'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.उत्तर-पूर्व परिवर्तनात्मक औद्योगिकीकरण योजना, 2024 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
March 07th, 11:18 pm
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाने (डीपीआयआयटी) सादर केलेल्या उत्तर-पूर्व परिवर्तनात्मक औद्योगिकीकरण योजना,2024 (उन्नती-2024)च्या प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सुमारे 10,037 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेची अधिसूचना जारी झाल्यापासून 10 वर्षांसाठी ही योजना राबवण्यात येणार असून वचनबद्ध दायित्वाची 8 वर्ष असणार आहेत.