पंतप्रधान 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार
October 29th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 - 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा येथील खेरालू येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 16th, 04:05 pm
मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह , रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव , गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन भाई, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश , गुजरात सरकारचे अन्य मंत्रिगण, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सीआर पाटील, अन्य खासदार, आमदार आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या विविध प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि लोकार्पण
July 16th, 04:04 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधे, रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे केले. यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या एक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. गांधीनगर राजधानी- वाराणसी अतिजलद गाडी आणि गांधीनगर राजधानी ते वरेठा दरम्यानच्या मेमू सेवा गाडी या दोन नव्या गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलैला गुजरातमध्ये विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करणार
July 14th, 06:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जुलै 2021 ला गुजरातमध्ये रेल्वेच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण दूरदृश्य प्रणाली द्वारे करणार आहेत.यावेळी गुजरात सायन्स सिटी मधल्या ॲक्वेटिक्स आणि रोबोटिक्स गॅलरीचे आणि नेचर पार्कचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.