हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप परिषद 2024 मध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 16th, 10:15 am
100 वर्षांपूर्वी पूज्य बापूंनी हिंदुस्तान टाईम्सचे उद्घाटन केले होते ... ते गुजराती भाषक होते आणि 100 वर्षांनतर दुसऱ्या गुजराती व्यक्तीला आपण बोलावले आहे. या ऐतिहासिक प्रवासासाठी हिंदुस्तान टाईम्स आणि 100 वर्षांच्या या प्रवासात जे-जे लोक सहभागी आहेत, ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, संकटे झेलत टिकून राहिले .. ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. 100 वर्षांचा प्रवास फार प्रदीर्घ असतो.यासाठी आपण सर्व अभिनंदनाला पात्र आहात, भविष्यासाठीही माझ्याकडून आपणा सर्वाना खूप-खूप शुभेच्छा. आता मी आलो तेव्हा या कुटुंबातल्या लोकांना भेटता तर आलेच त्याचबरोबर 100 वर्षांचा हा प्रवास दर्शवणारे एक उत्तम प्रदर्शनही पाहण्याची संधी मला मिळाली. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या असे मी आपल्याला सुचवेन. हे केवळ एक प्रदर्शन नव्हे तर हा एक अनुभव आहे. 100 वर्षांचा इतिहासच आपण पाहतो आहोत असे वाटले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आणि संविधान लागू झाले त्या दिवसाचे वृत्तपत्र मी पाहिले. एकाहून एक थोर, दिग्गजांचे लेख हिंदुस्तान टाईम्समध्ये असत.मार्टिन ल्युथर किंग,नेताजी सुभाष बाबू,डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर एम एस स्वामिनाथन. या सर्वांच्या लेखांनी आपल्या वर्तमानपत्राची कीर्ती वृद्धिंगत केली.खरोखरच एक प्रदीर्घ प्रवास करून आपण इथे पोहोचलो आहोत. स्वातंत्र्यासाठीच्या लढ्यापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या आशा- आकांक्षांच्या हिंदोळ्यावरून आपण आगेकूच केली आहे. हा प्रवास अभूतपूर्व आणि अद्भुतही आहे. ऑक्टोबर 1947 मध्ये काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर प्रत्येक देशवासीयाचा त्यावेळचा उत्साह मला आपल्या वृत्तपत्राच्या बातमीतून जाणवला.त्याचवेळी ठाम निर्णयाअभावी 7 दशकांपर्यंत काश्मीर हिंसाचारात कसे होरपळत राहिले हेसुद्धा जाणवले. आज आपल्या वर्तमानपत्रात जम्मू-काश्मीर मध्ये झालेल्या विक्रमी मतदानाच्या बातम्या छापल्या जातात हा विरोधाभास आहे. एका आणखी दिवसाचे वर्तमानपत्र,प्रत्येकाचे तिथे लक्ष जाईल. त्यामध्ये एकीकडे आसामला अशांत क्षेत्र म्हणून जाहीर केल्याची बातमी होती तर दुसरीकडे अटल जी यांच्याकडून भाजपचा पाया घातल्याची बातमी होती.आज आसाममध्ये स्थायी शांतता स्थापन करण्यामध्ये भाजपा मोठी भूमिका बजावत आहे हा किती सुखद योगायोग आहे.कालच बोडो भागातल्या लोकांसमवेत एका शानदार कार्यक्रमाला मी उपस्थित होतो आणि दिल्लीमधल्या माध्यमांनी या मोठ्या घटनेकडे दुर्लक्ष केले याचे मला आश्चर्य वाटते.5 दशकांनंतर बॉम्ब, बंदूक आणि पिस्तुल यांचा त्याग करत, हिंसेचा मार्ग नाकारून दिल्लीच्या हृदयस्थानी बोडोचे युवक सांस्कृतिक उत्सव साजरा करत आहेत ही इतिहासातली मोठी घटना आहे याचा त्यांना अंदाज नाही. मी काळ तिथे होतो. मनापासून मला ते जाणवत होते. बोडो शांतता करारामुळे या लोकांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. प्रदर्शनादरम्यान मुंबईवरच्या 26/11 च्या हल्ल्यावरच्या वृत्तांकडे माझे लक्ष गेले.शेजारी देशाच्या दहशतवादी कारवायांमुळे आपली जनता स्वतःच्याच घरात आणि शहरात असुरक्षित होती असा तो काळ होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे, आता ते दहशतवादीच त्यांच्या घरात सुरक्षित नाहीत.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे आयोजित हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट 2024 ला केले संबोधित
November 16th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे हिंदुस्थान टाइम्स नेतृत्व शिखर परिषद 2024 ला (Hindustan Times Leadership Summit 2024) संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांच्या हस्ते हिंदुस्थान टाईम्सच्या प्रवासाची सुरूवात झाली असल्याची घटना आपल्या संबोधनात नमूद केली आणि हिंदुस्थान टाईम्सच्या 100 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल आणि प्रारंभापासून या संस्थेशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींचे अभिनंदनही केले. यावेळी पंतप्रधानांनी या सर्वांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी पंतप्रधानांनी आयोजनस्थळी उभारलेल्या हिंदुस्थान टाईम्सच्या प्रदर्शनालाही भेट दिली. या प्रदर्शनाला भेट देणे हा समृद्ध करणारा अनुभव असल्याची भावना व्यक्त करत, सर्व प्रतिनिधींनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि राज्यघटना लागू झाली तेव्हाची जुनी वर्तमानपत्रं आपण पाहिली असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मार्टिन ल्युथर किंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. एम. एस. स्वामीनाथन अशा अनेक दिग्गजांनी हिंदुस्थान टाईम्ससाठी लेख लिहिले असल्याचाही त्यांनी उल्लेख केला. हिंदुस्थान टाईम्सचा प्रवास प्रचंड प्रदीर्घ आहे, हा प्रवास स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार आहे, आणि त्याचवेळी स्वातंत्र्योत्तर काळात आशेच्या दिशेने वाटचाल करणारा हा प्रदीर्घ प्रवास अभूतपूर्व आणि आश्चर्यकारक आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. 1947 सालच्या ऑक्टोबर महिन्यात आपणही इतर नागरिकांप्रमाणेच काश्मीर भारतात विलीन झाल्याची बातमी वाचली होती, आणि ही बातमी वाचून आपला इतरांप्रमाणे प्रचंड उत्साह वाटला होता हा अनुभवही पंतप्रधानांनी उपस्थितांसोबत सामाईक केला. मात्र अनिर्णयकी वृत्तीमुळे काश्मीर सात दशके हिंसाचाराच्या विळख्यात सापडले असल्याची जाणिवही आपल्याला त्या क्षणाने करून दिली होती असेही त्यांनी सांगितले. पण आजच्या स्थितीत जम्मू - काश्मीरमधील निवडणुकीत विक्रमी प्रमाणात मतदान झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत, आणि ही आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले. एकदा एका वर्तमानपत्रात एका बाजूला आसामला अशांत क्षेत्र घोषित केल्याची बातमी छापलेली होती, तर दुसऱ्या बाजुला अटलजींनी भारतीय जनता पक्षाची पायाभरणी केल्याची बातमी छापलेली बातमी आपण पाहिल्याचा अनुभवही पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसोबत सामायिक केला. याच अनुभवाचा संदर्भ देत आज भाजपा आसाममध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे आणि हा मनाला शांती देणारा योगायोग आहे असे ते म्हणाले.Mission of cleanliness is not a one day ritual but a lifelong ritual: PM Modi
October 02nd, 10:15 am
PM Modi commemorated the 10th anniversary of the Swachh Bharat Mission at Vigyan Bhawan, New Delhi. He launched sanitation projects worth over Rs 9,600 crore and emphasized the movement's significance as a public initiative involving millions of citizens. Highlighting collective efforts and community contributions, PM Modi celebrated the mission as a historic achievement that showcases India's commitment to cleanliness and environmental sustainability. The theme for this year’s campaign is “Swabhav Swachhata, Sanskaar Swachhata.”पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिन 2024 मध्ये झाले सहभागी
October 02nd, 10:10 am
स्वच्छ भारत या एका महत्वाच्या लोकचळवळीच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 155 व्या गांधी जयंती निमित्त नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात आयोजित स्वच्छ भारत दिवस 2024 च्या कार्यक्रमात सहभागी झाले. मोदी यांनी रु 9600 कोटी हुन जास्त खर्चाच्या अनेक स्वच्छता प्रकल्पांचा शुभारंभ केला आणि कोनशिला बसवली. यात अमृत आणि अमृत 2.0, स्वच्छ गंगा राष्ट्रीय प्रकल्प तसेच गोबरधन योजनेचा समावेश आहे. ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ हे स्वच्छता ही सेवा 2024 चे बोधवाक्य आहे.महत्त्वाची माहिती: क्वाड नेत्यांची शिखर परिषद
September 25th, 11:53 am
24 सप्टेंबर रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांच्यासह क्वाड नेत्यांच्या पहिल्या प्रत्यक्ष वैयक्तिक उपस्थितीच्या शिखर परिषदेचे आयोजन केले होते. या नेत्यांनी या शिखर परिषदेत संघटनेच्या सदस्य देशांमधील संबध अधिक बळकट करण्याच्या आणि 21 व्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यासाठी अधिक व्यावहारिक सहकार्यासाठी पुढाकार घेण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांवर भर दिला. कोविड-19 महामारीला संपुष्टात आणणे, लसींचे उत्पादन वाढवणे आणि सुरक्षित आणि प्रभावी लसी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे,उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणे, हवामान संकटाचा सामना करणे, विकसित तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, अंतराळ आणि सायबर सुरक्षा आणि सदस्य देशांमधील उच्च प्रतिभासंपन्न नव्या पिढीची जोपासना करणे यांचा यामध्ये समावेश होता.Swachh Bharat mission has benefited the poor and the women most: PM Modi
September 25th, 06:31 am
PM Modi received 'Global Goalkeeper Award for the Swachh Bharat Abhiyan, from the Bill and Melinda Gates Foundation. Award presented by Mr. Bill Gates. In last five years a record more than 11 crore toilets were constructed. If Swachh Bharat mission has benefited someone the most, it is the poor of this country and the women, said the PM.स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पंतप्रधानांचा ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मान
