अरुणाचल प्रदेशामधील विकसित भारत - विकसित (नॉर्थ ईस्ट) ईशान्य प्रदेश कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

March 09th, 11:09 am

अरुणाचल प्रदेश, मणिपुर, मेघालय, नागालैंड, सिक्किम आणि त्रिपुराचे राज्यपाल महोदय आणि मुख्यमंत्री गण, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यांमधील मंत्रीगण, संसदेतील सहकारी, सर्व उपस्थित आमदार, इतर उपस्थित लोकप्रतिनिधी आणि या सर्व राज्यांमधील माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!

अरुणाचल प्रदेशमध्ये इटानगर येथे पंतप्रधानांनी केले विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमात मार्गदर्शन

March 09th, 10:46 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश कार्यक्रमाला संबोधित केले. मोदी यांनी मणिपूर, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशात सुमारे 55,600 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. त्यांनी सेला बोगद्याचे लोकार्पण केले आणि सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या उन्नती योजनेचा शुभारंभ केला. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, आरोग्य, गृहनिर्माण, शिक्षण, सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा, तेल आणि वायू यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे.