पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथे भारतीय समुदायाला केलेले संबोधन

July 10th, 11:00 pm

सुरवात करू मी ? ऑस्ट्रियाचे सन्माननीय अर्थव्यवस्था विभाग आणि श्रम मंत्री, भारतीय समुदायाचा माझा सर्व मित्रवर्ग,शुभचिंतक आपणा सर्वाना नमस्कार.

पंतप्रधानांनी ऑस्ट्रिया येथील भारतीय समुदायाला संबोधित केले

July 10th, 10:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ व्हिएन्ना येथे भारतीय समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले.व्हिएन्ना येथे आगमन झाल्यानंतर तेथील समुदायाने विशेष स्नेहाने आणि आपुलकीने पंतप्रधानांचे स्वागत केले.ऑस्ट्रियाचे श्रम आणि अर्थव्यवस्था विभागाचे मंत्री मार्टिन कोचर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. संपूर्ण ऑस्ट्रियातील विविध ठिकाणचे भारतीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

वर्धित भारत-ऑस्ट्रिया भागीदारीवर संयुक्त निवेदन

July 10th, 09:15 pm

चान्सलर कार्ल नेहॅमर यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9-10 जुलै 2024 या कालावधीत ऑस्ट्रियाला अधिकृत भेट दिली. त्यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन यांची भेट घेतली आणि चान्सलर नेहॅमर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.पंतप्रधानांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा होता तर भारतीय पंतप्रधानांचा 41 वर्षांनंतरचा हा पहिला दौरा होता.दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांचे हे 75 वे वर्ष आहे.

ऑस्ट्रियाच्या चॅन्सलर सोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन

July 10th, 02:45 pm

सर्वप्रथम, हार्दिक स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी चॅन्सलर नेहमर यांचे आभार मानतो. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या अगदी सुरुवातीला ऑस्ट्रियाला भेट देण्याची संधी मिळाल्याने मला आनंद होत आहे. माझी ही भेट ऐतिहासिक आणि खास आहे. एकेचाळीस वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट दिली आहे. आपल्या द्विपक्षीय संबंधांना 75 वर्षे पूर्ण होत असताना ही भेट होत आहे, हा देखील एक सुखद योगायोग आहे.

पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रियात व्हिएन्ना येथे आगमन

July 09th, 11:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे दाखल झाले. आपल्या या दौऱ्यात पंतप्रधान अध्यक्ष अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन आणि चान्सेलर कार्ल नेहॅमर यांची भेट घेणार. भारताच्या पंतप्रधानांची 40 वर्षांहून अधिक काळातील ही पहिलीच ऑस्ट्रिया भेट आहे.

पंतप्रधान रशिया आणि ऑस्ट्रिया (8-10 जुलै 2024) ला भेट देणार

July 04th, 05:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 ते 10 जुलै 2024 दरम्यान रशिया आणि ऑस्ट्रियाला अधिकृत भेट देणार आहेत.

व्हिएन्नामधील दहशतवादी हल्ल्यांचा पंतप्रधानांनी केला निषेध

November 03rd, 12:13 pm

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी व्हिएन्नामधील भयानक दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला आहे.