उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 13th, 02:10 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल जी, मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य जी, ब्रजेश पाठक जी, उत्तर प्रदेशचे मंत्री, सहकारी खासदार आणि आमदार, प्रयागराजचे महापौर आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष, इतर मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण
December 13th, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले. मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जे महाकुंभ यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पित वृत्तीने कार्यरत आहेत. महाकुंभची भव्य व्याप्ती आणि आकार लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले की, हा जगातील सर्वात मोठ्या मेळाव्यांपैकी एक आहे जिथे 45 दिवस चालणाऱ्या महायज्ञासाठी दररोज लाखो भाविकांचे स्वागत केले जाते आणि त्यासाठी संपूर्ण नवीन शहर उभारले जाते. प्रयागराजच्या भूमीवर नवा इतिहास लिहिला जात आहे, असे उद्गार पंतप्रधानांनी काढले. पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभाचे आयोजन देशाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अस्मितेला नव्या उंचीवर नेईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि एकतेच्या या ‘महायज्ञ’ची जगभरात चर्चा होईल असे सांगितले. महाकुंभच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर
December 12th, 02:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. प्रयागराज येथे ते दुपारी 12.15 च्या सुमाराला संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर दुपारी 12:40 च्या सुमारास पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करतील आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी दीडच्या सुमारास ते महाकुंभ प्रदर्शनाच्या ठिकाणाची पाहणी करतील. पंतप्रधान त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास प्रयागराज येथे 5500 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण करतील.आमचे सरकार लोकांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि संपर्कव्यवस्थेच्या सामर्थ्याचा वापर करून समृद्धी निर्माण करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे : पंतप्रधान
December 09th, 10:08 pm
आमचे सरकार लोकांना उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी आणि संपर्कव्यवस्थेच्या सामर्थ्याचा वापर करून समृद्धी निर्माण करण्यासाठी अनेक पावले उचलत आहे,असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.आगामी काळात तयार होणार असलेला नॉयडा आंतरराष्ट्रीय विमानतळ संपर्कव्यवस्थेला आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर प्रदेशातील जीवनसुलभतेला चालना देईल, असे त्यांनी नमूद केले.केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रो टप्पा-IV प्रकल्पाच्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला मंजुरी दिली
December 06th, 08:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दिल्ली मेट्रोच्या टप्पा - IV प्रकल्पाच्या रिठाला - नरेला - नाथुपूर (कुंडली) या 26.463 किलोमीटर कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे,ज्यामुळे राष्ट्रीय राजधानी आणि शेजारील हरियाणा यांच्यातील संचारसंपर्क आणखी वाढेल.हा कॉरिडॉर मंजूर झाल्यापासून 4 वर्षात पूर्ण होणार आहे.उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर
December 06th, 08:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाच्या जवळच्या नातेवाइकाला प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रूपये सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जाहीर केले.पंतप्रधान भुवनेश्वर येथे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षकांच्या परिषदेला पंतप्रधान राहणार उपस्थित
November 29th, 09:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 या कालावधीत ओडिशा येथे आयोजित अखिल भारतीय पोलीस महासंचालक/महानिरीक्षक परिषद 2024 ला उपस्थित राहणार आहेत. भुवनेश्वरमधील लोकसेवा भवनातील राज्य संमेलन केंद्रात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.Maharashtra has witnessed the triumph of development, good governance, and genuine social justice: PM Modi
November 23rd, 10:58 pm
Prime Minister Narendra Modi addressed BJP workers at the party headquarters following the BJP-Mahayuti alliance's resounding electoral triumph in Maharashtra. He hailed the victory as a decisive endorsement of good governance, social justice, and development, expressing heartfelt gratitude to the people of Maharashtra for trusting BJP's leadership for the third consecutive time.PM Modi addresses passionate BJP Karyakartas at the Party Headquarters
November 23rd, 06:30 pm
Prime Minister Narendra Modi addressed BJP workers at the party headquarters following the BJP-Mahayuti alliance's resounding electoral triumph in Maharashtra. He hailed the victory as a decisive endorsement of good governance, social justice, and development, expressing heartfelt gratitude to the people of Maharashtra for trusting BJP's leadership for the third consecutive time.झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
November 16th, 08:23 am
उत्तर प्रदेशात झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन या घटनेतील पीडितांना सर्व प्रकारची मदत करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.हरदोई रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
November 06th, 05:59 pm
उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेल्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या रस्ता अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची कुटुंबे आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमावर @PMOIndia ने जारी केलेल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली.Prime Minister Narendra Modi to launch, inaugurate and lay the foundation stone of multiple projects related to health sector
October 28th, 12:47 pm
PM Modi will launch health initiatives worth ₹12,850 crore, expanding Ayushman Bharat coverage for senior citizens of 70 years and above, introducing medical drone and helicopter services, and inaugurating new AIIMS and ESIC facilities nationwide. Key projects also include the U-WIN vaccination portal and multiple research centers, advancing India’s healthcare and accessibility.Government has given new emphasis to women and youth empowerment: PM Modi in Varanasi
