Delhi-Dehradun Vande Bharat Express will ensure ‘Ease of Travel’ as well as greater comfort for the citizens: PM Modi

May 25th, 11:30 am

PM Modi flagged off the inaugural run of Vande Bharat Express from Dehradun to Delhi via video conferencing. He also dedicated to the nation, newly electrified rail sections and declared Uttarakhand a 100% electric traction state. He informed that the travel time between the two cities will be further reduced and the onboard facilities will make for a pleasant travel experience.

पंतप्रधानांनी डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना

May 25th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. तसेच त्यांनी रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे लोकार्पण देखील केले आणि उत्तराखंड राज्याला 100 टक्के विद्युत कर्षण राज्य म्हणून घोषित केले.

केरळची जनता आता भाजपकडे नवीन आशा म्हणून पाहत आहे: पंतप्रधान मोदी

September 01st, 04:31 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.

केरळमधील कोची येथे पंतप्रधान मोदींचे जाहीर सभेत भाषण

September 01st, 04:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमध्ये कोची येथे जाहीर सभेला संबोधित केले. ओणम निमित्त केरळच्या जनतेला शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “ओणमच्या खास मुहूर्तावर मी केरळमध्ये आलो ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सर्वांना ओणमच्या खूप खूप शुभेच्छा,” , पंतप्रधान मोदी म्हणाले.

हरियाणातील फरिदाबाद इथे अमृता रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 24th, 11:01 am

अमृता रुग्णालयाच्या रूपाने आपल्या सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या माता अमृतानंदमयी जी यांना मी वंदन करतो. स्वामी अमृतास्वरूपानंद पुरी जी, हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, कृष्णपाल जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनीनो,

पंतप्रधानांनी फरीदाबाद येथे केले अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन

August 24th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फरीदाबाद येथे अत्याधुनिक अमृत रूग्णालयाचे उद्घाटन केले. यावेळी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल, उप-मुख्यमंत्री दुष्यंत चौताला, केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर, माता अमृतानंदमयी उपस्थित होते.

भारत-बांगलादेश मैत्रीची 50 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली त्याचे आम्ही संयुक्तपणे स्मरण करत हा दिवस साजरा करतो: पंतप्रधान

December 06th, 11:48 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारत-बांगलादेश मैत्रीची 50 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याचे आम्ही संयुक्तपणे स्मरण करतो आणि हा दिवस साजरा करतो.

जयपूर येथील सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेच्या उद्‌घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

September 30th, 11:01 am

राजस्थानच्या भूमीचे सुपुत्र आणि भारताची सर्वात मोठी पंचायत, लोकसभेचे अभिरक्षक, आपले आदरणीय सभापती श्रीमान ओम बिर्ला जी, राजस्थाने मुख्यमंत्री अशोक गहलोत जी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे इतर सहकारी, गजेंद्रसिंह शेखावत, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, कैलाश चौधरी, डॉ. भारती पवार, भगवंत खुबा, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधरा राजे जी, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, राजस्थान सरकारमधले इतर मंत्रिवर्ग, खासदारवर्ग, आमदार, कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर सर्व महनीय आणि राजस्थानच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,

पंतप्रधानांनी जयपूर येथील सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेचे उद्‌घाटन केले

September 30th, 11:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेचे उद्‌घाटन केले. त्यांनी राजस्थानमधील बांसवाडा, सिरोही, हनुमानगढ आणि दौसा जिल्ह्यात चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणीही केली. 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सीआयपीईटी संस्थेबद्दल पंतप्रधानांनी राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. ते म्हणाले की 2014 नंतर केंद्र सरकारने राजस्थानसाठी 23 वैद्यकीय महाविद्यालये मंजूर केली आहेत आणि 7 वैद्यकीय महाविद्यालये आधीच कार्यरत झाली आहेत.

When India grows, the world grows, when India reforms, the world transforms: PM Modi

September 25th, 06:31 pm

Prime Minister Narendra Modi addressed the 76th session of the United Nations General Assembly. In his remarks, PM Modi focused on global challenges posed by Covid-19 pandemic, terrorism and climate change. He highlighted the role played by India at the global stage in fighting the pandemic and invited the world to make vaccines in India.

पंतप्रधान मोदींचे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेतील भाषण

September 25th, 06:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 76 व्या अधिवेशनाला संबोधित केले. त्यांच्या या भाषणात पंतप्रधान मोदींनी कोविड-19 च्या साथीमुळे तसेच दहशतवाद आणि हवामान बदलांमुळे जगासमोर निर्माण झालेली आव्हाने या विषयावर विशेष भर दिला. कोविड साथीविरुद्ध भारताने जागतिक व्यासपीठावर बजावलेली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आणि भारतात येऊन लसींचे उत्पादन करण्याचे त्यांनी साऱ्या जगाला आमंत्रण दिले.

