पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प पश्चात भारतीय उद्योग महासंघाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या परिषदेला केलेले संबोधन

July 30th, 03:44 pm

सीआयआय चे अध्यक्ष संजीव पुरी जी, येथे उपस्थित असलेले सर्व उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहकारी, वरिष्ठ मुत्सद्दी, दूरदृश्य प्रणालीद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेले उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील सर्व प्रतिनिधी, इतर सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो!

भारतीय उद्योग महासंघाने (सीसीआय) ने आयोजित केलेल्या ‘विकसित भारताकडे वाटचाल’ या परिषदेच्या उद्‌घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

July 30th, 01:44 pm

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे सीसीआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने ‘विकसित भारताच्या दिशेने वाटचाल’ या संकल्पनेवर आयोजित केलेल्या परिषदेच्या उद्‌घाटन सत्रात पंतपधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.अलीकडेच 2024-25 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आयोजित या परिषदेचा उद्देश विकासाबद्दलच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाची रूपरेषा आणि उद्योगाची भूमिका मांडणे हा होता.

पंतप्रधान दिनांक 30 जुलै रोजी भारतीय उद्योग महासघा (CII) द्वारे होणाऱ्या अर्थसंकल्पानंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला करणार संबोधित

July 29th, 12:08 pm

'विकसित भारताकडे प्रवास: केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरची परिषद' या दिनांक 30 जुलै, 2024 रोजी दुपारी 12 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.

3 फेब्रुवारी रोजी सी. एल. ई. ए.- राष्ट्रकुल देशांच्या विधीज्ञ आणि महाधिवक्ता परिषद 2024 चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार.

February 02nd, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रकुल कायदे शिक्षण संघटना (सी. एल. ई. ए.)- राष्ट्रकुल देशांच्या विधीज्ञ आणि महाधिवक्ता परिषद (सी. ए. एस. जी. सी.) 2024 चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधितही करतील.

‘पंडित मदन मोहन मालवीय यांचे संकलित कार्य ’ याचे 25 डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

December 24th, 07:47 pm

महामना पंडित मदन मोहन मालवीय यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 4.30 वाजता 'पंडित मदन मोहन मालवीय यांचे संकलित कार्य’ याच्या 11 खंडांच्या पहिल्या मालिकेचे प्रकाशन करतील. विज्ञान भवनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद 2023’ चे करणार उद्‌घाटन

September 22nd, 02:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे ‘आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद 2023’ चे उद्‌घाटन करतील. पंतप्रधान या परिषदेला मार्गदर्शनही करतील.

सीबीआयच्या हीरक महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधान 3 एप्रिल रोजी करणार उद्घाटन

April 02nd, 10:43 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे दुपारी 12 वाजता केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) च्या हीरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन करतील.

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाचे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांच्या उद्‌घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण

March 22nd, 03:34 pm

आजचा दिवस खूप विशेष आहे, खूप पवित्र आहे. आज पासून हिंदू कालगणनेच्या नव्या वर्षाची सुरुवात होत आहे. मी आपणा सर्वांना आणि सर्व देशवासियांना विक्रम संवत्सर 2080 या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या एवढ्या विशाल देशामध्ये, विविधतेनं नटलेल्या देशामध्ये, युगानुयुगे वेगवेगळ्या प्रकारच्या कालगणना प्रचलित आहेत. कोल्लम कालगणनेची मल्याळम दिनदर्शिका आहे, तामिळ कालगणना आहे. या सर्व कालगणना, शेकडो वर्षांपासून भारताला तिथीं बद्दलची माहिती आणि ज्ञान पुरवत आल्या आहेत. विक्रम संवत्सर सुद्धा 2080 वर्ष आधीपासून चालत आलं आहे. ग्रेगरियन कालगणनेनुसार सध्या 2023 हे वर्ष सुरू आहे, मात्र विक्रम संवत्सर, 2023 च्या 57 वर्ष आधीपासून आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय की नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, दूरसंचार, माहिती संवाद तंत्रज्ञान आणि या गोष्टींशी संलग्न नवोन्मेष यांच्या बाबतीत खूपच मोठी सुरुवात भारतात होत आहे. आज इथे, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ- आय टी यू चं क्षेत्रीय कार्यालय आणि फक्त क्षेत्रीय कार्यालयच नाही, तर क्षेत्रीय कार्यालया सोबत नवोन्मेष केंद्राची स्थापना झाली आहे. याबरोबरच आज 6-जी चाचणी उपकरणाचही (टेस्ट बेड) उद्घाटन झालं आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग करु पाहणाऱ्या आपल्या व्हिजन डॉक्युमेंट म्हणजेच उद्दिष्टनाम्याचं अनावरण सुद्धा करण्यात आलं आहे. यामुळे डिजिटल भारताला नवी ऊर्जा मिळण्यासोबतच, दक्षिण आशियासाठी, दक्षिण जगतासाठी, नवे उपाय, नवे नवोन्मेष उपलब्ध होणार आहेत. विशेष करून आपलं शैक्षणिक क्षेत्र, आपले नवंउद्योजक(स्टार्ट अप्स), नवोन्मेषक, आपलं उद्योगजगत यांच्यासाठी नवनव्या संधी निर्माण होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU)चं नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं पंतप्रधानांनी केलं उद्घाटन

