पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रील प्रभूपाद जी यांच्या 150 व्या जयंतीदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमामध्ये केलेले भाषण

February 08th, 01:00 pm

हरे कृष्ण! हरे कृष्ण! हरे कृष्ण! आज तुम्ही सर्वजण इथे आला आहात, त्यामुळे भारत मंडपम् ची भव्यता आणखी वाढली आहे. या भवनाची उभारणी करताना, त्याच्या मूळाशी असलेला विचार भगवान बसवेश्वर यांच्या अनुभव मंडपम् बरोबर या भारत मंडपम् ची सांगड घातली आहे. अनुभव मंडपम् प्राचीन भारतामध्ये आध्यात्मिक चर्चा-परिसंवाद यांचे केंद्र होते. अनुभव मंडपम् लोक कल्याणाची भावना आणि संकल्प यांचे ऊर्जा केंद्र होते. आज श्रील भक्तिसिद्धान्त सरस्वती गोस्वामी प्रभुपाद जी यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्येही अशीच ऊर्जा, असेच चैतन्य दिसून येत आहे. आमचा विचारही असाच होता की, हे भवन, भारताचे आधुनिक सामर्थ्य आणि प्राचीन मूल्ये अशा दोन्ही गोष्टींचे केंद्र बनले पाहिजे.अलिकडेच, काही महिन्यांपूर्वी जी -20 शिखर परिषदेच्या माध्यमातून इथूनच नवीन भारताच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झाले होते. आणि आज इथेच, ‘वर्ल्ड वैष्णव कन्व्हेंशन’चे आयोजन करण्याची संधी मोठ्या सद्भाग्याने मिळत आहे. आणि इतकेच नाही तर, भारताची जी प्रतिमा आहे... जिथे विकासही आहे आणि वारसाही आहे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम घडून आला आहे. जिथे आधुनिकतेचे स्वागतही आहे आणि आपल्या ओळखीविषयी अभिमानही आहे.

पंतप्रधानांनी श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

February 08th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे श्रील प्रभुपादजी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ टपाल तिकीट तसेच नाणे जारी केले. गौडीया मिशनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी वैष्णव पंथाच्या मुलभूत तत्वांचे जतन करण्यात तसेच त्यांचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त मथुरा इथे आयोजित कार्यक्रमातील पंतप्रधानांचे संबोधन

November 23rd, 07:00 pm

राजस्थानच्या निवडणूक प्रचारामुळे मला यायला उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागतो.प्रचार मैदानातून आता या भक्तिमय वातावरणात आलो आहे.आज ब्रज दर्शनाची संधी,ब्रजवासीयांच्या दर्शनाची संधी मला लाभली हे माझे भाग्य आहे. कारण इथे अशी व्यक्ती येते ज्यांना श्रीकृष्ण आणि श्रीजी बोलावतात.ही भूमी असाधारण आहे.ब्रज आपल्या ‘श्यामा- श्याम जू’ यांचे धाम आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे संत मीराबाई जन्मोत्सवात झाले सहभागी

November 23rd, 06:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंती निमित्त आयोजित संत मीराबाई जन्मोत्सव कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधानांनी यावेळी संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित केले. या ठिकाणी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. संत मीराबाई यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वर्षभर चालणार्‍या कार्यक्रमांची आज सुरुवात झाली.

पंतप्रधानांनी बालकांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण

August 30th, 04:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या निवासस्थानी, 7, लोककल्याण मार्ग येथे बालकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

भारताच्या विकास गाथेचा हाच टर्निंग पॉईंटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

November 28th, 11:30 am

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आज आपण पुन्हा एकदा मन की बात साठी एकमेकांसमोर आलो आहोत. अवघ्या दोन दिवसानंतर डिसेंबर महिना सुरू होणार आहे आणि डिसेंबर महिना आला की मनाला असे वाटू लागते की चला, हे वर्ष संपले. हा वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि या महिन्यात आपण नव्या वर्षासाठीचे संकल्प विचारात घेऊ लागतो. या महिन्यात आपला देश नौदल दिवस आणि सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा करतो. येत्या 16 डिसेंबर रोजी आपला देश 1971च्या युद्धाचे स्वर्ण जयंती वर्ष साजरे करत आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. या सर्व दिनविशेषांनिमित्त मी देशाच्या संरक्षण दलांचे स्मरण करतो, आपल्या वीरांचे स्मरण करतो. आणि विशेष म्हणजे अशा वीरांना जन्म देणाऱ्या वीर मातांचे स्मरण करतो. नेहमीप्रमाणेच या वेळीसुद्धा मला नमो ॲप आणि माय गव्ह वर आपणा सर्वांकडून अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. आपण सर्वांनीच मला आपल्या कुटुंबाचा एक भाग मानले आहे आणि आपल्या आयुष्यातली सुख-दुःखे माझ्यासोबत वाटून घेतली आहेत. या सर्वांमध्ये अनेक युवा आहेत, विद्यार्थी- विद्यार्थिनी आहेत. मन की बात चे आपले हे कुटुंब सातत्याने वाढते आहे, मनांशीही जोडले जाते आहे, उद्दिष्टांनीही जोडले जाते आहे आणि परिणामी दृढ होणाऱ्या आपल्या या नात्यामुळे आपल्या अंतर्मनात सातत्याने सकारात्मकतेचा एक प्रवाह खेळता राहतो आहे.

केदारनाथ इथे पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित

November 05th, 10:20 am

पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ इथे शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. त्यांनी श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे उद्घाटन केले आणि श्री आदि शंकराचार्य यांच्या अनावरण केले. तसेच कार्यान्वित आणि सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेत पाहणी केली. पंतप्रधानांनी केदारनाथ मंदिरातही पूजा केली. केदारनाथ धाम इथल्या कार्यक्रमासह देशभरातील बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम तसेच अनेक श्रद्धास्थानांवर प्रार्थना आणि उत्सव साजरा करण्यात आला, हे सर्व कार्यक्रम केदारनाथ धाम येथील मुख्य कार्यक्रमाशी जोडले होते.

अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 14th, 12:01 pm

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे यशस्वी आणि युवा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा जी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्रिगण, अन्य खासदार, आमदार आणि अलिगढचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे केले भूमिपूजन

September 14th, 11:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अलिगढ इथे राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाचे भूमिपूजन केले. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या अलिगढ नोड आणि राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठ यांचा प्रस्तावित आराखडा मांडलेल्या प्रदर्शनाला पंतप्रधानांनी भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट 2021 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन

August 29th, 11:30 am

आज मेजर ध्यानचंद जी यांची जयंती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, आणि आपला देश त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करीत आहे. माझ्या मनात विचार आला की, सध्या जिथं कुठं मेजर ध्यानचंद जी यांचा आत्मा असेल, तिथं त्यांना खूप प्रसन्न वाटत असणार. कारण संपूर्ण दुनियेमध्ये भारताच्या हॉकीचा डंका बजावण्याचं काम ध्यानचंद जी यांच्या हॉकीनं केलं होतं. आणि आज चार दशकांनंतर, जवळ-जवळ 41 वर्षांनी भारताच्या नवयुवकांनी, पुत्रांनी आणि कन्यांनी हॉकी खेळामध्ये पुन्हा एकदा प्राण फुंकले आहेत. देशानं कितीही पदकांची कमाई केली तरी जोपर्यंत हॉकीमध्ये देशाला पदक मिळत नाही, तोपर्यंत कोणाही भारतीयांना विजयाचा आनंद घेता येत नाही. आणि यावेळच्या ऑलिंपिकमध्ये भारताला चार दशकांनंतर हॉकीचं पदक मिळालं. भारताच्या या विजयामुळं मेजर ध्यानचंद जी यांच्या हृदयाला, आत्म्याला, ते जिथं कुठं असतील, तिथं त्यांना किती आनंद वाटला असेल, त्यांचा आत्मा किती प्रसन्न झाला असेल, याची कल्पना तुम्ही मंडळी करू शकता. ध्यानचंद जीं नी आपलं संपूर्ण जीवन खेळाला समर्पित केलं होतं. आणि म्हणूनच, आज ज्यावेळी देशाचे नवयुवक, आपली मुलं-मुली, यांच्यामध्ये खेळाविषयी जे आकर्षण दिसून येतं, त्याचबरोबर मुलं जर खेळामध्ये चांगलं प्रदर्शन करून पुढं जात असताना मुलांचे आई-वडीलही आनंद व्यक्त करीत असतील, तर मला वाटतं की, आज मुलांमध्ये खेळाविषयी जो उत्साह दिसून येतोय, तो पाहिल्यावर मला वाटतं की, हीच मेजर ध्यानचंद जी यांना खूप मोठी श्रद्धांजली आहे.

Through the Swachh Bharat Abhiyan, we are ensuring cleaner and healthier environment for our children: PM Modi

February 11th, 12:45 pm

PM Modi took part in the 3 billionth meal of Akshaya Patra mid-day meal programme in Vrindavan today where he served food to children. Addressing a gathering at the event, PM Modi spoke at length about Centre's flagship initiatives like Mission Indradhanush and National Nutrition Mission. Stressing on cleanliness, the PM said, Swachhata is an important aspect of any child's health. Through the Swachh Bharat Abhiyan, we are ensuring cleaner and healthier environment fo rour children.

वृंदावन येथील तीन अब्ज वंचित मुलांना पंतप्रधानांच्या हस्ते भोजन प्रदान

February 11th, 12:44 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे चंद्रोदय मंदिर येथिल अक्षय पात्र फाऊंडेशनच्या तीन अब्ज गरीब, वंचित मुलांना जेवण पुरविणाऱ्या सेवा पट्ट्याचे अनावरण केले आणि त्यांना भोजन प्रदान केले. त्यांनी इस्कॉनचे आचार्य श्रील प्रभुपाद, विग्रा यांना पुष्पांजली अर्पण केली.

पंतप्रधान उद्या वृंदावनमध्ये तीन अब्ज लोकांना पौष्टिक आहार देणार

February 10th, 12:27 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दिनांक 11 फेब्रुवारी 2019 रोजी उत्तर प्रदेशातील वृंदावनला भेट देतील. वृंदावन चंद्रोदय मंदिर येथे अक्षय पात्र फाऊंडेशन च्या तीन अब्ज मुलांना जेवण पुरविणाऱ्या पॅकचे अनावरण पंतप्रधान बटन दाबून करतील.