तमिळनाडूत चेन्नई इथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभातले पंतप्रधानांचे संबोधन
January 19th, 06:33 pm
13 व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो.भारतीय क्रीडा विश्वासाठी 2024 ची सुरवात करण्याचा हा उत्तम मार्ग आहे.इथे जमलेले माझे युवा मित्र युवा भारत,नव भारताचे प्रतिनिधित्व करतात. यांची ऊर्जा आणि उत्साह क्रीडा विश्वात आपल्या देशाला नव्या शिखरावर नेत आहे.देशभरातून चेन्नईला आलेल्या सर्व खेळाडूंना आणि क्रीडा प्रेमींना माझ्या शुभेच्छा.आपण सर्वजण एकत्रितपणे खऱ्या अर्थाने एक भारत श्रेष्ठ भारत चे दर्शन घडवत आहात.तामिळनाडूचे स्नेह पूर्ण लोक,लालित्यपूर्ण तमिळ भाषा,संस्कृती आणि खाद्य संस्कृती यामुळे आपणा सर्वांना आपुलकीचा प्रत्यय येईल.त्यांचे आदरातिथ्य आपणा सर्वांची मने जिंकेल याचा मला विश्वास आहे. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आपल्यातल्या कौशल्याचे दर्शन घडवण्याची संधी नक्कीच देईल.त्याचबरोबर आपल्याला आयुष्य भर साथ देणारी नवी मैत्रीही जोडण्यासाठी मदत करेल.पंतप्रधानांच्या हस्ते तमिळनाडूतील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन
January 19th, 06:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूत चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 सोहळ्याचे उद्घाटन केले. मोदी यांनी प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उदघाटन आणि पायाभरणीही केली. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमालाही ते उपस्थित राहिले. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाचे प्रतीक म्हणून त्यांनी दोन खेळाडूंनी दिलेली स्पर्धेची मशाल एका मोठ्या भांड्यात (cauldron) ठेवली.मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंतीनिमित्त मथुरा इथे आयोजित कार्यक्रमातील पंतप्रधानांचे संबोधन
November 23rd, 07:00 pm
राजस्थानच्या निवडणूक प्रचारामुळे मला यायला उशीर झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागतो.प्रचार मैदानातून आता या भक्तिमय वातावरणात आलो आहे.आज ब्रज दर्शनाची संधी,ब्रजवासीयांच्या दर्शनाची संधी मला लाभली हे माझे भाग्य आहे. कारण इथे अशी व्यक्ती येते ज्यांना श्रीकृष्ण आणि श्रीजी बोलावतात.ही भूमी असाधारण आहे.ब्रज आपल्या ‘श्यामा- श्याम जू’ यांचे धाम आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील मथुरा येथे संत मीराबाई जन्मोत्सवात झाले सहभागी
November 23rd, 06:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेश मधील मथुरा येथे संत मीराबाई यांच्या 525 व्या जयंती निमित्त आयोजित संत मीराबाई जन्मोत्सव कार्यक्रमात भाग घेतला. पंतप्रधानांनी यावेळी संत मीराबाई यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाणे प्रकाशित केले. या ठिकाणी आयोजित प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहिले. संत मीराबाई यांच्या स्मृती प्रीत्यर्थ वर्षभर चालणार्या कार्यक्रमांची आज सुरुवात झाली.PM congratulates Viswanathan Anand on winning World Rapid Chess Championship
December 29th, 06:10 pm
Prime Minister Shri Narendra Modi has congratulated Viswanathan Anand on winning World Rapid Chess Championship.Set your targets and pursue them with a tension free mind: PM Modi to students during Mann Ki Baat
February 28th, 11:40 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, has wished Shri Viswanathan Anand ahead of the World Chess Championship in Sochi.
November 06th, 11:24 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, has wished Shri Viswanathan Anand ahead of the World Chess Championship in Sochi.A true Grandmaster & pride of India! Congratulations to Viswanathan Anand
May 30th, 05:30 pm
A true Grandmaster & pride of India! Congratulations to Viswanathan Anand