वल्लालर नावाने लोकप्रिय श्री रामलिंग स्वामी यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण.
October 05th, 02:00 pm
वणक्कम! महान श्री रामलिंग स्वामी जी, ज्यांना वल्लालर म्हणून देखील ओळखले जाते, त्यांच्या दोनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित या विशेष कार्यक्रमाला संबोधित करणे हा एक सन्मान आहे. वल्लालर यांची जवळीक असलेल्या वडालुरमध्ये हा कार्यक्रम होत आहे हे आणखीनच विशेष. वल्लालर हे आपल्या देशातील सर्वात आदरणीय संतांपैकी एक आहेत. 19 व्या शतकात त्यांनी या पृथ्वीतलावर पाऊल ठेवले पण त्यांची आध्यात्मिक दृष्टी आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. त्यांचा प्रभाव संपूर्ण जगावर दिसून येतो. त्यांच्या विचारांवर आणि आदर्शांवर काम करणाऱ्या अनेक संस्था आजही कार्यरत आहेत.वल्ललार म्हणूनही ओळखले जाणारे श्री रामलिंग स्वामी यांच्या 200व्या जयंती सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित
October 05th, 01:30 pm
या सोहळ्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन वल्लालर यांच्याशी अतिशय जवळचा संबंध असलेल्या वडालूर या ठिकाणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वल्लालर हे भारतामधील सर्वाधिक आदरणीय संतांपैकी एक होते, जे 19व्या शतकात पृथ्वीवर अवतरले आणि त्यांची आध्यात्मिक शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असे ते म्हणाले. वल्लालर यांचा प्रभाव जागतिक असून अनेक संघटना त्यांचे विचार आणि सिद्धांतावर काम करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित करून सांगितले.