास कार्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देत आहे.