March 22nd, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात झालेल्या एका कार्यक्रमात, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ ( इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन-ITU ) चे नवे क्षेत्रीय कार्यालय आणि नवोन्मेष केंद्र यांचं उद्घाटन केलं.पंतप्रधानांनी भारत 6G व्हिजन डॉक्युमेंट या भविष्यकालीन आराखड्याच्या उद्दिष्टनाम्याचही अनावरण केलं आणि 6G च्या संशोधन आणि विकास चाचणी उपकरणाचं (टेस्ट बेड) उद्घाटन केलं. खोदकामांच्या अनुषंगानं सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनं संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या ‘कॉल बिफोर यू डिग’ या अॅपचही उद्घाटन, त्यांनी केलं. ITU, ही माहिती आणि संवाद तंत्रज्ञान (इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी-ICT) साठी, संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेली विशेष संस्था आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापनेसाठी, भारतानं ITU सोबत मार्च 2022 मध्ये, यजमान देश करारावर स्वाक्षरी केली. यामुळे, भारत, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, अफगाणिस्तान आणि इराण या देशांना सेवा मिळून, या राष्ट्रांमधील आपापसातील समन्वय आणि या प्रदेशांना परस्पर लाभदायक ठरणारं आर्थिक सहकार्य वाढेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्‌घाटन करणार

March 21st, 04:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजता नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटना आय टी यू च्या भारतातील क्षेत्रीय कार्यालयाचे आणि नवोन्मेष केंद्राचे उद्‌घाटन करणार आहेत. पंतप्रधान, भारत 6G पथदर्शी दस्तावेज आणि 6G संशोधन आणि विकास टेस्ट बेड ह्या सुविधेचे अनावरण करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ‘कॉल बिफोर यू डिग’ ॲप चे अनावरण देखील होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठाच्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन पंतप्रधान 10 मार्च रोजी करणार

March 09th, 04:48 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात दुपारी 4:30 वाजता राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण मंच (NPDRR) च्या तिसऱ्या सत्राचे उद्घाटन करतील. यातील तिसऱ्या सत्राची मुख्य संकल्पना बदलत्या हवामानात स्थानिक पातळीवर जुळवून घेण्याची क्षमता निर्माण करणे आहे.

नवी दिल्ली येथे लचित बोरफुकन यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त वर्षभर चाललेल्या कार्यक्रमांच्या समारोप समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 25th, 11:00 am

आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, लोकप्रिय मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्र आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल, विधानसभेचे अध्यक्ष बिस्वजित, निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई, तपन कुमार गोगोई, आसाम सरकारचे मंत्री पिजूष हजारिका, संसद सदस्य आणि या कार्यक्रमात सहभागी असलेले आणि देश-विदेशातील आसामी संस्कृतीशी संबंधित सर्व मान्यवर.

शूरवीर लचित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त गेले वर्षभर साजऱ्या होत असलेल्या कार्यक्रमांचा पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्ली येथे समारोप

November 25th, 10:53 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लचित बोरफुकन यांच्या 400व्या जयंतीनिमित्त गेले वर्षभर सुरु असलेल्या सोहळ्याचा आज नवी दिल्ली येथे समारोप केला. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात ‘लचित बोरफुकन – मुघलांना रोखणारे आसामचे शूरवीर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील केले.

पंतप्रधान 25 नोव्हेंबर 2022 रोजी लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंती वर्षाच्या समारोप समारंभाला संबोधित करणार

November 24th, 11:51 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजेच उद्या विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सकाळी 11 वाजता लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंती वर्षाच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत.

दक्षता सप्ताहानिमित्त 3 नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान संबोधित करणार

November 02nd, 04:53 pm

केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी ) दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त, नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे 3 नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता संबोधित करणार आहेत.

‘यथास्थान(इन-सिटू) झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत’ दिल्लीतील कालकाजी येथे नव्याने बांधलेल्या 3024 सदनिकांचे 2 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान करणार उद्‌घाटन

November 01st, 05:06 pm

‘यथास्थान(इन-सिटू) झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत’ दिल्लीतील कालकाजी, येथे नव्याने बांधलेल्या 3024 ईडब्लूएस सदनिकांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्‌घाटन करतील. तसेच भूमिहीन शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना किल्ल्या सुपूर्द करतील. दिल्लीतील विज्ञान भवन येथे 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.