वाराणसी, मधील विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि लोकार्पण प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 18th, 02:16 pm
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, गुजरात विधानसभेचे अध्यक्ष आणि बनास डेयरीचे अध्यक्ष आणि आज विशेष रूपाने शेतकऱ्यांना भेट, उपहार देण्यासाठी आलेले शंकर भाई चौधरी, राज्याच्या मंत्रिमंडळातले सदस्य, आमदार, इतर मान्यवर आणि बनारसच्या माझ्या कुटुंबीयांनो…पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशात वाराणसी येथे 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचा कोनशीला समारंभ आणि लोकार्पण
December 18th, 02:15 pm
या प्रकल्पांमध्ये इतर अनेक रेल्वे प्रकल्पांसह 10,900 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवीन पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर- नवीन भौपूर समर्पित फ्रेट मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे. पंतप्रधानांनी नव्याने उद्घाटन झालेल्या फ्रेट मार्गिका येथे वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस गाडी, डोहरीघाट-मऊ मेमू रेल्वे या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी बनारस लोकोमोटीव्ह वर्क्स येथे उत्पादित दहा हजाराव्या इंजिनाला देखील झेंडा दाखवून रवाना केले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, 370 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या शिवपूर-फुलवारिया-लहरतारा ग्रीन फिल्ड मार्ग तसेच दोन रेल्वे पुलांचे उद्घाटन देखील केले. पंतप्रधानांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांचे बळकटीकरण आणि विस्तारीकरण; कैथी गावातील संगम घाट रस्ता तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या निवासी इमारतीचे बांधकाम, पोलीस लाईन आणि भूल्लनपूर येथील पीएसी मध्ये दोनशे आणि दीडशे खाटांची क्षमता असलेल्या दोन बहुमजली बराक इमारती, 9 ठिकाणी बांधण्यात आलेले स्मार्ट बस निवारे आणि आलईपूर येथे उभारण्यात आलेले 132 किलोवॅट क्षमतेचे उपकेंद्र या प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, त्यांनी स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत एकात्मिक प्रवासी पास यंत्रणेची सुरुवात देखील केली.येत्या 17-18 डिसेंबरला पंतप्रधान सुरत आणि वाराणसीला भेट देणार
December 16th, 10:39 am
येत्या 17-18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सुरतला आणि उत्तरप्रदेशात वाराणसीला भेट देणार आहेत. 17 डिसेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमाराला ते सुरत विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. तर सव्वाअकराच्या सुमाराला पंतप्रधानांच्या हस्ते सुरत हिरे सराफा बाजाराचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते वाराणसीकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास 'विकसित भारत संकल्प यात्रेत' पंतप्रधान सहभागी होणार आहेत. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास नमो घाटावर ते काशी तमिळ संगमम-2023 चे उद्घाटन करणार आहेत.