पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांची घेतली भेट
December 24th, 06:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नीति आयोग कार्यालयात केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 च्या तयारी संदर्भात प्रख्यात अर्थतज्ज्ञ आणि विचारवंत नेत्यांच्या गटाशी संवाद साधला.पंतप्रधान दिनांक 30 जुलै रोजी भारतीय उद्योग महासघा (CII) द्वारे होणाऱ्या अर्थसंकल्पानंतरच्या परिषदेच्या उद्घाटन सत्राला करणार संबोधित
July 29th, 12:08 pm
'विकसित भारताकडे प्रवास: केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 नंतरची परिषद' या दिनांक 30 जुलै, 2024 रोजी दुपारी 12 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत.अर्थसंकल्प 2024-25 संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली टिप्पणी.
July 23rd, 02:57 pm
देशाला विकासाच्या नव्या उंचीवर स्थापित करणाऱ्या या महत्वपूर्ण अर्थसंकल्पासाठी मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. वित्तमंत्री निर्मला सीतारामन जी आणि त्यांचा संपूर्ण चमू देखील खूप खूप शुभेच्छांसाठी पात्र आहे.वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया
July 23rd, 01:30 pm
आज लोकसभेत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.पंतप्रधानांचे ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2024 येथील भाषण
February 09th, 08:30 pm
गुयानाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स, विनीत जैन, उद्योग क्षेत्रातील नेते, विविध मुख्य कार्यकारी अधिकारी गण , इतर माननीय, बंधू आणि भगिनींनोपंतप्रधानांचे ईटी नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2024 येथील मार्गदर्शन
February 09th, 08:12 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे ई. टी. नाऊ ग्लोबल बिझनेस समिट 2024 ला संबोधित केले. या शिखर परिषदेने निवडलेल्या 'अडथळे, विकास आणि वैविध्य' या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “अडथळे, विकास आणि विविधता यांचा विचार केला तर हा काळ भारताचा आहे याबाबत प्रत्येक जण सहमत होईल”, असे नमूद करत पंतप्रधानांनी सांगितले की जगामध्ये भारतावरील विश्वास वाढू लागला आहे. दावोसमध्ये भारताविषयी निर्माण झालेल्या अभूतपूर्व उत्साहाविषयी बोलताना पंतप्रधानांनी भारताला अभूतपूर्व आर्थिक यशाची गाथा, समजले जात असल्याकडे लक्ष वेधले. दावोस येथे भारताविषयी निर्माण झालेल्या अभूतपूर्व उत्साहाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी भारताला अभूतपूर्व आर्थिक यशोगाथा म्हटले जात असल्याबद्दल, त्याच्या डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांनी नवीन उंची गाठल्याबद्दल आणि जगातील प्रत्येक क्षेत्रावर भारताचे वर्चस्व असल्याबद्दल होणाऱ्या चर्चांची आठवण करून दिली. भारताच्या क्षमतेची तुलना 'अतिशय ताकदवान बैल' अशी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आठवण पंतप्रधानांनी यावेळी सांगितली. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या 10 वर्षांत भारताच्या परिवर्तनावर चर्चा करणारे जगातील विकास तज्ज्ञ गट आज जगाचा भारताप्रति वाढता विश्वास दर्शवतात.गुवाहाटी येथे विविध प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 04th, 12:00 pm
आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया जी, मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे मंत्री, खासदार आणि आमदार, विविध परिषदांचे प्रमुख आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांनी आसाम मधील गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
February 04th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील गुवाहाटी येथे 11,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. गुवाहाटीमधील मुख्य लक्षीत क्षेत्रांमध्ये क्रीडा आणि वैद्यकीय पायाभूत सुविधा तसेच संपर्क सुविधेला चालना देणारे प्रकल्प समाविष्ट आहेत.पाली येथे आयोजित केलेल्या 'संसद खेल महाकुंभ' कार्यक्रमामध्ये दूरदृश्य प्रणालीव्दारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण.
