झेकोस्लोव्हाकिया चे पंतप्रधान पेट्र फियाला यांनी दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

January 10th, 07:09 pm

झेक प्रजासत्ताकचे (झेकोस्लोव्हाकिया) पंतप्रधान पेट्र फियाला, व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी 9-11 जानेवारी 2024 दरम्यान भारत भेटीसाठी आले असून, त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी विशेषतः माहिती (ज्ञान), तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक क्षेत्रांसह विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध पुढे नेण्याच्या मार्गांवर चर्चा केली. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत अनेक झेक कंपन्यांनी संरक्षण, रेल्वे आणि विमान वाहतूक क्षेत्रात भारतीय उत्पादकांशी भागीदारी केल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी असेही अधोरेखित केले की भारताची विकास गाथा आणि झेक प्रजासत्ताकचा मजबूत औद्योगिक पाया हे दोन जागतिक पुरवठा साखळीतील आदर्श भागीदार आहेत.

व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद म्हणजे आर्थिक वाढ, सुधारणा आणि भारताच्या विकास प्रवास बळकटीकरणाचा दृष्टीकोन सामायिक करण्यासाठी एक उत्तम मंच : पंतप्रधान

January 10th, 06:18 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या व्हायब्रंट गुजरात शिखर परिषदेची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.

जागतिक उद्योग प्रमुखांनी दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेत पंतप्रधानांच्या दूरदृष्टीची केली प्रशंसा

January 10th, 12:28 pm

गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. 'भविष्यासाठीचे प्रवेशद्वार' ही या वर्षीच्या शिखर परिषदेची संकल्पना आहे. यात 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संघटनांचा सहभाग आहे. ईशान्येकडील प्रदेशांतील गुंतवणुकीच्या संधीची माहिती देण्यासाठी ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय एक व्यासपीठ म्हणूनही या परिषदेचा उपयोग करत आहे.

गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद 2024 च्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 10th, 10:30 am

तुम्हां सर्वांना 2024 या नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नजीकच्या भूतकाळातच भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि आता भारत पुढील 25 वर्षांच्या उद्दिष्टांवर काम करत आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्यप्राप्तीची शतकपूर्ती साजरी करेल तोपर्यंत भारताला विकसित रूप देण्याचे उद्दिष्ट आपण निश्चित केले आहे. आणि म्हणूनच, 25 वर्षांचा हा कार्यकाळ, भारतासाठी अमृतकाळ आहे. ही नवी स्वप्ने, नवे संकल्प आणि नित्य-नव्या यशस्वी कार्यांचा काळ आहे. याच अमृतकाळात ही पहिली व्हायब्रंट गुजरात शिखर परिषद होत आहे. आणि म्हणूनच या परिषदेचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. या परिषदेला उपस्थित राहिलेले 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी, भारताच्या या विकास यात्रेचे महत्त्वाचे सहयोगी आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, तुमचे अभिनंदन करतो.

पंतप्रधानांच्या हस्ते 10 व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेचे उद्‌घाटन

January 10th, 09:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातच्या गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चे उद्घाटन झाले. यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना, “भविष्यासाठीचा मार्ग” अशी असून त्यात, 34 भागीदार देश आणि 16 भागीदार संस्थांचा सहभाग आहे. ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयासाठी एक व्यासपीठ म्हणूनही ह्या शिखर परिषदेचा वापर होत असून, त्याद्वारे ईशान्य भारत प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी उद्योजकांसमोर मांडल्या जात आहेत.

PM Modi meets CEOs of global firms in Gandhinagar, Gujarat

January 09th, 04:30 pm

Prime Minister Narendra Modi met CEOs of various global organisations and institutes in Gandhinagar, Gujarat. These included Sultan Ahmed Bin Sulayem of DP World, Mr. Sanjay Mehrotra of Micron Technology, Professor Iain Martin of Deakin University, Mr. Keith Svendsen of A.P. Moller – Maersk and Mr. Toshihiro Suzuki of Suzuki Motor Corp.

10 व्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 च्या अनुषंगाने पंतप्रधानांनी मोझांबिकच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

January 09th, 02:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 09 जानेवारी 2024 रोजी मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलीपे जॅकिंटो न्युसी यांची भेट घेतली.

तिमोर-लेस्टेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत पंतप्रधानांची बैठक

January 09th, 11:16 am

गांधीनगर येथे होणाऱ्या दहाव्या व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी तिमोर-लेस्टेचे राष्ट्राध्यक्ष डॉ. जोस रामोस होर्टा हे 8-10 जानेवारी 2024 या कालावधीत भारत दौऱ्यावर आले आहेत.

पंतप्रधान 8 ते 10 जानेवारी दरम्यान गुजरात दौऱ्यावर

January 07th, 03:11 pm

नऊ जानेवारीला, सकाळी साडे नऊच्या सुमाराला, पंतप्रधान गांधीनगर इथल्या महात्मा मंदिर इथे पोहोचणार असून, तिथे जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत, त्यानंतर आघाडीच्या जागतिक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कार्यकारी प्रमुखांसोबत त्यांची बैठक होईल. दुपारी तीनच्या सुमाराला, पंतप्रधानांच्या हस्ते, व्हायब्रंट गुजरात जागतिक ट्रेड शो चे उद्घाटन होईल.

इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 09th, 11:09 am

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, राज्य सरकारचे मंत्री, आयएफसीए चे अध्यक्ष के. राजारामन जी, जगातील प्रतिष्ठित वित्तीय संस्था आणि विविध संस्थांचे नेते, महिला आणि पुरुष,

पंतप्रधानांनी इन्फिनिटी फोरम 2.0 ला केले संबोधित

December 09th, 10:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत फिनटेकवरील जागतिक विचार नेतृत्व मंच असलेल्या इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केले. व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 च्या पूर्वी एक विशेष कार्यक्रमाच्या रुपात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), आणि GIFT City यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या नेतृत्वाखाली, इन्फिनिटी फोरमची दुसरी आवृत्ती आयोजित केली जात आहे. इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीची मुख्य संकल्पना 'GIFT-IFSC: नव्या काळातील जागतिक वित्तीय सेवांचे मुख्य केंद्र' ही आहे.

Vibrant Gujarat is not just an event of branding, but it is also an event of bonding: PM Modi

September 27th, 11:00 am

PM Modi addressed the programme marking 20 years celebration of the Vibrant Gujarat Global Summit at Science City in Ahmedabad. He remarked that the seeds sown twenty years ago have taken the form of a magnificent and perse Vibrant Gujarat. Reiterating that Vibrant Gujarat is not merely a branding exercise for the state but an occasion to strengthen the bonding, PM Modi emphasized that the summit is a symbol of a solid bond associated with him and the capabilities of 7 crore people of the state.

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित

September 27th, 10:30 am

व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 20 वर्षांपूर्वी 28 सप्टेंबर 2003 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरू झाली होती. कालांतराने, त्याचे रूपांतर अस्सल जागतिक कार्यक्रमात झाले आणि भारतातील प्रमुख व्यावसायिक शिखर संमेलनांपैकी ते एक बनले.