September 25th, 06:30 am
अमेरिकेतल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूयॉर्क इथे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान काल पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वच्छ भारत अभियानाची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.PM Modi's bilateral meetings on the sidelines of UNGA
September 24th, 02:47 am
On the sidelines of the UNGA, PM Modi held bookstall meetings with several world leaders in New York.नवी दिल्ली येथे पीएमएनसीएच भागीदारी परिषदेतील पंतप्रधानांचे भाषण
December 12th, 08:46 am
ही अशी एकमेव भागीदारी आहे जी आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाईल. नागरिकांमधील भागीदारी, समुदायांमधील, देशांमधील भागीदारी. शाश्वत विकास विषयपत्रिका हे ह्याचे प्रतिबिंब आहे.PM Modi to inaugurate Partners’ Forum 2018
December 11th, 12:40 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, will inaugurate the fourth Partners’ Forum on 12th December at New Delhi. The Government of India, in association with the Partnership for Maternal, Newborn and Child Health (PMNCH), is hosting a two-day international conference on 12th and 13th December 2018, bringing together about 1500 participants from across 85 countries to improve the health and well-being of women, children and adolescents.पीएमएनसीएचच्या प्रतिनिधी मंडळाने पंतप्रधानांची भेट घेऊन 2018 भागीदारी परिषदेचे बोध चिन्ह दिले भेट
April 11th, 08:21 pm
मातृ, नवजात शिशू आणि बाल आरोग्य (पीएमएनसीएच) भागीदारीच्य प्रतिनिधी मंडळासोबत पीएमएनसीएच भागीदारी परिषदेचे तीन चॅम्पियन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा, चिलीचे माजी राष्ट्रपती आणि पीएमएनसीएचचे भावी अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेत्री तसेच युनिसेफची सद्भावना राजदूत प्रियंका चोप्रा, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री ए.के.चौबे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव प्रिती सुदान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन 12-13 डिसेंबर 2018 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या भागीदारी परिषद 2018 चे आमंत्रण दिले.Jan Seva is Prabhu Seva: PM Narendra Modi
October 20th, 01:44 pm
PM Modi, while addressing a public meeting in Kedarnath today said, “Jan Seva is Prabhu Seva. From this holy land of Kedarnath, I seek the blessings of Bhole Baba and pledge to devote myself fully to realising the dream of a developed India by the time we mark 75 years of freedom in 2022.”PM Modi addresses a public meeting in Kedarnath, Uttarakhand
October 20th, 12:00 pm
PM Modi, while addressing a public meeting in Kedarnath today said, “Jan Seva is Prabhu Seva. From this holy land of Kedarnath, I seek the blessings of Bhole Baba and pledge to devote myself fully to realising the dream of a developed India by the time we mark 75 years of freedom in 2022.”A country can’t move forward if it forgets its heritage: PM Modi
October 17th, 11:05 am
PM Modi inaugurated the All India Institute of Ayurveda in New Delhi. The Prime Minister said that the Government is focused on providing affordable healthcare for the poor. He said the stress has been on preventive healthcare, and improving affordability and access to treatment.पंतप्रधानांच्या हस्ते अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण
October 17th, 11:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे राष्ट्रार्पण झाले.Swachhata is a way to serve the poor of India: PM Modi
September 23rd, 10:24 am
PM Modi today attended Pashudhan Arogya Mela in Varanasi and distributed certificates PMAY beneficiaries. He also attended a Swachhata programme in Shahanshapur village."पंतप्रधानांनी केले स्वछता श्रमदान; पशुधन आरोग्य मेळाव्याला भेट.आणि शहंशाहपूर, वाराणसी येथे उपस्थितांना संबोधन "
September 23rd, 10:23 am
पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसी येथे पशुधन आरोग्य मेळाव्याला भेट दिली आणि PMAY च्या लाभार्थींना प्रमाणपत्राचे वाटप केले. त्यांनी शहंशाहपूर गावांत स्वच्छता कार्यक्रमांत सहभाग घेतला.Social Media Corner - 20th November 2016
November 20th, 07:44 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!The United States and India: Enduring Global Partners in the 21st Century'...the India-US Joint Statement
June 08th, 02:26 am