गोव्यामधील विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 06th, 02:38 pm

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्ले जी, येथील तरुण मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीगण, इतर मान्यवर आणि गोव्यातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.समस्त गोंयकारांक, मना-कालझा सावन नमस्कार। तुमचो मोग अनी उर्बा पूड़ोंन, म्हाका गोयांत योन सदांच खोस सता।

पंतप्रधानांनी गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 "या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी

February 06th, 02:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात 'विकसित भारत, विकसित गोवा 2047 या कार्यक्रमात 1330 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. आज पायाभरणी तसेच उद्घाटन झालेल्या विकास प्रकल्पांमध्ये शिक्षण, क्रीडा, जलसंस्करण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देणे आदींचा समावेश आहे. पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याअंतर्गत विविध विभागांमध्ये नव्याने भरती झालेल्या 1930 सरकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेशही वितरित केले. विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांनी मंजुरी पत्रेही सुपूर्द केली.