भारतीय रेल्वेच्या तीन ‘मल्टीट्रॅकिंग’ प्रकल्पांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी : संपर्क यंत्रणा प्रदान करणे , प्रवास सुलभ करणे,वाहतूक खर्च कमी करणे, तेल आयात कमी करणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे उद्दिष्ट्य
November 25th, 08:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीची आज बैठक झाली. यामध्ये रेल्वे मंत्रालयाच्या एकूण अंदाजे 7,927 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.Our Jawans have proved their mettle on every challenging occasion: PM Modi in Kutch
October 31st, 07:05 pm
PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.PM Modi celebrates Diwali with security personnel in Kutch,Gujarat
October 31st, 07:00 pm
PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.Prime Minister Narendra Modi meets with Prime Minister of Lao PDR
October 11th, 12:32 pm
Prime Minister Narendra Modi held bilateral talks with Prime Minister of Lao PDR H.E. Mr. Sonexay Siphandone in Vientiane. They discussed various areas of bilateral cooperation such as development partnership, capacity building, disaster management, renewable energy, heritage restoration, economic ties, defence collaboration, and people-to-people ties.'हर घर तिरंगा अभियान' तिरंग्याचे वैभव टिकवून ठेवणारा एक अनोखा उत्सव झाला आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
July 28th, 11:30 am
मित्रांनो, क्रीडाविश्वातील या ऑलिम्पिकपेक्षा वेगळे असलेले गणिताच्या जगातील ऑलिम्पिक काही दिवसांपूर्वीच पार पाडले. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड. या ऑलिम्पियाड मध्ये भारतातील विद्यार्थ्यांनी फार उत्तम कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत आपल्या भारतीय संघाने सर्वोत्तम कामगिरी करत चार सुवर्णपदके आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड या स्पर्धेत जगातील 100 हून अधिक देशांचे संघ सहभागी होतात आणि एकंदर पदकतालिकेचा विचार करता आपला संघ पहिल्या पाच सर्वोत्तम संघांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आहेत- पुण्याचा आदित्य वेंकट गणेश, पुण्याचाच सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नोईडाचा कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी.आसामच्या चराईदेव मोईदामचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद आणि अभिमान व्यक्त
July 26th, 02:50 pm
आसामच्या चराईदेव मोईदामचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला आहे. भारतासाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब असल्याचे मोदी म्हणाले.जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
July 21st, 07:45 pm
आज भारत गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा करत आहे. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना ज्ञान आणि आध्यात्माच्या या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा देतो. अशा महत्वपूर्ण दिनी आज 46 व्या जगतिक वारसा समितीच्या या बैठकीचा प्रारंभ होत आहे. आणि भारतात प्रथमच याचे आयोजन होत आहे. आणि स्वाभाविक आहे माझ्यासह सर्व देशवासियांना याचा विशेष आनंद आहे.मी याप्रसंगी जगभरातून आलेले सर्व मान्यवर आणि अतिथींचे स्वागत करतो. विशेषतः मी युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे ऑज़ुले यांचेही अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, जागतिक स्तरावरील प्रत्येक आयोजनाप्रमाणे हा कार्यक्रम देखील भारतात यशाचे नवे विक्रम स्थापित करेल.पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन
July 21st, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन केले. जागतिक वारसा समितीची दरवर्षी बैठक होते आणि जागतिक वारसा विषयक सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्याबरोबरच जागतिक वारसा यादीत नोंदवल्या जाणाऱ्या स्थळांचा निर्णय घेण्याचे दायित्व या समितीकडे असते.भारत प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करत आहे. यावेळी पंतप्रधानांनी विविध प्रदर्शनांना भेट देऊन आढावा घेतला.संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवर पुनश्च आपला अढळ विश्वास दाखवल्याबद्दल देशवासीयांचे आभार: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये
June 30th, 11:00 am
मित्रांनो, फेब्रुवारीपासून आतापर्यंत जेव्हा महिन्याचा शेवटचा रविवार यायचा, तेव्हा मला तुमच्या सोबतच्या या संवादाची उणीव जाणवायची. पण या कालावधीमध्ये देखील तुम्ही मला लाखो पत्र पाठवलीत हे पाहून मला खूप छान वाटले. 'मन की बात' हा रेडिओ कार्यक्रम जरी काही महिने प्रसारित झाला नसला तरीदेखील, 'मन की बात' ची भावना ही इतकी सखोल आहे की देशात, समाजात, दररोज होणाऱ्या कामांमध्ये, निस्वार्थ भावनेने केलेली कामे, समाजावर सकारात्मक परिणाम घडवणाऱ्या कामांमध्ये ती निरंतर दिसून आली. निवडणुकीच्या बातम्यांदरम्यान, अशा हृदयस्पर्शी बातम्यांनी नक्कीच तुमचे लक्ष वेधून घेतले असले.आसाममधील जोरहट येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 01:50 pm
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनवाल जी, रामेश्वर तेली जी, आसाम सरकारचे सर्व मंत्री, उपस्थित लोकप्रतिनिधी, इतर प्रतिष्ठित आणि आसामचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो!! आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित राहिले आहात, त्याबद्दल मी अगदी नतमस्तक होवून आपल्याला वंदन करतो आणि तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो.पंतप्रधानांनी आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन , लोकार्पण आणि पायाभरणी