October 20th, 04:54 pm
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone and inaugurated multiple development projects in Varanasi, Uttar Pradesh. The projects of today include multiple airport projects worth over Rs 6,100 crore and multiple development initiatives in Varanasi. Addressing the gathering, PM Modi emphasized that development projects pertaining to Education, Skill Development, Sports, Healthcare and Tourism among other sectors have been presented to Varanasi today which would not only boost services but also create employment opportunities for the youth.Prime Minister Shri Narendra Modi lays foundation stone and inaugurates multiple development projects in Varanasi, Uttar Pradesh
October 20th, 04:15 pm
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone and inaugurated multiple development projects in Varanasi, Uttar Pradesh. The projects of today include multiple airport projects worth over Rs 6,100 crore and multiple development initiatives in Varanasi. Addressing the gathering, PM Modi emphasized that development projects pertaining to Education, Skill Development, Sports, Healthcare and Tourism among other sectors have been presented to Varanasi today which would not only boost services but also create employment opportunities for the youth.Kashi is now becoming a big health center & healthcare hub of Purvanchal: PM in Varanasi
October 20th, 02:21 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.Prime Minister Shri Narendra Modi inaugurates RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh
October 20th, 02:15 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated RJ Sankara Eye Hospital in Varanasi, Uttar Pradesh. The hospital offers comprehensive consultations and treatments for various eye conditions. PM Modi also took a walkthrough of the exhibition showcased on the occasion. Addressing the event the Prime Minister remarked that RJ Sankara Eye hospital would wipe out the darkness and lead many people towards light.पंतप्रधान 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार
October 19th, 05:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑक्टोबर रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला ते आर जे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन करतील. हे रुग्णालय विविध नेत्र विकारांसाठी सर्वसमावेशक वैद्यकीय मार्गदर्शन आणि उपचार उपलब्ध करून देईल. रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर दुपारी 4.15 च्या सुमाराला ते वाराणसीमधील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत जाहीर
October 04th, 10:52 am
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून FY-23 मध्ये भारतातील उत्पादनात 7.6%, वेतनात 5.5%, GVA मध्ये 21% झालेल्या वाढीचे स्वागत
October 01st, 08:11 pm
वित्तीय वर्ष-23 मध्ये उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या आणि कामगारांच्या रोजंदारीत अलीकडेच नोंदवल्या गेलेल्या उल्लेखनीय वाढीचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कौतुक केले. एका सरकारी सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष-23 मध्ये उत्पादन क्षेत्रातील रोजगारांमध्ये 7.6% तर मोबदल्यात 5.5% वाढ झाली.'मन की बात'चे श्रोते हेच या कार्यक्रमाचे खरे आधारस्तंभ: पंतप्रधान मोदी
September 29th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आजचा हा भाग मला भावूक करणारा आहे, अनेक जुन्या आठवणी माझ्याभोवती रुंजी घालत आहेत याचं कारण असं की आपल्या या ‘मन की बात’ च्या प्रवासाला आता 10 वर्षे पूर्ण होत आहेत.दहा वर्षांपूर्वी 3 ऑक्टोबर रोजी, विजयादशमीच्या दिवशी ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. आणि पवित्र योगायोग असा की या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’ ला 10 वर्षे पूर्ण होतील तेव्हा नवरात्रीचा पहिला दिवस असेल. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या वाटचालीत असे अनेक प्रसंग आले आहेत ज्यांना मी कधीच विसरू शकत नाही. ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कोट्यवधी श्रोते, आपल्या या प्रवासातील असे सहकारी आहेत ज्यांचा सहयोग मला निरंतर लाभत राहिला आहे. देशाच्या काना-कोपऱ्यातून त्यांनी मला माहिती उपलब्ध करून दिली. ‘मन की बात’चे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. सहसा असं मानलं जातं की जोपर्यंत एखाद्या कार्यक्रमात चटपटीत बाबींची चर्चा नसेल किंवा काही नकारात्मक बाबी समाविष्ट नसतील तर अशा कार्यक्रमाकडे श्रोते फारसे लक्ष देत नाहीत. पण ‘मन की बात’ या कार्यक्रमाने हे सिध्द करून दाखवले आहे की देशातील लोकांना सकारात्मक माहितीची किती ओढ आहे. सकारात्मक विचार, प्रेरणात्मक उदाहरणे, धैर्य वाढवणाऱ्या कहाण्या लोकांना फारच आवडतात. ‘चकोर’ नावाच्या पक्षाबद्दल असं म्हटलं जातं की तो पक्षी फक्त आकाशातून पडणारे पावसाचे थेंबच पितो. ‘मन की बात’ या कार्यक्रमात आपण पाहिलं की लोक देखील तशाच प्रकारे, चकोर पक्ष्याप्रमाणेच देशाची कामगिरी इतरांच्या सामुहिक यशोगाथा अत्यंत अभिमानाने ऐकतात. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 10 वर्षांच्या वाटचालीने एक अशी श्रुंखला तयार केली आहे ज्याच्या प्रत्येक भागात नव्या कहाण्या, नव्या सफलतेच्या गाथा आणि नवी व्यक्तिमत्वे यांची ओळख होते.आपल्या समाजात सामुदायिकतेच्या भावनेने जे जे कार्य केलं जात आहे त्या कार्याचा ‘मन की बात’ मध्ये गौरव केला जातो. जेव्हा मी ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी आलेली लोकांची पत्रे वाचतो तेव्हा माझं मन देखील अभिमानाने फुलून येतं. आपल्या देशात कितीतरी प्रतिभावंत आहेत आणि त्यांच्यामध्ये देश आणि समाजाची सेवा करण्याची उत्कट इच्छा आहे. असे लोक निःस्वार्थ भावनेनं सेवा करण्यात स्वतःचं संपूर्ण जीवन समर्पित करतात. अशा लोकांचं कार्य जाणून घेतल्यानंतर माझ्यात देखील उर्जेचा संचार होतो. ‘मन की बात’ ची ही संपूर्ण प्रक्रिया माझ्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्याप्रमाणे आहे. ‘मन की बात’ मधील प्रत्येक विषय, प्रत्येक घटना आणि प्रत्येक पत्राची मी आठवण काढतो तेव्हा असं वाटतं की माझ्यासाठी देवाचं रूप असलेली ही सर्वसामान्य जनता, तिचं जणूकाही दर्शन मी घेत आहे.