'मन की बात'च्या बाबतीत लोकांनी जे प्रेम दाखवले ते अभूतपूर्व: पंतप्रधान मोदी

May 28th, 11:30 am

‘मन की बात’ कार्यक्रमात पुन्हा एकदा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. ‘मन की बात’चा हा भाग म्हणजे या कार्यक्रमाच्या द्विशतकाचा प्रारंभ आहे. गेल्या महिन्यात आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा शतक महोत्सव साजरा केला आहे. तुम्हा सर्वांचा सहभाग, हेच या कार्यक्रमाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. शंभराव्या भागाच्या प्रसारणाच्या वेळेला, एक प्रकारे संपूर्ण देश एका धाग्यात बांधला गेला होता. आपले स्वच्छता कर्मचारी बंधू-भगिनी असोत किंवा विविध क्षेत्रातील नामवंत, ‘मन की बात’ने सर्वांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. तुम्ही सर्वांनीच या कार्यक्रमाप्रती जी आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त केला आहे, तो केवळ अभूतपूर्व आहे, भावुक करणारा आहे. जेव्हा ‘मन की बात’चे प्रसारण सुरु होते तेव्हा जगाच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या देशांमध्ये, विविध टाईम झोन मध्ये, काही ठिकाणी संध्याकाळ होत होती, तर काही ठिकाणी रात्र उलटून गेली होती, असे असूनही, तिथल्या लोकांनी 100 वा भाग ऐकण्यासाठी वेळ काढला. आपल्यापासून हजारो मैल दूर असलेल्या न्यूझीलंड देशातला एक व्हिडीओ मी पाहिला, तिथल्या शंभर वर्ष वयाच्या एक मातोश्री आपल्याला आशीर्वाद देत होत्या. 'मन की बात’ कार्यक्रमाबद्दल देश विदेशातील लोकांनी त्यांची मते मांडली आहेत.अनेक जणांनी या कार्यक्रमाचे संरचनात्मक विश्लेषण देखील केले आहे. ‘मन की बात' या कार्यक्रमात केवळ देश आणि देशवासीयांचे कर्तुत्व यांचीच चर्चा होते, याचे लोकांनी कौतुक केले आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या पाठींब्यासाठी आदरसहित धन्यवाद देतो.

नवी दिल्लीत कर्तव्यपथच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 08th, 10:41 pm

आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत. सर्व देशवासीय यावेळी या कार्यक्रमाशी जोडले गेले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेल्या सर्व देशवासियांचे मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. या ऐतिहासिक क्षणी, मंत्रीमंडळातील माझे सहकारी श्री हरदीप पुरी जी, श्री जी किशन रेड्डी जी, श्री अर्जुनराम मेघवाल जी, श्रीमती मीनाक्षी लेखी जी, श्री कौशल किशोर जी आज माझ्यासोबत मंचावर उपस्थित आहेत. देशातील अनेक मान्यवरही आज येथे उपस्थित आहेत.

PM inaugurates 'Kartavya Path' and unveils the statue of Netaji Subhas Chandra Bose at India Gate

September 08th, 07:00 pm

PM Modi inaugurated Kartavya Path and unveiled the statue of Netaji Subhas Chandra Bose. Kingsway i.e. Rajpath, the symbol of colonialism, has become a matter of history from today and has been erased forever. Today a new history has been created in the form of Kartavya Path, he said.

पाणी वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यकः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

March 27th, 11:00 am

गेल्या आठवड्यात आपण एक असे यश संपादन केलं आहे, ज्याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटेल. आपण ऐकले असेल, की भारतानं गेल्या आठवड्यात, 400 अब्ज डॉलर्स म्हणजे 30 लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचे लक्ष्य साध्य केलं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर असं वाटेल की ही तर अर्थव्यवस्थेशी संबंधित गोष्ट आहे. मात्र, ही अर्थव्यवस्थेपेक्षाही, भारताचे सामर्थ्य, भारताच्या क्षमतेशी संबंधित बाब आहे.एक काळ असा होता, जेव्हा भारतातून होणाऱ्या निर्यातीचा आकडा देखील 100 अब्ज, कधी 200 अब्ज इतका राहत असे. मात्र, आज भारताची निर्यात, 400 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. याचा एक अर्थ असा आहे, की जगभरात, भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांची मागणी वाढते आहे. आणि दूसरा अर्थ असा आहे की भारताची पुरवठा साखळी व्यवस्था देखील दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. यातून एक खूप मोठा संदेशही आपल्याला मिळाला आहे,तो असा, की देशाच्या स्वप्नांपेक्षाही जेव्हा देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावले उचलू शकतो. जेव्हा संकल्पपूर्ती करण्यासाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातात, तेव्हाच ते संकल्प खरे होतात, आणि आपण बघा, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील, असेच घडते, नाही का? जेव्हा कोणाचेही संकल्प, त्यांचे प्रयत्न, त्यांच्या स्वप्नांपेक्षाही मोठे होतात, तेव्हा यश स्वतःच त्यांच्याकडे चालत येते.

