PM reviews preparedness for heat wave related situation

April 11th, 09:19 pm

Prime Minister Shri Narendra Modi chaired a meeting to review preparedness for the ensuing heat wave season.

PM Modi attends India Today Conclave 2024

March 16th, 08:00 pm

Addressing the India Today Conclave, PM Modi said that he works on deadlines than headlines. He added that reforms are being undertaken to enable India become the 3rd largest economy in the world. He said that 'Ease of Living' has been our priority and we are ensuring various initiatives to empower the common man.

पंतप्रधान 16 फेब्रुवारीला ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला करणार संबोधित

February 15th, 03:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 17,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, सौरऊर्जा, वीज पारेषण,पेयजल तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आहेत.

मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

February 11th, 07:35 pm

मध्य प्रदेशातल्या झाबुआ येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 7300 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या विकास प्रकल्पांमुळे या क्षेत्रातील आदिवासी लोकसंख्येला मोठा लाभ होणार आहे. या क्षेत्रातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होऊन पेयजलाची तरतूद होईल. तसेच मध्य प्रदेशातील रस्ते, रेल्वे, वीज आणि शिक्षण क्षेत्राला यामुळे चालना मिळणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी विशेष मागास जमातीतील सुमारे 2 लाख महिला लाभार्थ्यांना आहार अनुदानाचा मासिक हप्ता वितरित केला. तसेच स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना 1.75 लाख अधिकार अभिलेखाचे वितरण केले आणि प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत 559 गावांना 55.9 कोटी रुपये हस्तांतरित केले.

श्री खोडलधाम ट्रस्ट- कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

January 21st, 12:00 pm

आजच्या या विशेष कार्यक्रमात खोडलधामची पावन भूमी आणि खोडल मातेच्या भक्तांचा सहवास लाभणे माझ्यासाठी परम भाग्याची बाब आहे. जनकल्याण आणि सेवा क्षेत्रात श्री खोडलधाम ट्रस्टने आज आणखी एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अमरेलीमध्ये आज पासून कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे काम सुरू होत आहे. येत्या काही आठवड्यात श्री खोडलधाम ट्रस्ट-कागवड च्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. तुम्हा सर्वांना या आयोजनाच्या खुप खुप शुभेच्छा.

श्री खोडलधाम ट्रस्ट-कर्करोग रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला पंतप्रधानांनी ध्वनीचित्रफित संदेशाद्वारे केले संबोधित

January 21st, 11:45 am

खोडल धामच्या पवित्र भूमीशी आणि खोडल मातेच्या भक्तांशी जोडले जाणे, हा आपला बहुमान असल्याची भावना, पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. श्री खोडलधाम ट्रस्टने अमरेली इथे कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राची पायाभरणी करून लोक कल्याण आणि सेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. श्री खोडलधाम ट्रस्ट-कागवाड आपल्या स्थापनेला 14 वर्षे पूर्ण करणार असल्याचे नमूद करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान 28 आणि 29 डिसेंबर रोजी दिल्लीत मुख्य सचिवांच्या तिसर्‍या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार

December 26th, 10:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 आणि 29 डिसेंबर 2023 रोजी दिल्लीत आयोजित मुख्य सचिवांच्या तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. अशा प्रकारची ही तिसरी परिषद आहे, पहिली परिषद जून 2022 मध्ये धर्मशाला येथे आणि दुसरी परिषद जानेवारी 2023 मध्ये दिल्लीत झाली होती.

गुजरातमधल्या मेहसाणा इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

October 30th, 09:11 pm

व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेन्द्र भाई, इतर मंत्री वर्ग, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात भाजपाचे अध्यक्ष भाई सी.आर.पाटील, इतर खासदार आणि आमदार वर्ग,तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने येथे आलेले माझे प्रिय गुजरातचे कुटुंबीय,

गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे 5800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी

October 30th, 04:06 pm

गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे 5800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली. रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या अनेक क्षेत्रांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे.

A part of our vision of Vasudhaiva Kutumbakam is putting our Neighborhood First: PM Modi

October 14th, 08:15 am

Addressing the launch of ferry services between Nagapattinam, India and Kankesanthurai, Sri Lanka PM Modi said that India and Sri Lanka share a deep history of culture, commerce and civilization. Nagapattinam and towns near-by have long been known for sea trade with many countries, including Sri Lanka.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या उदघाटन समारंभाला केले संबोधित.

October 14th, 08:05 am

भारत आणि श्रीलंका, राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एका नवीन अध्यायाला सुरुवात करत असून नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या आरंभामुळे दोन्ही देशातील संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक निर्णायक टप्पा गाठला गेला आहे, असे पंतप्रधान यावेळी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबरला उत्तराखंडला देणार भेट

October 10th, 08:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत.

उत्तर प्रदेशातील झाशी येथे जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्याच्या दिशेने केल्या जात असलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

September 05th, 10:09 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील झाशी येथे जलसंधारण आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी लोकसहभागातून होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. या उदात्त कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचे मोदी यांनी अभिनंदन केले.

गेल्या 4 वर्षात नळ जोडणी संख्या 3 कोटींवरून 13 कोटींवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

September 05th, 09:58 pm

केवळ 4 वर्षात नळजोडणीची संख्या 3 कोटींवरून 13 कोटींवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, जल जीवन मिशन लोकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि जीवन सुखकर करण्यात तसेच आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात मैलाचा दगड ठरत आहे.

