पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम येथे गुगल एआय हबच्या उद्घाटनाचे केले स्वागत

October 14th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील गतिशील शहर विशाखापट्टणम येथे गुगल एआय हबच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (123 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

June 29th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! 'मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन! तुम्ही सर्वजण यावेळी योगाची ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्मृतींमध्ये रमून गेले असाल. यावर्षीही 21 जून रोजी देश-विदेशातील कोट्यवधी लोक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तुम्हाला आठवतंय, 10 वर्षांपूर्वी याची सुरुवात झाली. या 10 वर्षांमध्ये हा दिवस दरवर्षी आधीच्यापेक्षा अधिक उत्साहात, भव्य स्वरूपात होत आहे.

योग चळवळीला बळकटी देणाऱ्या आंध्र प्रदेशच्या योगान्ध्र उपक्रमाचे पंतप्रधानांकडून कौतुक

June 22nd, 02:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशच्या जनतेचे, दैनंदिन आयुष्यात योगअभ्यासाचा समावेश करण्यासाठी तसेच आरोग्य आणि निरोगी राहाण्याच्या देशव्यापी चळवळीला चालना देण्याच्या प्रेरणादायी वचनबद्धतेचे कौतुक केले.

11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

June 21st, 07:06 am

आंध्र प्रदेश चे राज्यपाल सय्यद अब्दुल नजीर जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री आणि माझे परममित्र चंद्राबाबू नायडू गारू, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी के. राममोहन नायडू जी, प्रतापराव जाधव जी, चंद्रशेखरजी भूपती राजू श्रीनिवास वर्मा जी, राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण गारू, अन्य मान्यवर तसेच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

June 21st, 06:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला.

पंतप्रधान 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार

June 19th, 05:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 - 21 जून रोजी बिहार, ओदिशा आणि आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. 20 जून रोजी ते बिहारमधील सिवानला भेट देतील आणि दुपारी 12 च्या सुमारास विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (122 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

May 25th, 11:30 am

आज संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एक झाला आहे, संतापानं क्रुद्ध आहे, संकल्पसिद्ध आहे. आज प्रत्येक भारतीयाचा एकच निर्धार आहे, की 'आपल्याला दहशतवाद संपवायचाच आहे.'

पंतप्रधान 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेशला देणार भेट

April 30th, 03:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 2 मे रोजी महाराष्ट्र, केरळ आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना भेट देतील. पंतप्रधान 1 मे रोजी मुंबईला भेट देतील आणि सकाळी 10:30 वाजता त्यांच्या हस्ते जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन करण्‍यात येणार आहे.

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल व्यक्त केला शोक

April 30th, 09:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्‍ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पाचे आंध्र प्रदेशच्या जनतेच्या हृदयात आणि मनात विशेष स्थान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

January 17th, 05:45 pm

विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पाचे आंध्र प्रदेशच्या जनतेच्या हृदयात आणि मनात विशेष स्थान असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पासाठी 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भागभांडवली सहाय्य देण्याचा निर्णय घेतला गेला अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

पंतप्रधान 8-9 जानेवारी रोजी आंध्र प्रदेश आणि ओदिशाला देणार भेट

January 06th, 06:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 आणि 9 जानेवारीला आंध्र प्रदेश आणि ओदिशाला भेट देणार आहेत. शाश्वत विकास, औद्योगिक वृद्धी आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याला मोठी चालना देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान 8 जानेवारी रोजी विशाखापट्टणम् येथे संध्याकाळी साडेपाच वाजता 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. ते 9 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता 18 व्या प्रवासी भारतीय दिवसाचे देखील उद्घाटन करतील.

PM Modi addresses public meetings in Telangana’s Kamareddy & Maheshwaram

November 25th, 02:15 pm

Ahead of the Telangana assembly election, PM Modi addressed emphatic public meetings in Kamareddy and Maheshwaram today. He said, “Whenever I come to Telangana, I see a wave of hope among the people here. This wave is the wave of expectation. It is the wave of change. It is the wave of the sentiment that Telangana should achieve the height of development that it deserves.”

जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 17th, 11:10 am

तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 मध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी 2021 मध्ये जेव्हा आपण भेटलो होतो, तेव्हा कोविड महामारीच्या अनिश्चिततेमुळे संपूर्ण जग त्रस्त झाले होते. कुणालाही माहीत नव्हते की कोरोना नंतरचे जग कसे असेल. मात्र आज एक नवीन जागतिक व्यवस्था आकार घेत आहे आणि बदलत्या जागतिक व्यवस्थेत संपूर्ण जग भारताकडे नव्या आशेने पाहत आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जगात भारताची अर्थव्यवस्था सातत्याने मजबूत होत आहे. आता तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील अव्वल तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल. आपण सर्वजण जाणतो की जगातील बहुतांश व्यापार सागरी मार्गाने होतो. कोरोना पश्चात काळात आज जगालाही विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळीची गरज आहे. म्हणूनच यंदाची जागतिक भारतीय सागरी परिषद अतिशय महत्वपूर्ण आहे.

जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

October 17th, 10:44 am

तिसऱ्या जागतिक भारतीय सागरी परिषद 2023 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज मुंबईत झाले. भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असलेल्या 'अमृत काल व्हिजन 2047' चे अनावरणही त्यांनी केले. या भविष्यवेधी योजनेच्या अनुषंगाने, भारतीय सागरी नील अर्थव्यवस्थेसाठी 'अमृत काल व्हिजन 2047' शी संबंधित 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांनी केले. देशाच्या सागरी क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ही शिखर परिषद एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.

तेलंगण मधल्या मेहबूबनगर इथे विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 01st, 02:43 pm

तेलंगणच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदराराजन जी, केंद्र सरकार मधले माझे सहयोगी मंत्री, जी. किशन रेड्डी जी,संसदेतले माझे सहकारी संजय कुमार बंडी जी, इथे उपस्थित इतर मान्यवर उपस्थित महिला आणि पुरुष वर्ग,

पंतप्रधानांनी तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि लोकार्पण

October 01st, 02:42 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणातील महबूबनगर येथे 13,500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. विकास प्रकल्पांमध्ये रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वे सेवेचा हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.

छत्तीसगडमधील रायगड येथे रेल्वे क्षेत्रातील प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

September 14th, 03:58 pm

छत्तीसगड आज विकासाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल टाकत आहे. छत्तीसगडला आज 6400 कोटी रुपयांहून अधिक रेल्वे प्रकल्पांची भेट मिळत आहे. ऊर्जा उत्पादनात छत्तीसगडची क्षमता वाढवण्यासाठी आणि आरोग्य क्षेत्रात आणखी सुधारणा करण्यासाठी आज अनेक नवीन योजनांचा शुभारंभ झाला आहे. आज येथे सिकलसेल समुपदेशन पत्रांचेही वाटप करण्यात आले.

छत्तीसगडमधील रायगड येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

September 14th, 03:11 pm

छत्तीसगडमधील रायगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुमारे 6,350 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील 9 जिल्ह्यांमधील 50 खाटांच्या ‘क्रिटिकल केअर ब्लॉक्स’ची पायाभरणी केली आणि तपासणी केलेल्या लोकांना 1 लाख सिकलसेल समुपदेशन कार्डांचे वितरण केले. या रेल्वे प्रकल्पांमध्ये छत्तीसगड पूर्व रेल्वे प्रकल्प टप्पा -I, चंपा ते जामगा दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग, पेंद्र रोड ते अनूपपूर दरम्यानचा तिसरा रेल्वे मार्ग आणि तलाईपल्ली कोळसा खाणी ते एनटीपीसीच्या लारा उच्च औष्णिक वीजकेंद्राला (एसटीपीएस ) जोडणारी एमजीआर (मेरी-गो-राऊंड) प्रणालीचा समावेश आहे.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 18th, 11:17 pm

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हशी संबंधित सर्व मान्यवरांना नमस्कार. डिजिटल माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या देश-विदेशातील प्रेक्षक आणि वाचकांचेही अभिनंदन. मला हे पाहून आनंद झाला की या कॉन्क्लेव्हची संकल्पना द इंडिया मोमेंट अशी आहे. आज जगातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक, विचारवंत सर्वच म्हणतात आणि एका सुरात म्हणत आहेत की हा क्षण भारताचा आहे. मात्र जेव्हा इंडिया टुडे समूह हा आशावाद दाखवतो तेव्हा ते अधिकच खास आहे. तसे, मी 20 महिन्यांपूर्वी लाल किल्ल्यावरून सांगितले होते - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. पण इथपर्यंत पोहोचायला 20 महिने लागले. तेव्हाही भावना हीच होती – हा क्षण भारताचा आहे.

इंडिया टूडे कॉनक्लेव्हला पंतप्रधानांनी केले संबोधित

March 18th, 08:00 pm

नवी दिल्लीत हॉटेल ताज पॅलेस मध्ये झालेल्या ‘इंडिया टूडे कॉनक्लेव्ह’ (परिषद) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले.