कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात पुढाकार घेण्यास भारत वचनबद्ध - पंतप्रधान

January 04th, 02:42 pm

भारतीय उद्योजक विशाल सिक्का यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट आंतरिक संवाद ठरल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की नवोन्मेष आणि युवा पिढीसाठी संधी निर्माण करण्यावर भर देऊन कृत्रिम प्रज्ञा क्षेत्रात पुढाकार घेण्यास भारत वचनबद्ध आहे. पंतप्रधान आणि विशाल सिक्का या दोघांनी कृत्रिम प्रज्ञेचा वापर आणि त्याचे भारतावर होणारे परिणाम तसेच भविष्यातील अनेक अनिवार्य गोष्टी या सर्व बाबींवर सविस्तर व व्यापक चर्चा केली.