विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण

June 16th, 04:00 pm

या व्यासपीठातून फ्रान्सची तंत्रज्ञानविषयक दूरदृष्टी प्रतिबिंबित होते. भारत आणि फ्रान्स विविध विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. त्यापैकी तंत्रज्ञान आणि डिजिटल ही सहकार्याची उदयोन्मुख क्षेत्रे आहेत. हे सहकार्य असेच पुढे वाढत राहणे ही काळाची गरज आहे. यामुळे केवळ आपल्या देशांनाच नाही तर संपूर्ण जगाला मदत होईल.

विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात पंतप्रधानांचे बीजभाषण

June 16th, 03:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विवा टेकच्या 5 व्या वार्षिक संमेलनात बीजभाषण केले. 2016 पासून दरवर्षी पॅरिसमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आणि युरोपमधील सर्वात मोठ्या डिजिटल आणि स्टार्टअप कार्यक्रमांपैकी एक असलेल्या विवा टेक 2021 मध्ये सन्माननीय अतिथी म्हणून बीजभाषण देण्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जून रोजी विवा टेकच्या पाचव्या वार्षिक कार्यक्रमात बीजभाषण करणार

June 15th, 02:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जून 2021 रोजी संध्याकाळी 4 वाजता विवा टेकच्या पाचव्या आवृत्तीत बीज भाषण करतील. विवा टेक 2021 येथे बीज भाषण करण्यासाठी पंतप्रधानांना मानद अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले आहे.