विकसित भारत 2047-युवांचा आवाज उपक्रमाचा दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
December 11th, 10:35 am
आजचा दिवस ‘विकसित भारत’च्या संकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘विकसित भारत’शी संबंधित ही कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मी सर्व राज्यपालांचे विशेष अभिनंदन करतो. देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी उचलणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना तुम्ही एका व्यासपीठावर आणले आहे. शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेमुळे वैयक्तिक विकास होतो आणि राष्ट्राची उभारणी वैयक्तिक विकासातून होते. भारत सध्या ज्या युगात आहे, त्या काळात वैयक्तिक विकासाची मोहीम अत्यंत महत्त्वाची बनली आहे. युवांचा आवाज कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी मी तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो.'विकसित भारत @2047 : युवांचा आवाज' उपक्रमाचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ
December 11th, 10:30 am
विकसित भारत उपक्रम पुढे नेण्यासाठी आजची कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल सर्व राज्यपालांचे आभार मानून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. विकसित भारत संकल्पासाठी आजचा कार्यक्रम विशेष असल्याचे ते म्हणाले. विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील तरुणांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी असलेल्या सर्व संबंधितांना एकत्र आणण्याच्या त्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधान मोदी यांनी व्यक्तिमत्त्व विकासात शैक्षणिक संस्थांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. लोकांचा विकास झाला तरच राष्ट्र विकसित होते, असे त्यांनी अधोरेखित केले. सध्याच्या युगात व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्व अधोरेखित करून पंतप्रधानांनी 'युवांचा आवाज' कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान 11 डिसेंबर रोजी ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ उपक्रमाची सुरुवात करणार
December 10th, 01:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 :30 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ या उपक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. यावेळी विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांच्यासाठी देशभरातल्या राजभवनांमध्ये आयोजित केलेल्या कार्यशाळांनाही पंतप्रधान संबोधित करणार असून ही या उपक्रमाची प्रतिकात्मक सुरुवात असेल.