Congress' deep partnership & collaboration with Pakistan has been exposed: PM Modi in Anand

May 02nd, 11:10 am

Ahead of the impending Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi addressed a powerful rally in Anand, Gujarat. He added that his mission is a 'Viksit Bharat' and added, 24 x 7 for 2047 to enable a Viksit Bharat.

PM Modi addresses powerful rallies in Anand, Surendranagar, Junagadh and Jamnagar in Gujarat

May 02nd, 11:00 am

Ahead of the impending Lok Sabha elections, Prime Minister Narendra Modi addressed powerful rallies in Anand, Surendranagar, Junagadh and Jamnagar in Gujarat. He added that his mission is a 'Viksit Bharat' and added, 24 x 7 for 2047 to enable a Viksit Bharat.

गुजरातमधील द्वारका येथे विविध प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 25th, 01:01 pm

व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेंद्र भाई पटेल, संसदेतील माझे सहकारी गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्रीमान सी आर पाटिल, अन्य सर्व मान्यवर, आणि गुजरातमधील माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी तर माता स्वरुप माझ्या अहीर भगिनी ज्यांनी माझे स्वागत केले, त्यांना मी श्रद्धापूर्वक प्रणाम करतो आणि आदरपूर्वक आभार व्यक्त करतो. थोड्याच दिवसापूर्वी समाज माध्यमावर एक चित्रफीत फारच गाजत होती. द्वारकेत 37000 अहीर भगिनी एकत्र गरबा खेळत होत्या. तेव्हा लोक मला खूप अभिमानाने सांगत होते की साहेब या द्वारकेत 37000 अहीर भगिनी! मी म्हटले, बंधू तुम्हाला गरबा दिसला, परंतु तिथले आणखी एक वैशिष्ट्य हे होते की 37000 अहीर बहिणी जेव्हा तिथे गरबा खेळत होत्या ना, तेव्हा तिथे कमीत कमी 25000 किलो सोने त्यांच्या अंगावर होते. ही संख्या तर मी कमीत कमी सांगतोय. जेव्हा लोकांना कळले की 25000 किलो सोने आणि गरबा, तर लोकांना खूप आश्चर्य वाटले. अशा मातृ स्वरूप तुम्ही सर्वांनी माझे स्वागत केले, तुमचे आशीर्वाद मिळाले, मी सर्व अहीर भगिनींचे नतमस्तक होऊन आभार व्यक्त करतो.

पंतप्रधानांनी गुजरातमध्ये द्वारका येथे 4150 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि भूमिपूजन

February 25th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये द्वारका येथे 4150 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. ओखा मुख्यभूमी आणि बेट द्वारका यांना जोडणारा सुदर्शन सेतू, वाडीनार आणि राजकोट-ओखा येथील पाईपलाईन प्रकल्प आणि राजकोट-जेतलसर-सोमनाथ आणि जेतलसर- वांसजालिया रेल्वे विद्युतीकरण प्रकल्पांचे लोकार्पण केले. राष्ट्रीय महामार्ग क्र. 927 च्या धोराजी- जामकंदोर्ना -कलावद सेक्शनच्या रुंदीकरण प्रकल्पाची, जामनगर येथील प्रादेशिक विज्ञान केंद्राची आणि जामनगर येथील सिक्का औष्णिक उर्जा केंद्रात फ्ल्यू गॅस डिसल्फरायजेशन प्रणाली बसवण्याच्या प्रकल्पांची त्यांनी पायाभरणी केली.

विकसित भारत विकसित गुजरात कार्यक्रमात पंतप्रधानांचे संबोधन

February 10th, 01:40 pm

गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, केम छो...मजा मा. आज विकसित भारत-विकसित गुजरात हे फार मोठे अभियान सुरु होत आहे. आणि मला असे सांगण्यात आले आहे की, गुजरातमधील विधानसभेच्या सर्वच्या सर्व 182 जागांवर गुजरातच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. विकसित गुजरातच्या या प्रवासात तुम्ही सर्वजण इतक्या उत्साहाने सहभागी झाला आहात...मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

‘विकसित भारत विकसित गुजरात’ कार्यक्रमात पंतप्रधानांचे मार्गदर्शन

February 10th, 01:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘विकसित भारत विकसित गुजरात’ या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) आणि इतर गृहनिर्माण योजनांतर्गत गुजरातमध्ये बांधण्यात आलेल्या 1.3 लाखांपेक्षा जास्त घरांचे उद्घाटन आणि भूमीपूजन केले. यावेळी त्यांनी आवास योजनेच्या काही लाभार्थ्यांसोबत संवाद देखील साधला.