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे

August 15th, 03:02 pm

आज, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पवित्र उत्सवदिनी, देश आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि शूर वीरांना नमन करत आहे, जे राष्ट्राच्या संरक्षणासाठी अहोरात्र बलिदान देत आहेत. देश आज या प्रत्येक विभूतीचे स्मरण करत आहे. आदरणीय बापु, ज्यांनी स्वातंत्र्य ही एक लोक चळवळ बनवली , नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान सारखे महान क्रांतिकारक; झाशीची राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चेन्नम्मा किंवा राणी गायदिनलियू किंवा मातंगीनी हजराचे शौर्य; देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू जी, सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांनी देशाला एकसंध राष्ट्र बनवले आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी भारताची भावी दिशा ठरवली आणि मार्ग सुकर केला. देश या सर्व महान व्यक्तींचा सदैव ऋणी आहे.

15 ऑगस्ट, 2021रोजी, भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण

August 15th, 07:38 am

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना आणि जगभरातील भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !

India Celebrates 75th Independence Day

August 15th, 07:37 am

Prime Minister Shri Narendra Modi today addressed the nation from the Red Fort as the country celebrated its 75th Independence Day. During the speech, PM Modi listed achievements of his government and laid out plans for the future. He made an addition to his popular slogan of “Sabka Saath, Sabka Vikas and Sabka Vishwas.” The latest entrant to this group is “Sabka Prayas.”

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद

August 05th, 01:01 pm

आज आपल्या सर्वांशी संवाद साधून खूप समाधान वाटले.समाधान याचे की दिल्लीहून धान्याचा जो एकेक दाणा पाठवला होता, तो प्रत्येक लाभार्थ्याच्या ताटात पोचतो आहे. समाधान याचेही, की आधीच्या सरकारांच्या काळात, उत्तरप्रदेशात गरिबांच्या अन्नाची जी लूट होत होती, त्यासाठी आता कुठलाही मार्ग उरलेला नाही. उत्तरप्रदेशात आता ज्या प्रकारे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची अंमलबजावणी केली जात आहे, ती नव्या उत्तरप्रदेशाची ओळख आणखी भक्कम करत आहे. मला तुमच्याशी बोलतांना खूप आनंदही होत होता. ज्या हिमतीने आपण सगळे बोलत होतात, ज्या विश्वासाने बोलत होता, त्यामुळे फार चांगले वाटले. तसेच, आपल्या प्रत्येक शब्दातून सच्चेपणा जाणवत होता. त्यामुळेही मला खूप समाधान मिळाले. आपल्या सर्वांसाठी काम करण्याचा माझा उत्साह आज आणखी दुणावला आहे. चला, आपण अशा गप्पा कितीही वेळ मारू शकतो, पण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आता मुख्य कार्यक्रमाकडे वळूया.

पंतप्रधानांचा उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद

August 05th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थ्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.

ई-रुपी डिजिटल पेमेंट सुविधेच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

August 02nd, 04:52 pm

या महत्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून सहभागी झालेले सर्व राज्यपाल, नायब राज्यपाल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, राज्यांचे मुख्य सचिव, विविध औद्योगिक संस्थांशी संबंधित मित्रगण, स्टार्ट अप फिनटेकशी संबंधित युवा मित्र, बँकांचे वरिष्ठ अधिकारी गण, आणि माझ्या प्रिय बंधुभगिनींनो,

पंतप्रधानांनी e-RUPI डिजिटल पेमेंट सुविधेचा केला प्रारंभ

August 02nd, 04:49 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे e-RUPI या व्यक्तिगत आणि उद्देश निश्चित डिजिटल पेमेंट सुविधेचा प्रारंभ केला. डिजिटल पेमेंटसाठी e-RUPI हे रोकडरहित आणि संपर्क विरहीत साधन आहे.

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा सहकार्याच्या (CDRI) वार्षिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

March 17th, 02:36 pm

PM Modi addressed the opening ceremony of International Conference on Disaster Resilient Infrastructure. PM Modi called for fostering a global ecosystem that supports innovation in all parts of the world, and its transfer to places that are most in need.

पंतप्रधानांनी आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा सहकार्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित केले

March 17th, 02:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून CDRI अर्थात आपत्ती प्रतीरोधक पायाभूत सुविधा सहकार्य या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्‌घाटन समारंभ प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. फिजी, इटली आणि युनायटेड किंगडम या देशांचे पंतप्रधान या प्रसंगी उपस्थित होते. अनेक देशांच्या केंद्र सरकारांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संस्था, शैक्षणिक संस्था आणि खासगी क्षेत्रातील अनेक संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील या परिषदेत भाग घेतला.