कोलकाता येथील व्हिक्टोरिया स्मृती भवनात बिप्लवी भारत कलादालनाच्या उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 23rd, 06:05 pm

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड़ जी, केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री किशन रेड्डी जी, व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलशी संबंधित सर्व मान्यवर, विद्यापीठांचे कुलगुरू, कला आणि सांस्कृतिक विश्वातील दिग्गज, स्त्री आणि पुरुषहो,

शहीद दिवसानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते कोलकाता येथील विक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे उद्घाटन

March 23rd, 06:00 pm

शहीद दिवसाचे औचित्य साधत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, पश्चिम बंगालच्या कोलकाता इथल्या व्हिक्टोरिया स्मृतिभवनात बिप्लवी भारत गॅलरीचे, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड आणि केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शहीद दिनानिमित्त कोलकातातील व्हिक्टोरिया स्मारक सभागृह, इथे पंतप्रधानांच्या हस्ते होणार बिप्लोबी भारत कलादालनाचे उद्घाटन

March 22nd, 11:45 am

23 मार्च रोजी कोलकातामध्ये व्हिक्टोरिया स्मारक सभागृहात, संध्याकाळी 6 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बिप्लोबी भारत कलादालनाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

आत्मनिर्भर बंगाल आत्मनिर्भर भारताच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावेल- पंतप्रधान

January 23rd, 11:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्यासमोर एक लक्ष्य आणि क्षमता असली पाहिजे जी आपल्याला धैर्याने वाटचाल करण्याची प्रेरणा देईल या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विधानाची आठवण करून दिली. आज आत्मनिर्भर भारतात आपल्याकडे ते लक्ष्य आणि क्षमता आहे. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य आपली आंतरिक क्षमता आणि निर्धाराने साध्य होईल, असे मोदी यांनी सांगितले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विधानाचा दाखला देऊन पंतप्रधानांनी सांगितले की आपल्यासमोर आपल्या देशासाठी आपले रक्त आणि घाम गाळून योगदान देण्याचे एकमेव उद्दिष्ट असले पाहिजे आणि आपल्या कष्टांनी आणि नवोन्मेषाने आपण भारताला आत्मनिर्भर बनवले पाहिजे.

पंतप्रधान येत्या 23 जानेवारीला आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार

January 21st, 02:01 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 23 जानेवारी 2021 रोजी कोलकात्याला जाणार असून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीवर्षानिमित्त होणाऱ्या ‘पराक्रम दिवसाच्या विशेष कार्यक्रमात ते आपले विचार मांडतील. तसेच, पंतप्रधान त्यानंतर, आसाममधील जीरांगा पठार या ठिकाणीही भेट देणार असून तिथे एक लाख सहा हजार भूमी पट्ट्यांचे वाटप लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते केले जाईल.

कोलकातामधील नूतनीकरण करण्यात आलेल्या चार वारसा इमारतींच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 11th, 05:31 pm

आज तुमच्याबरोबर असताना, या सर्व गोष्टींकडे पाहत होतो तेव्हा मन त्या भावनांनी भरून गेले होते. आणि हे प्रदर्शन, असे वाटत होते जणू काही ते क्षण मी स्वतः जगत आहे , जे त्या महान चित्रकारांनी, कलाकारांनी , रंगकारानी रचले आहेत, जगले आहेत. बांग्ला भूमीची, बंगालच्या मातीची ही अद्भुत शक्ति, आकर्षित करणारा सुगंध यांना वंदन करण्याची ही मला संधी आहे. याच्याशी निगडित भूतकाळातील आणि वर्तमानातील सर्वांना मी आदरांजली अर्पण करतो.

पंतप्रधानांनी कोलकाता मधील चार पुनर्विकसित वारसा इमारती राष्ट्राला केल्या समर्पित

January 11th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकातामधील चार पुनर्विकसित इमारती राष्ट्राला समर्पित केल्या. यामध्ये ओल्ड करंसी इमारत, बेलवेडियर हाउस, विक्टोरिया मेमोरियल हॉल आणि मेटकाफ हाउस यांचा समावेश आहे.