
राजस्थानमध्ये जयपूर इथे ‘एक वर्ष –परिणाम उत्कर्ष’ कार्यक्रम आणि अन्य विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
December 17th, 12:05 pm
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राजस्थानचे लोकप्रिय मुख्यमंत्री मोहन यादव, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी सी. आर. पाटील, भगीरथ चौधरी, राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी, प्रेम चंद भेरवा आणि अन्य मंत्री, खासदार, राजस्थानचे आमदार, मान्यवर व्यक्ती तसंच राजस्थानमधल्या माझ्या प्रिय बंधु भगिनींनो,
पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील जयपूर येथे 'एक वर्ष-परिणाम उत्कर्ष' या राज्य सरकारच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात झाले सहभागी
December 17th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ' एक वर्ष-परिणाम उत्कर्ष':राजस्थान राज्य सरकारची वर्षपूर्ती या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी जनतेला संबोधित करताना त्यांनी राज्य सरकारच्या यशस्वी वर्षपूर्तीबद्दल राज्य सरकार आणि राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात जमलेल्या लाखो लोकांचे आशीर्वाद घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या विकासकामांना नवी दिशा आणि गती देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या चमूने केलेल्या प्रयत्नांचे मोदींनी कौतुक केले . पहिल्या वर्षाने पुढील अनेक वर्षांच्या विकासासाठी एक भक्कम पाया म्हणून काम केले आहे , असे ते म्हणाले. आजच्या कार्यक्रमाने राज्य सरकारच्या वर्षपूर्तीचेच दर्शन घडत नाही तर राजस्थानच्या तेजस्वी प्रकाशाचे आणि विकासाच्या उत्सवाचे ते प्रतीक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अलीकडेच रायझिंग राजस्थान शिखर परिषद 2024 च्या वेळी दिलेल्या भेटीचे स्मरण करत यावेळी जगभरातील अनेक गुंतवणूकदार उपस्थित होते आणि आज 45,000 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. या प्रकल्पांमुळे राजस्थानमधील पाण्याशी संबंधित समस्यांवर योग्य तोडगा निघेल आणि राजस्थान भारतातील परस्परांशी जोडलेल्या सर्वात चांगल्या राज्यांपैकी एक बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या विकासकामांमुळे अधिकाधिक गुंतवणूकदार आकर्षित होतील, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळेल तसेच राजस्थानमधील शेतकरी, महिला आणि तरुणांना फायदा होईल, असे देखील पंतप्रधानांनी सांगितले.
जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या उदयोन्मुख राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 09th, 11:00 am
राजस्थानच्या विकास यात्रेतील आज एक महत्वाचा दिवस आहे. देश आणि जगभरातून खूप मोठ्या संख्येने प्रतिनिधी, गुंतवणूकदार या गुलाबी नगरीमध्ये आले आहेत. इथल्या उद्योग विश्वातील अनेक सहकारीही आज इथे उपस्थित आहेत. ‘उदयोन्मुख राजस्थान शिखर परिषदेमध्ये आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. इतक्या शानदार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राजस्थानच्या भाजपा सरकारला शुभेच्छा देतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायझिंग राजस्थान जागतिक गुंतवणूक शिखर परिषदेचे केले उद्घाटन
December 09th, 10:34 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमध्ये जयपूर येथे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 या गुंतवणूकदार शिखर परिषदेचे आणि राजस्थान ग्लोबल बिझनेस एक्स्पो या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज राजस्थानच्या यशस्वी वाटचालीमधील आणखी एक विशेष दिवस आहे. त्यांनी जयपूर या गुलाबी शहरात सर्व उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील अग्रणी, गुंतवणूकदार, प्रतिनिधींचे रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024 मध्ये स्वागत केले. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल राजस्थान सरकारचे देखील अभिनंदन केले.Congress considers their family bigger than the nation: PM Modi in Kotputli
April 02nd, 03:33 pm
Launching the BJP-led NDA's campaign in Rajasthan’s Kotputli for the Lok Sabha polls, Prime Minister Narendra Modi reminisced about how he highlighted the magnificence of Jaipur a few days ago during the visit of the President of France. The PM said, “The first electoral rally of my Rajasthan campaign began in Dhundhar in 2019. Now, in 2024, the electoral campaign begins again from the same region. You have also made your decision – ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’.”PM Modi delivers an impactful speech at a public gathering in Kotputli, Rajasthan
April 02nd, 03:30 pm
Launching the BJP-led NDA's campaign in Rajasthan’s Kotputli for the Lok Sabha polls, Prime Minister Narendra Modi reminisced about how he highlighted the magnificence of Jaipur a few days ago during the visit of the President of France. The PM said, “The first electoral rally of my Rajasthan campaign began in Dhundhar in 2019. Now, in 2024, the electoral campaign begins again from the same region. You have also made your decision – ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’.”राजस्थानातील पोखरण येथे ‘एक्सरसाइज भारत शक्ती’ कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 12th, 02:15 pm
राजस्थानचे मुख्यमंत्री श्रीमान भजनलाल जी शर्मा, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी राजनाथ सिंह जी, गजेंद्र शेखावत जी, कैलाश चौधरी जी, पीएसए प्राध्यापक अजय सूद जी, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल हरी कुमार, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, वरिष्ठ अधिकारीवर्ग, तिन्ही सेनेतील सर्व शूर वीर.... आणि इथे उपस्थित असलेले पोखरणच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो !राजस्थानातील पोखरण येथे 'भारत शक्ती "या तिन्ही सैन्यदलांच्या नेमबाजी आणि लष्करी डावपेचांच्या सराव कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
March 12th, 01:45 pm
इथे आज दिसलेले शौर्य आणि कौशल्य हे नव्या भारताची हाक आहे. “आज पुन्हा एकदा पोखरण भारताच्या आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि त्याच्या वैभवाच्या त्रिवेणीचे साक्षीदार बनले आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. हे तेच पोखरण आहे ज्याने भारताची अणुचाचणी पाहिली आणि आज आपण स्वदेशीकरणाच्या सामर्थ्याचे साक्षीदार झालो आहोत असे ते पुढे म्हणाले.विकसित भारत विकसित राजस्थान कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 16th, 11:30 am
विकसित भारत विकसित राजस्थान या महत्त्वपूर्ण कार्यक्रमामध्ये यावेळेस राजस्थानच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून लाखो मित्र सहभागी झाले आहेत. मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि मी मुख्यमंत्री जी यांना सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी तंत्रज्ञानाचा एवढा अप्रतिम वापर करून लोकांपर्यंत पोचण्यासाठी मला संधी प्राप्त करून दिली. काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतींचे आपण जयपुर मध्ये ज्या प्रकारे स्वागत सत्कार केला त्याचा आवाज संपूर्ण भारतात दुमदुमत आहे. एवढेच नाही तर फ्रान्स मध्ये सुद्धा त्याचीच चर्चा ऐकू येत आहे.आणि हीच तर राजस्थानच्या लोकांची खरी ओळख आहे.पंतप्रधानांनी ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ कार्यक्रमाला केले संबोधित
February 16th, 11:07 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 'विकसित भारत विकसित राजस्थान' कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी 17,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते, रेल्वे, सौर ऊर्जा, वीज पारेषण, पेयजल, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील हे प्रकल्प आहेत.पंतप्रधान 16 फेब्रुवारीला ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला करणार संबोधित
February 15th, 03:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत विकसित राजस्थान’ या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान 17,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. हे प्रकल्प रस्ते, रेल्वे, सौरऊर्जा, वीज पारेषण,पेयजल तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू यासह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमधील आहेत.