पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी 20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघातील सदस्यांबरोबर साधलेला संवाद
July 05th, 04:00 pm
पंतप्रधान: मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही विश्वचषक जिंकून आपल्या देशामध्ये उत्साहाचे आणि उत्सवाचे वातावरण तयार केले आहे. आणि देशवासियांच्या सर्व आशा -आकांक्षांना तुम्ही जिंकले आहे. माझ्यावतीने तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! सर्वसाधारणपणे रात्री खूप उशीरपर्यंत मी कार्यालयामध्ये काम करीत असतो. विशेष म्हणजे यावेळी तर टी.व्हीसुद्धा सुरू होता आणि एकीकडे मी फायलीही पहात होतो. परंतु यावेळी त्या फायलींकडे माझे लक्ष केंद्रीत होत नव्हते. तुम्ही मंडळींनी आपल्यातील अतिशय उत्कृष्ट संघभावनेचे प्रदर्शन केले. आपल्यातील प्रतिभा दाखवली आणि तुमच्यामध्ये असलेले धैर्य स्पष्ट दिसून येत होते. मी सामना पहात होतो, तुमच्यामध्ये ‘पेशन्स’ होता, अजिबात गडबड नव्हती. पूर्ण आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता. तुम्हा सर्वांचे माझ्यावतीने खूप-खूप अभिनंदन, मित्रांनो!!टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे केले अभिनंदन
June 30th, 02:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीद्वारे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुरुषांच्या टी20 विश्वचषक विजयाबद्दल अभिनंदन केले. या स्पर्धेत संघातील खेळाडूंनी दाखवलेल्या अनुकरणीय कौशल्याचे आणि संघ भावनेचे त्यांनी कौतुक केले.एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 वे शतक झळकावल्याबद्दल विराट कोहलीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले कौतुक
November 15th, 08:08 pm
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू बनल्याबद्दल विराट कोहली याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.आयसीसी टी 20 सामन्यात विजय मिळविल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
October 23rd, 11:00 pm
आयसीसी- टी-ट्वेटी विश्वचषक स्पर्धेत अतिशय उत्तम खेळाचे दर्शन घडवत पाकिस्तानवर विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.‘फिट इंडिया मुव्हमेंट’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी साधलेला संवाद
September 24th, 12:01 pm
आज देशाला प्रेरणा देणाऱ्या सात महनीय व्यक्तींचे मी विशेष रूपाने आभार व्यक्त करतो. याचे कारण म्हणजे आपण खास वेळ काढला आणि सर्वांना स्वानुभव सांगून तंदुरूस्तीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचे आपण स्वतः अवलंबन करून, त्याचे लाभ घेतले आहेत, त्याविषयी माहिती सामाईक केलीत, त्याचा देशाच्या प्रत्येक पिढीला खूप फायदा होऊ शकेल, असे मला वाटते. आजची ही चर्चा प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींसाठी आणि वेगवेगळी रूची, आवड असलेल्या सर्वांनाच अतिशय उपयोगी पडणारी ठरणार आहे. ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्व देशवासियांचे स्वास्थ्य, आरोग्य उत्तम राहावे, अशी कामना करतो.पंतप्रधानांच्या हस्ते वयानुकूल फिटनेस प्रोटोकॉलचा शुभारंभ
September 24th, 12:00 pm
नरेंद्र मोदी यांनी विविध क्रीडापटू, फिटनेस तज्ज्ञ आणि इतर व्यक्तींशी फिट इंडिया डायलॉग कार्यक्रमात संवाद साधला. औपचारिकरित्या आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सहभागितांनी पंतप्रधानांसमवेत आपले अनुभव आणि तंदुरुस्तीच्या बाबी सामाईक केल्या.ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले संयुक्त निवेदन
April 10th, 02:15 pm
आपल्या पहिल्या वाहिल्या भारतभेटीत आपले स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. गेल्याच महिन्यात आपण दोन्ही देशांच्या बॉर्डर-गावस्कर क्रिकेट चषक स्पर्धेचा चित्तवेधक अनुभव घेतला.ऑस्ट्रेलियाच्या संसदेत २०१४ साली मी केलेल्या भाषणात मी सर ब्रडमन आणि तेंडुलकर या दोघांचा उल्लेख केला होता. आज भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ हे क्रिकेटमधल्या युवा खेळाडूना आकार देत आहेत. मला आशा आहे, की तुमचा भारतातील दौरा हा स्मिथच्या फलंदाजीसारखाच फलदायी ठरेल.PM Modi appreciates Cricketer Virat Kohli's efforts towards Swachh Bharat initiative
October 07th, 08:07 pm
PM Narendra Modi appreciated cricketer Virat Kohli for his efforts towards Swachh Bharat initiative. The PM tweeted saying, Dear Virat Kohli, saw your #MyCleanIndia moment on ABP news. A small but powerful gesture that will surely inspire everyone.