प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजना अंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा मोफत पुरवठा जुलै, 2024 ते डिसेंबर 2028 या कालावधीत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

October 09th, 03:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणि इतर कल्याणकारी योजनासह सरकारच्या सर्व योजनांअंतर्गत पोषणमूल्ययुक्त तांदळाचा सार्वत्रिक पुरवठा सध्याच्या स्वरूपात जुलै 2024 ते डिसेंबर 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.

पंतप्रधान भूषवणार 7 ऑगस्ट रोजी आयोजित नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षपद

August 05th, 01:52 pm

भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण होत असताना, राज्यांनी गतिमान , लवचिक आणि आत्मनिर्भर असण्याची आणि सहकारी संघराज्याच्या भावनेने 'आत्मनिर्भर भारत'कडे वाटचाल करण्याची प्रबळ गरज आहे. एक स्थिर, शाश्वत आणि सर्वसमावेशक भारत निर्माण करण्याच्या दिशेने,नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 7वी बैठक 7 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित करण्यात आली असून ही बैठक केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेश दरम्यानचे सहयोग आणि सहकार्याच्या नवीन युगाच्या दिशेने समन्वयाचा मार्ग मोकळा करेल.

सर्व सरकारी योजनांमध्ये पोषणयुक्त तांदूळ वितरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

April 08th, 03:58 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने आज राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS), प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण-पीएम पोषण [पूर्वीची मध्यान्ह भोजन योजना (MDM)] आणि भारत सरकारच्या इतर कल्याणकारी योजना (OWS) अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (UTs) 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने संपूर्ण लक्ष्यीत सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) मध्ये पोषणयुक्त तांदुळाचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.