गुजरातमधील भरुच येथे आयोजित ‘उत्कर्ष समारोह’ मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

May 12th, 10:31 am

आजचा उत्कर्ष समारोह खरोखरच खूप उत्तम आहे आणि सरकार जेव्हा प्रामाणिकपणे, संकल्प घेऊन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा त्याचे किती फलदायी परिणाम प्राप्त होतात याचा हा दाखला आहे. सामाजिक सुरक्षेशी संबंधित 4 योजनांच्या 100 टक्के पूर्ततेच्या व्याप्तीसाठी मी भरूच जिल्हा प्रशासन, गुजरात सरकारचे तुम्हा सर्वांचे जितके अभिनंदन करावे तितके कमी आहे. तुम्ही खूप खूप अभिनंदनासाठी पात्र आहात. आता मी जेव्हा या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत होतो तेव्हा ते किती समाधानी आहेत ,त्यांच्यात किती आत्मविश्वास आहे हे मला दिसले.आव्हानांचा सामना करताना सरकारकडून थोडीफार मदत जेव्हा मिळते, तेव्हा मनोबल किती वाढते आणि समस्या असहाय्य होतात आणि जो त्रास सहन करतो तो बलवान होतो.आज तुम्हा सर्वांशी बोलताना मी याचा अनुभव घेत होतो.

पंतप्रधानांनी भरुच येथे 'उत्कर्ष समारोह' ला संबोधित केले

May 12th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील भरुच येथे ‘उत्कर्ष समारोह’ या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या चार महत्त्वाच्या योजनांच्या 100% परिपूर्णतेचा उत्सव आहे, यामुळे गरजूंना वेळेवर आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल उपस्थित होते.

पंतप्रधान 12 मे रोजी भरुचमध्ये आयोजित 'उत्कर्ष समारोह'ला करणार संबोधित

May 11th, 04:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता गुजरातमधील भरूच येथे आयोजित 'उत्कर्ष समारोह' ला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत. गरजूंना वेळेवर आर्थिक मदत प्रदान करण्यासाठी सहाय्यकारी ठरणाऱ्या राज्य सरकारच्या चार महत्त्वाच्या योजनांची या जिल्ह्यात 100% टक्के पूर्तता झाल्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.