March 09th, 01:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये आरोग्य, तेल आणि वायू, रेल्वे आणि गृहनिर्माण या क्षेत्रांचा समावेश आहे.पंतप्रधानांनी दिली काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट
March 09th, 10:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी आसाममधील युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. नागरिकांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट द्यावी आणि तिथल्या असामान्य नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घ्यावा असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले. यावेळी त्यांनी या ठिकाणाच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर असलेल्या वन दुर्गा या महिला वनरक्षकांच्या पथकासोबत संवाद साधला आणि या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठी त्यांची बांधिलकी आणि धैर्याची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी यांनी लखीमाई, प्रद्युम्न आणि फूलमाई या हत्तींना ऊस भरवतानाची काही छायाचित्रे देखील सामाईक केली.Prime Minister Narendra Modi to visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh
March 08th, 04:12 pm
Prime Minister will visit Assam, Arunachal Pradesh, West Bengal and Uttar Pradesh on 8th-10th March, 2024युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये गरबाच्या समावेशाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
December 06th, 08:27 pm
गरबा हा जीवनाचा, एकतेचा आणि आपल्या खोलवर रुजलेल्या परंपरांचा उत्सव आहे.त्याचा अमूर्त वारसा यादीतील समावेश भारतीय संस्कृतीचे सौंदर्य जगाला दाखवतो. हा सन्मान आपल्याला भावी पिढ्यांसाठी आपला वारसा जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा देतो. ही जागतिक ओळख निर्माण झाल्याबद्दल अभिनंदन.हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 12th, 03:00 pm
भारतमातेचा जयघोष , भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांच्या पराक्रमाचा हा जयघोष , ही ऐतिहासिक भूमी आणि दीपावलीचा हा पवित्र सण. हा अद्भुत संयोग आहे. हा अद्भुत मिलाफ आहे. समाधान आणि आनंदाने भारावून टाकणारा हा क्षण माझ्यासाठी, तुमच्यासाठीही आणि देशवासियांसाठीही दिवाळी प्रकाशमय करेल असा मला विश्वास आहे. मी तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना सीमेवरून, शेवटच्या गावातून, ज्याला मी आता पहिले गाव म्हणतो, तिथे तैनात आपल्या सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मी दिवाळी साजरी करत आहे, त्यामुळे सर्व देशवासियांना दिवाळीच्या या शुभेच्छा देखील खूपच खास आहेत. देशवासियांचे हार्दिक अभिनंदन आणि दिवाळीच्या शुभेच्छा.हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे पंतप्रधानांनी शूर जवानांसोबत केली दिवाळी साजरी
November 12th, 02:31 pm
जवानांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, दिवाळीचा सण आणि जवानांच्या शौर्याचे गुणगान यांचा संयोग हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी अध्यात्मिक अनुभूतीचा क्षण आहे. भारताच्या सीमावर्ती भागातील जवानांसह त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. देशातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाणारे हे गांव आता देशातील पहिले गाव ठरले आहे.आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या मुंबईत झालेल्या 141व्या सत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 14th, 10:34 pm
140 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे या विशेष आयोजनात स्वागत करतो, अभिनंदन करतो. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशनच्या या 141 व्या सत्राचे भारतात आयोजन होणे अतिशय विशेष आहे. 40 वर्षांनंतर भारतामध्ये आयओसीचे हे सत्र आयोजित होणे आमच्यासाठी अतिशय सन्मानाची बाब आहे.पंतप्रधानांनी 141 व्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सत्राचे मुंबईत केले उद्घाटन
October 14th, 06:35 pm
भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा खेळ हा एक महत्त्वाचा भाग असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. ज्यावेळी तुम्ही भारतातील गावांमध्ये जाता त्यावेळी तुम्हाला खेळाशिवाय कोणताही सण हा अपूर्ण असल्याचे दिसेल असे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय केवळ क्रीडाप्रेमीच नाहीत पण आम्ही खेळ जगत असतो असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये प्रतिबिंबित होत असलेली क्रीडा संस्कृती अधोरेखित केली मग ती सिंधू संस्कृती असेल वेदिक कालखंड असेल किंवा त्यानंतरचा कालखंड असेल भारताचा क्रीडा वारसा हा अतिशय समृद्ध राहिला आहे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.मन की बात (मराठी अनुवाद) 105वा भाग
September 24th, 11:30 am
‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळ राजघराण्याच्या पवित्र स्थापत्य कला अवशेषांच्या समावेशाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
September 18th, 09:54 pm
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत होयसळांच्या पवित्र स्थापत्य कलाअवशेषांच्या समावेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे.