पंतप्रधानांनी घेतली युक्रेनच्या पंतप्रधानांची भेट

September 24th, 03:57 am

न्यूयॉर्कमध्ये आयोजित समिट ऑफ द फ्युचर नामक परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 सप्टेंबर 2024 रोजी युक्रेनचे पंतप्रधान वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेऊन द्विपक्षीय पातळीवर चर्चा केली.

पंतप्रधानांच्या युक्रेन दौऱ्याबाबत भारत-युक्रेन संयुक्त निवेदन

August 23rd, 07:00 pm

युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट 2024 रोजी युक्रेनला भेट दिली. दोन्ही देशांमध्ये 1992 साली राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यापासून भारतीय पंतप्रधानांनी युक्रेनला दिलेली ही पहिलीच भेट होती.

पंतप्रधानांच्या युक्रेन भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या दस्त ऐवजांची सूची (ऑगस्ट 23, 2024)

August 23rd, 06:45 pm

भारत सरकार आणि युक्रेन सरकार यांच्यात कृषी आणि अन्न उद्योग क्षेत्रातील सहकार्य करार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

August 23rd, 06:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची आज कीव येथे भेट घेतली.मेरीनस्की राजप्रासादामध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे राष्ट्राध्‍यक्ष झेलेन्स्की यांनी स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनला दिले भीष्म क्यूब्स

August 23rd, 06:33 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेन सरकारला चार भीष्म (भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हिता आणि मैत्री) क्यूब्स दिले. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या मानवतावादी मदतीसाठी पंतप्रधानांचे आभार मानले. हे क्यूब्स जखमींवर त्वरीत उपचार करण्यास मदत करतील आणि मौल्यवान जीव वाचविण्यात योगदान देतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीव येथे शहीद बालकांच्या स्मरणार्थ आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाला दिली भेट

August 23rd, 03:24 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कीव मध्ये युक्रेनच्या राष्ट्रीय इतिहास संग्रहालयात शहीद बालकांच्या स्मृती प्रीत्यर्थ आयोजित मल्टीमीडिया प्रदर्शनाला भेट दिली.त्यांच्या समवेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की होते.

पोलंड आणि युक्रेन या देशांच्या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

August 21st, 09:07 am

भारत आणि पोलंड दरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असताना माझा हा पोलंड दौरा होत आहे. पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुपक्षीयता यांच्याप्रती आपली परस्पर कटिबद्धता आपल्या नात्याला अधिक बळ देते. आपली भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मी माझे मित्र पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्या सोबतच्या बैठकींबाबत मी उत्सुक आहे. या दौऱ्यात मी पोलंडमधील उत्साही भारतीय समुदायाच्या सदस्यांशी देखील संवाद साधणार आहे.

जी7 शिखर परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांसह बैठक

June 14th, 04:25 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासह 14 जून 2024 रोजी बैठक घेतली. पंतप्रधान जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीतील अपुलिया इथे गेले असून परिषदेव्यतिरिक्त ते घेत असलेल्या बैठकींमध्ये या बैठकीचा समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानपदी पुन्हा निवडून आल्याबद्दल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नरेंद्र मोदी यांचे केले अभिनंदन

June 06th, 08:56 pm

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी आज संपर्क साधून लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट

May 20th, 07:57 pm

पंतप्रधानांनी 20 मे 2023 रोजी हिरोशिमा येथे G-7 परिषदेच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली.

पंतप्रधानांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा

December 26th, 08:39 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.