नवी दिल्‍ली इथे झालेल्‍या बी 20 शिखर परिषद भारत 2023 मधील पंतप्रधानांचे भाषण

August 27th, 03:56 pm

आपण सर्व जण उद्योग जगतातील अग्रणी नेते अशा वेळी भारतात आला आहात , जेव्हा संपूर्ण देशभरात एखाद्या महोत्सवाप्रमाणे वातावरण आहे. भारतात दर वर्षी येणारा महोत्सवाचा कालावधी काहीसा आधीच सुरु झाला आहे. हा सणासुदीचा काळ असा असतो, जो आमचा समाज देखील साजरा करतो आणि आमचे उद्योग देखील.. आणि या वर्षी हा 23 ऑगस्ट पासूनच सुरु झाला आहे. आणि हा उत्सव आहे चंद्रावर चांद्रयान पोहोचण्याचा. भारताच्या यशस्वी चांद्रयान मोहिमेत आमची अंतराळ संशोधन संस्था इस्रो ची अत्यतं महत्वपूर्ण भूमिका आहे. मात्र या मोहिमेला भारतातील उद्योगांनी देखील मोठे योगदान दिले आहे. चांद्रयानासाठी वापरलेले अनेक घटक आणि भाग आमच्या उद्योगांनी, आमच्या खाजगी कंपन्यांनी, आमच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांनी आवश्यकतेनुसार तयार करून अगदी वेळेत उपलब्ध करून दिले. म्हणजेच हे यश, विज्ञान आणि उद्योग या दोघांचे आहे. आणि महत्वाचे म्हणजे या वेळी हे यश भारतासोबतच संपूर्ण जगात साजरे केले जात आहे. हा उत्सव देशाच्या विकासाला गती देण्याबद्दल साजरा केला जात आहे आणि हा सोहळा एक जबाबदार अंतराळ कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा आहे. हा उत्सव नवोन्मेषाचा आहे. हा सोहळा अंतराळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वतता आणि समानता आणण्याचा आहे. आणि या बी 20 शिखर परिषदेची संकल्पना देखील तीच आहे - RAISE अर्थात जबाबदारी, वेग, नवोन्मेष, शाश्वतता आणि समानता. आणि, हे मानवतेबद्दल आहे. हे एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य याबद्दल आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बी-20 परिषद भारत 2023,च्या बैठकीला केले संबोधित

August 27th, 12:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत बी-20 परिषद भारत 2023, या बैठकीला संबोधित केले. भारतातील या बी-20 परिषदेने, जगभरातील धोरणकर्ते, आघाडीचे व्यावसायिक-उद्योजक आणि तज्ञांना, बी-20 भारताच्या घोषणापत्रावर चर्चा आणि विचारमंथनासाठी एकत्र आणले आहे. जी-20 मध्ये सादर करावयाच्या, 54 शिफारशी आणि 172 धोरणात्मक कार्यवाहींचा, या घोषणापत्रात समावेश आहे.

पंतप्रधानांनी राजकोट, गुजरात येथे विविध विकासात्मक कामांच्या उद्घाटना वेळी केलेल्या भाषणाचा मजकूर

July 27th, 04:00 pm

सर्वजण कसे आहात? मजेत ना? गुजरातचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, मंत्रिमंडळातले माझे सहकारी श्री ज्योतिरार्दित्य सिंदियाजी, गुजरातचे माजी मुख्यमंत्री भाई विजय रुपाणीजी, सी आर पाटील जी !

गुजरातमध्ये राजकोट येथे पंतप्रधानांनी केले राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण

July 27th, 03:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये राजकोट येथे राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि 860 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये सौनी योजना लिंक 3 पॅकेज 8 आणि 9, द्वारका ग्रामीण पाणी पुरवठा आणि स्वच्छता(RWSS) प्रकल्प दर्जासुधारणा, उपरकोट किल्ला संवर्धन, पूर्वस्थिती प्राप्ती आणि विकास प्रकल्प टप्पा 1 आणि 2, पाणी प्रक्रिया प्रकल्प, मलजल प्रक्रिया प्रकल्प आणि उड्डाणपूल यांची उभारणी आणि इतर प्रकल्पांचा समावेश आहे. नव्याने उद्घाटन झालेल्या राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलमध्ये देखील पंतप्रधानांनी फेरफटका मारून पाहणी केली.

पंतप्रधान 26 जुलै रोजी प्रगती मैदान येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषद केंद्र (IECC) संकुल राष्ट्राला समर्पित करणार

July 24th, 07:45 pm

सुमारे 123 एकर परिसर असलेले हे संकुल भारतातील सर्वात मोठे बैठक, प्रोत्साहन, परिषद आणि प्रदर्शन स्थळ((MICE) म्हणून विकसित केले आहे. कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या जागेच्या बाबतीत, जगभरातील अव्वल प्रदर्शन आणि परिषद संकुलांमधील हे एक संकुल आहे. प्रगती मैदानावर बांधण्यात आलेल्या या नवीन परिषद केंद्रात प्रदर्शन सभागृह, अॅम्फी थिएटर्स सह अनेक अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान 7-8 जुलै रोजी 4 राज्यांना भेट देणार ; सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार

July 05th, 11:48 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7-8 जुलै 2023 रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. ते 7 जुलै रोजी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. तर 8 जुलै रोजी पंतप्रधान तेलंगण आणि राजस्थानला भेट देणार आहेत.