मलेशियाच्या पंतप्रधानानसोबतच्या संयुक्त वार्ताहर परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण

April 01st, 07:35 pm

आजच्या आमच्या व्यापक चर्चेमध्ये, पंतप्रधान नजीब आणि मी मिळून आपल्या सांस्कृतिक, आर्थिक आणि धोरणात्मक प्रतिबद्धतेंचा आढावा घेतला. नोव्हेंबर २०१५ मधील माझ्या मलेशिया दौऱ्या दरम्यान घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणी मधील प्रगतीचा आम्ही आढावा घेतला आणि आपली धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी वैचारिक दृष्टिकोनाचे आदान-प्रदान करण्यावर सहमती दर्शवली. दृष्टीकोन जो क्रियाभिमुखतेला प्राधान्य देईल. या प्रयत्नांमध्ये, सहकार्याच्या विद्यमान क्षेत्रांना अधिक मजबूत करणे आणि प्रतीबद्धतेचे नवीन क्षेत्र शोधणे ही आपली महत्वपूर्ण उदिष्टे आहेत.