February 03rd, 12:00 pm
माझ्या प्रिय युवा मित्रांनो, पालीमध्ये आपल्यामधील खेळाची प्रतिभा दाखवणार्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन! खेळामध्ये पराभव ही गोष्ट तर कधीच नसते. कारण खेळामध्ये एक तुम्ही जिंकता तरी किंवा तुम्ही काही नवीन शिकता तरी! म्हणूनच मी सर्व खेळाडूंबरोबरच इथं उपस्थित असलेल्या त्यांच्या प्रशिक्षकांना आणि खेळाडूंचे जे कुटुंबिय आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देतो.पंतप्रधानांनी पाली संसद खेळ महाकुंभला केले संबोधित
February 03rd, 11:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हिडिओ संदेशाद्वारे पाली संसद खेल महाकुंभाला संबोधित केले. सर्व स्पर्धकांनी त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. “खेळात कधीही पराभव होत नाही; तुम्ही एकतर जिंकता किंवा काहीतरी शिकता, त्यामुळे मी केवळ सर्व खेळाडूंनाच नव्हे तर त्यांच्या प्रशिक्षकांना आणि उपस्थित असलेल्या कुटुंबीयांनाही माझ्या शुभेच्छा देतो.” असे पंतप्रधान म्हणाले.The speed and scale of our govt has changed the very definition of mobility in India: PM Modi
February 02nd, 04:31 pm
Prime Minister Narendra Modi addressed a program at India’s largest and first-of-its-kind mobility exhibition - Bharat Mobility Global Expo 2024 at Bharat Mandapam, New Delhi. Addressing the gathering, the Prime Minister congratulated the motive industry of India for the grand event and praised the efforts of the exhibitors who showcased their products in the Expo. The Prime Minister said that the organization of an event of such grandeur and scale in the country fills him with delight and confidence.पंतप्रधानांनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 ला संबोधित पंतप्रधानांनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024 ला संबोधित केलेकेले
February 02nd, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली मध्ये भारत मंडपम येथे ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024’, या ‘मोबिलिटी प्रदर्शना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. हे भारतातील सर्वात मोठे आणि अशा प्रकारचे पहिलेच प्रदर्शन आहे. पंतप्रधानांनी यावेळी प्रदर्शनाला भेट देऊन निरीक्षणही केले.अंतरिम अर्थसंकल्प 2024 बाबत पंतप्रधानांचे भाष्य
February 01st, 02:07 pm
आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सातत्य राखण्याचा विश्वास आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या युवा, गरीब, महिला आणि शेतकरी, या सर्व चार स्तंभांना सक्षम करेल. निर्मलाजींचा हा अर्थसंकल्प देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प 2047 सालच्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी देणारा आहे. मी निर्मला जी आणि त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन करतो.आज सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून, सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
February 01st, 12:36 pm
“आज सादर झालेला अर्थसंकल्प हा केवळ अंतरिम अर्थसंकल्प नसून, सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. “या अर्थसंकल्पात सातत्त्याचा विश्वास आहे,” असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे. पंतप्रधानांनी पुढे म्हटले आहे, हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या सर्व आधार स्तंभांना, म्हणजेच तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी यांना सक्षम करेल.वंदे भारत एक्सप्रेस प्रकारच्या नऊ गाड्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून रवाना करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
September 24th, 03:53 pm
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विविध राज्यांचे राज्यपाल, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, साथी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी आणि माझ्या कुटुंबीयांनो,पंतप्रधानांच्या हस्ते नऊ वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा
September 24th, 12:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ह्या वंदे भारत गाड्या म्हणजे, देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारणे आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणे, या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या परिपूर्तीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आज ज्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले, त्या खालीलप्रमाणे :17 व्या भारतीय सहकार काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन
July 01st, 11:05 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी अमित शाह, राष्ट्रीय सहकारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप संघांनी, डॉक्टर चंद्रपाल सिंह यादव, देशाच्या कानाकोपऱ्यातून जोडले गेलेले सहकारी संस्थांचे सर्व सदस्य, आपल्या शेतकरी बंधू-भगिनी, इतर मान्यवर आणि बंधू-भगिनींनो, सतराव्या भारतीय सहकार महासंमेलनाच्या आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. या संमेलनात मी आपणा सर्वांचे स्वागत करतो, आपले अभिनंदन करतो.नवी दिल्लीत 17 व्या भारतीय सहकारी परिषदेत (काँग्रेस) पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
July 01st, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त नवी दिल्ली येथे प्रगती मैदानवर 17 व्या भारतीय सहकारी परिषदेत मार्गदर्शन केले. 'अमृत काळ- चैतन्यमय भारतासाठी सहकार्याद्वारे समृद्धी' ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. सहकारी विपणनासाठी ई-कॉमर्स संकेतस्थळाच्या वेबसाइटचे ई-पोर्टल तसेच सहकारी विस्तार आणि सल्लागार सेवा पोर्टलचे यावेळी अनावरण करण्यात आले.रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 नियुक्ती पत्रांचे वितरण करताना पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या भाषणाचा मजकूर
May 16th, 11:09 am
आज 70 हजारापेक्षा जास्त तरुणांना भारत सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये सरकारी नोकऱ्यांचे नियुक्तीपत्र मिळत आहे. आपण सर्वांनी मोठे कष्ट करून हे यश मिळवलेले आहे. मी आपणाला आणि आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आहे.पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला केले संबोधित
May 16th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले. तसेच विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. पंतप्रधानांनी यावेळी भरती झालेल्या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. गुजरातसारख्या राज्यांमध्ये नुकतेच झालेले रोजगार मेळावे आणि आसाममधील आगामी मेळाव्याचा उल्लेखही केला. केंद्र आणि भाजपशासित राज्यांतील हे मेळावे सरकारची तरुणांप्रती असलेली बांधिलकी दर्शवतात असे ते म्हणाले. गेल्या 9 वर्षात, सरकारने भरती प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि निःपक्षपाती करून तिला प्राधान्य दिले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. भरती प्रक्रियेतील अडचणींची आठवण त्यांनी करुन दिली. कर्मचारी निवड मंडळाला आधी नवीन भरती करण्यासाठी सुमारे 15-18 महिने लागत असत तर आता फक्त 6-8 महिने लागतात हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. भरतीची प्रक्रिया पूर्वी खूपच किचकट होती असे त्यांनी अधोरेखित केले. अर्ज प्राप्त करण्यापासून ते टपालाद्वारे ते सादर करणे यात वेळ जायचा. आता ती प्रक्रीया ऑनलाइन करून सुलभ केली आहे. कागदपत्रांच्या स्वयं-प्रमाणीकरणाची तरतूद देखील केली आहे. गट क आणि गट ड साठीच्या मुलाखती देखील रद्द केल्या आहेत असेही पंतप्रधानांनी सांगितले.